इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा
ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.
आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx
पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड
पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका
पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या
पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी
पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी
पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु
पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)
पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद
पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल
पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा
पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.
पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण
पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण
पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/
पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3
पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड
पान १९:
चर्चा - डोंबिवली, अॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय
पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस
पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर
पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी
पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने
पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल
पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी
पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0
पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,
पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा
पान ३०:
चर्चा - पांगार्याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले
साधना, आभार मानायची गरज नाही.
साधना, आभार मानायची गरज नाही. तूला शेत आवड्ल. यातच मला समाधान आहे. दोन चार वर्शात शेताला चान्गल रूप येइल. आत्ता मी फक्त रविवारी शेतावर जातो त्या मुळे हवे तसे करता येत नाही त्या मुळे कोणाला शेतावर बोलवायला सन्कोच वाट्तो.
विजय
विजय, हे राजेंद्र भट मुळचे
विजय, हे राजेंद्र भट मुळचे कुठले???
हा माझा मित्र डोम्बिवली ला
हा माझा मित्र डोम्बिवली ला रहातो.गेले २० वर्शे तो शेती करतो.
विजय
वाटलच. मी गेलेय त्यांच्या
वाटलच. मी गेलेय त्यांच्या शेतावर खुप वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांनी नुकतीच सुरवात केली होती.
रुणुझुणू धंन्यवाद विजय, ३०,
रुणुझुणू धंन्यवाद
विजय, ३०, ३५ वर्षां पुर्वी डोंबिवली अगदी लहान होतं, आणि डोंबिवलीत व आसपास भरपुर झाडं, शेतं होती. आता चित्र बदललय.
मित्रांनो ही एक निसर्गाशी संबंधीत प्रसंग वर्णनात्मक माझी कविता पहा.
http://www.maayboli.com/node/7021
सुधीर
> Tree List -
> Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html
अरे वा, चक्क माझ्या गेले कित्येक वर्षात अपडेट न झालेल्या वेबपेज चा उल्लेख. आता एकदा नजर
फिरवावी लागणार त्या पेजेस वर. आणि अर्थातच इथे पण येत राहीनच आता. मस्त बीबी !
विजयजी आम्ही कधी येऊ
विजयजी आम्ही कधी येऊ बदलापूरला
:हट्ट करणारा बाहुला:
विजय मिरीची लागवड कशी करतात ?
विजय मिरीची लागवड कशी करतात ?
मी कसल्याही प्रकारची शेती
मी कसल्याही प्रकारची शेती अजुन केली नाही. घरचीही जुजबी शेती आहे, मुळ धंदा वेगळा आहे, त्यामुळे शेतीवर अवलंबुन राहावे लागत नाही.
तरी मी आजुबाजुला जे पाहतेय, वाचतेय आणि अनुभवतेय त्यातुन असे दिसतेय की रासायनिक शेती लोकांना सोपी वाटते आणि ऑर्गॅनीक (म्हणजे रसायने वापरायची नाहीत इतकेच अभिप्रेत आहे, मी नैसर्गिक शेतीबद्दल बोलत नाही इथे) कठिण. खरे तर हे अगदी अॅलोपथी आणि आयुर्वेद वापरण्यासारखे आहे. अॅलोपथी (परत रसायने) झटपट रिझल्ट्स देतात, पेशंटला मृत्युच्या दाढेतुन खेचुन काढतात त्यामुळे आपल्याला ती खुप जवळची वाटतात, पण कालांतराने लक्षात येते की याचे साईड इफेक्ट्स भरपुर आहेत, शिवाय हळुहळू तोच गुण येण्यासाठी मात्रा वाढवावी लागते (साध्या गोळीने गुण आला नाही तर डॉक्टर अजुन पॉवरफुल गोळी देतात). तेच आयुर्वेद मात्र रोग वरुन बरा करण्याऐवजी त्याच्या मुळावरच घाला घातले, योग्य सल्ला घेतला तर मुळात रोग होऊ नये यासाठी उपाययोजना केली जाते. पण हे काम वेळखाऊ आहे, उपाय दिर्घकाळ घ्यावे लागतात, पथ्ये पाळावी लागतात. दुरवरचा विचार केल्यास आयुर्वेद अलोपथीपेक्षा चांगला रिझल्ट देतो आणि हा रिझल्ट कायमस्वरुपी असतो.
आजचा शेतकरी रसायनांच्या आहारी गेलाय. अर्थात तो स्वखुशीने गेला नाहीय तर त्याला जावे लागलेय. रसायने विकणा-यांचा जगभर इतका मोठा दबदबा आहे की विकसनशील देशातल्या सरकारांना त्यांच्यापुढे नमावे लागतेच लागते. रसायनांच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनीचा कस पुर्णपणे गेलाय. अशा जमिनीतुन पिक घ्यायचे तर परत रसायनांचा आधार घेतल्याशिवाय तरणोपाय नाही. शेतक-याल रोजचे पोट भरण्यासाठी दुसरा काहीच आधार नाही, त्यामुळे त्याला मनात नसले तरी रसायनांच्या आहारी जावेच लागते. नाहीतर त्याची मुलेबाळे उपाशी मरतील. पण हे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे.
हल्लीचेच एक ताजे उदाहरण म्हणजे माझ्या मित्राच्या गावी सगळेच शेती करतात, मुख्य पिके द्राक्षे आणि डाळींब. गावातला एक प्रगतीशील शेतक-याचे गेल्या वर्षीचे उत्पन्न ६०-७० लाखाच्या घरात गेलेले. यावर्षी तो करोड गाठणार याबद्दल लोकांची खात्री होती. त्याची शेती पुर्णपणे रसायनांवर आधारीत. शिवाय अतिरिक्त मारा करुन इतरांपेक्षा लवकर पिकही तो घेतो. यावर्षी डाळींबावर तेल्या रोग आला आणि जवळजवळ ५०-६० लाखांचे नुकसान झाले. आणि तेल्या फक्त सिलेक्ट भागातच आला. रोग आलेल्या पिकाशेजारच्या दुस-या शेतात रोग आला नाही. आजुबाजुची लहान शेतक-यांची शेते, जे इतक्या मोठ्या प्रमाणात रसायने वापरत नव्हते ते सुरक्षित राहिले पण हा मात्र लुटला गेला.
रसायनांकडुन ऑरगॅनिककडॅ जाणे अजिबात सोपे नाहीय. आजवर बाहेरुन जीवनसत्वे देऊन जगवलेल्या माणसाला अचानक बाहेरची रसद तोडुन आता नीट चौरस आहार घे आणि स्वतःला जगव म्हटले तर त्याची जी काय वाट लागेल तीच त्या जमीनीची लागेल. पण हळूहळू, शेतातल्या थोड्या थोड्या तुकड्यांवर प्रयोग करुन शेवटी नैसर्गिक खते आणि नैसर्गिक किटकनाशकांकडे जाणे हेच उत्तम. जमीनीचा कस सुधारला म्हणजे पिकातली रोगप्रतिकारशक्तीही वाढेल. अशाने उद्याचे मरण टाळता येईल.
कोथिंबीर कुंडीत लावण्याविषयी
कोथिंबीर कुंडीत लावण्याविषयी मार्गदर्शन करा ना मला. माझे प्रयत्न फसलेत.
रुणुझुणु मी कुंडीतिल
रुणुझुणु मी कुंडीतिल भाज्यांचा लेखच टाकणार आहे चित्रांसकट. बरेच दिवसांपासुन फोटो तयार आहेत पण लिहायचा कंटाळा करते.
कोथिंबीरीसाठी कुंडीतिल माती थोडी उखरुन घ्यायची. पाणि घालू नका आधी मातीत. एका धण्यापासुन दोन कोथिंबीरीची रोपे येतात म्हणुन धणे पेपरवर ठेउन चामडी चप्पल किंवा लाटण्याने थोडे खरडायचे. जास्त जोर नका देउ. फक्त त्याचे दोन भाग होईपर्यंत. मग हे धणे कुंडीत पेरा. मग कुंडीतील मातीवर हात फिरवा म्हणजे धणे काही लेवलने मातीत मिसळतील. अगदी जास्त माती नाही घालायची वर. धणे दिसतात इथपर्यंतच. मग त्यावर पाणी घाला. ७-८ दिवसांत रोपे दिसायला लागतात. कोथिंबिर आमच्याकडे फक्त हिवाळ्यातच होते. हिवाळा गेला की बिच रुजत नाही. म्हणजे तिला थंड हवामानच लागत असणार.
<<म्हणजे तिला थंड हवामानच
<<म्हणजे तिला थंड हवामानच लागत असणार.>> झालं, मग आशाच संपली कोथिंबीर उगवायची.
इथे बारा महिने उन्हाळा असतो.
मला कळायचं नाही, बाकीची झाडं वाढतात ह्या मातीत, मग कोथिंबीर का नाही ? आत्ता तू सांगितल्यावर ट्यूब पेटली, हवामान पण पाहिजे ना तसंच.
जागु, माझ्याकडेही कोथींबीर
जागु, माझ्याकडेही कोथींबीर नीट येत नाही... आता हिवाळ्यात अजुन लावली नाही.
रुणुझुणु, तुझ्याकडे सगळी रेती दिसतेय... आता कलींगडे लावुन बघ ना. नदिकाठच्या वाळूत कलींगडे छान होतात असे वाचलेय. ह्या मातीतही व्हायला हरकत नाही... मी कालच माझ्या कुंडीत बी लावलेय. मे महिन्यात कलींगडेच कलिंगडे
पालेभाज्या मिळत नाही म्हणतेस ना? या मातीत मेथी पेर आणि दोन पाने आली की लगेच घे उपटुन. मस्त भाजी मिळेल तय्यार.
साधना आजच मी लावलेल्या सगळ्या
साधना आजच मी लावलेल्या सगळ्या भाज्यांचे फोटो काढले काल म्हटल्याप्रमाणे. तुझा प्रतिसादाला थोडा साजेसा माझा प्रयत्न. मी खाली लावलेल्या भाज्या फक्त मातीत रुजवल्या आहेत. मी त्याला आजिबात खत घालत नाही. त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होत नाही. शेतकरी व्यवसाय करतात त्यामुळे त्यांना हे परवडण्यासारख नाही. जी भाजी आठ दिवसांत तयार होईल तिला १५ ते २० दिवस बिना खताने तयार व्हायला वेळ लागतो. शिवाय ती फोफावत नाही. मी छोट्या छोटे वाफे करुन खालील भाजी लावली आहे. फक्त तुरीला खत घातलेय. तेही मी नसताना आमच्या गड्याने घातल. त्यामुळे तुरीला भरपुर बहर आलाय. पण पुढच्या वेळेस मी शेणखत मातीत मिसळणार आहे खतासाठी.
हा आहे लाल माठ
हिरवा माठ
पातमुळा (म्हणजे नुसता पाल्याचा मुळा. कांदेमुळ्याचे बी वेगळे असते. ते आणायच आहे अजुन)
पालक
वांग (खत घातल आहे)
वालाचा हा वेल असाच बी पडून उगवलाय पडीक जागेत सहज बघायला गेले तर भरपुर शेंगा लागल्या आहेत. वालही दवावर होतात. पाण्याची गरज नसते. ह्या रोपाला अजुन खत, पाणि घातलेल नाही.
मिरची
घरातल्या कांद्याला मोड आलेला तो असाच लावला आहे. ह्यापासुन कांदा तयार नाही होणार पण पात्या मिळतील. कांद्याचे बी मिळते त्याला कलोंजी म्हणतात. ह्या कांद्यापासुन तयार झालेल्या रोपांना उल म्हणतात. उल लावुन कांदे तयार करतात.
ही तुर (३-४ रोपटी आहेत) अशी मस्त शेंगा फुलांनी भरली आहे. खत घातल्याने तिला चांगलाच जोम आला आहे.
ही पावसाळ्यात लावली होती भेंडी आता नाहीत.
मस्त गं जागु.. माझ्या
मस्त गं जागु.. माझ्या वांग्याचे फोटो टाकते उद्या. घरची भाजी खाताना किती बरे वाटते नाही? मी एकदा माझ्या वांग्याची भाजी खाल्ली. त्यानंतर जवळजवळ महिनाभर रोपट्याला फुले आलीच नाहीत. मग एकदम फुलांनी भरुन गेले आणि आता तिन मोठी आणि अजुन ४-५ बेबी वांगी येताहेत. मोठी अजुन थोडी मोठी व्हायची वाट पहातेय. कोकण सरस मधुन सोडे घेतलेत. सोडे घालुन मस्त करणार वांगी आणि हादडणार... तोंडातुन आता खरेच लाळ गळतेय..
रुणुझुणू खरच साधना म्हणतेय
रुणुझुणू खरच साधना म्हणतेय त्याप्रमाणे मेथी लाव. मी लेख टाकणार आहे त्यात मी डेटेल देईनच. रेतीत बारीकमेथी चांगली होते.
साधना अग कलिंगडाचा वेल पसरतो. उन्हाळ्यात येणार मी तुझ्याकडे कलिंगड खायला. माझ्या वडीलांनी एकदा कलिंगडाच शेत लावल होत. पण इथे हवामान आडव येत. कलिंगड लागले भरपुर पण साईझ छोटीच होती. गोडीला मात्र खुप होते. कलिंगडचे फळ थोडे मोठे झाले की वडील त्याच्याखाली त्याला इजा होउ नये म्हणून पेंडा ठेवायचे. साधना तुलाही हा वेल खाली पसरवावा लागेल.
अगं मी याआधी केलेत कलिंगडाचे
अगं मी याआधी केलेत कलिंगडाचे प्रयोग. आयतेच उगवुन आलेले रोपटे सापडलेय प्रत्येक वेळेला. पण वेल इतका पसरतो की शेवटी कंटाळून काढुन टाकलाय. यावेळी मात्र मी टेरेस खाली केलीस. सगळी शोभेची झाडे गावी पाठवुन दिलीत आणि इथली सगळी जागा भाज्यांसाठी वापरणार असे ठरवलेय.
एकदा असेच रोप आलेले उगवुन. माझ्याकडे तेव्हा ७० कुंड्या होत्या. ह्या रोपाकडे मी पाहिलेही नाही. रोप असेच वाढत होते. आम्ही १० दिवस निलगिरीला ट्रेकला गेलो. घरी बाईला पाणी द्यायला सांगितले होते त्यामुळे झाडे जिवंत होती पण कुंड्यांमध्ये जंगल वाढले होते. एक दिवस बसुन सगळॅ जंगल साफ केले. एका कुंडीत टेनिसबॉलपेक्षा जरा मोठा हिरवा बॉल सापडला. मी ओळखलेच नाही कलिंगड. सरळ उपटुन फेकुन दिले. बिचारे टेरेसमध्ये दोन दिवस असेच पडुन होते. तिस-या दिवशी लेकीने उचलले आणि मला सांगते,' आई कलींगड बघ.' मला धक्काच बसला. तिने कलिंगड म्हटल्यावर मलाही ते लगेच तसेच वाटायला लागले. सुरीने कापुन बघते तर काय. आत मस्त लालभडक गर आणि काळ्या बिया. तिथेच उन्हात बसुन दोघींनी घरचे कलिंगड खाल्ले
मी पण कोथींबीर लावली बरेचदा
मी पण कोथींबीर लावली बरेचदा पण ३,४ इंच वाढली की लगेच फुलं येतात आणि धने येतात, पानं जास्त येतच नाहीत???
मेथी मात्र मस्त येते, आणि कमी कालावधीत वाढते.
तुळस : माझ्याकडे बी पडून जवळजवळ १००,१२५ झाडं झाली, चांगली मोठी झाली, पण आता एकदम सगळ्या झाडांवर काहीतरी किडी सारख झालय त्यामुळे पानं आकसायला लागल्येत. सगळ्या डिगश्यांवर कण कण दिसतात आणि बारीक किड दिसते.
मिरी कशी लावतात?
मिरी कशी लावतात मिरी कुंडीत
मिरी कशी लावतात
मिरी कुंडीत लावायचा प्रकार नाही. त्यामुळे आपल्यासारख्या कुंडीवाल्या लोकांनी त्याचा विचार सोडावा. जागु तुझ्याकडे नारळ किंवा सुपारीसारखे सरळ वाढणारे पण फांद्या नसलेले झाड असेल तर विचार अवश्य कर. मिरीला उन्हाळ्यात खुप पाणी घालावे लागते. त्याची तयारी ठेवावी.
मिरीचे रोप विकत आणावे लागेल. बाजारातली मिरी प्रोसेस्ड असते, त्यामुळे रुजणार नाही. तरीही कुंडीत दोनचार टाकुन पाहाव्या. लागली तर लागली. आणि जर लागलीच, तर रोप जागुला दान करावे.
जो_एस १. तुळशीची जुन पाने
जो_एस
१. तुळशीची जुन पाने तोडुन फ्रिजमध्ये ठेऊन वाळवावी. चहात घातला येते, दह्यात तुळस, कोथिंबीर, पुदिना यांची वाळलेली पाने कुसकरुन टाकायची. हे हर्बल पराठास्प्रेड मुलांना आवडते.
२. सुकलेली किंवा ओली तुळस पिज्जा आणि पास्तात वापरायची.
३. हिंग, सुकी लाल मिरची व लसुन १ लिटर पाण्यात उकडुन पाणी अर्धे झाले की ते झाडावर फवारा. किडे मरतील.
हिंग, सुकी लाल मिरची व लसुन १
हिंग, सुकी लाल मिरची व लसुन १ लिटर पाण्यात उकडुन पाणी अर्धे झाले की ते झाडावर फवारा. किडे मरतील.
साधना तिथे थंड करुन लिही ग.
तुझा कलिंगडाचा किस्सा मस्तच.
बाजारातली मिरी नाही लागत. मी केलेत प्रयत्न. साधना रोप कुठल्या नर्सरीत मिळेल मिरिच ? माझ्याकडे आहेत नारळाची झाड. एक सुपारीच पण आहे.
मी पण कोथींबीर लावली बरेचदा पण ३,४ इंच वाढली की लगेच फुलं येतात आणि धने येतात, पानं जास्त येतच नाहीत???
जोएस तुम्ही कुठे राहता ? कोथिंबीरीसाठी जमिन भुसभुशित लागते. हिवाळा संपत आला की असाच प्रकार होतो.
साधना धंन्यवाद हे करून पहातो
साधना धंन्यवाद
हे करून पहातो कारण आळू आणि जास्वंदीलाही त्या किडीची लागण होऊ लागल्ये.
तुळशीची भरपुर दिडएक हजार पानं काढली होती ती चहात वापरली पण आता या किडी मुळे नवी वाढ खुंटायला लागली आणि पानं वापरायची असतील तर रसायनं फवारता येत नाहीत.
अरे तुम्ही किती पटापट गप्पा
अरे तुम्ही किती पटापट गप्पा मारताहेत.. वाचून वाचून दमायला झाले...
सगळ्यांचे मस्त फोटो नि माहिती..
साधना.. ते भुताच्या झाडाचे काही जवळून घेतलेले फोटो आहेत का ?
योगेश तु पण पटापट सामिल हो
योगेश तु पण पटापट सामिल हो गप्पांमध्ये.
जागू, कोथीबीर थंड जागी
जागू,
कोथीबीर थंड जागी भुसबुशीत मातीत लाऊन बघतो. मी हे प्रयोग माझ्या गच्चीत करतोय.
एक निलगिरीचं झाड आलय कुंडीत. अजून तोडल नाहीये. पाहू किती वाढतय ते. पिवळा सोनट्क्का मात्र खुपच फुलला पावसाळ्यात.
मला तुमच्याइतके कळत नाही ना..
मला तुमच्याइतके कळत नाही ना.. तेवढी फुलझाडेसुद्धा नाहियेत.. माझ्याकडे दोनच झाडं आहेत.. जास्वंदी नि शेवंती..
जास्वंदी जेव्हा आणली तेव्हा छान बहरली होती.. रोजच्यारोज तीन चार कळ्या.. पण तीन चार महिन्यांनी पांढरी किड लागली.. औषधपाणी झाले.. पुन्हा कळ्या येउ लागल्या.. पण नेमके चिमण्यांचे लक्ष गेले.. नि मग दोन तीन महिने त्यांनी एकही फुल होउ दिले नाही.. सगळ्या कळ्या फस्त होउ लागल्या.. माझ्यापुढे मोठा पेच निर्माण झाला.. खासकरुन कळ्या फुलण्याआधीच कुस्ककरलेल्या बघून दु:ख व्हायचे.. तर चिमण्यांनाही दोष देण्यात अर्थ नव्हता.. जास्वंदी औषधी असते म्हणून त्यांना खायला आवडते.. ( असे ऐकून आहे..) शेवटी मी ती कुंडी कंटाळून घरातच चिमण्यांना दिसणार नाही अशी खिडकीजवळ ठेवली..सुर्यप्रकाशसुद्धा मिळेल हेही पाहिले..तेव्हा आता कुठे झाड पुन्हा कळ्यांनी बहरू लागलेय.. कालच मस्तपैंकी तीन फुल फुलली.. ! ज्याम खूष झालो आपण !
जोएस ते निलगिरीच झाड खाली
जोएस ते निलगिरीच झाड खाली नेउन लाव. खुप मोठ होत ते.
तुझ्याकडचा पिवळा सोनटक्क्याच एक रोप मला दे आणि माझ्याकडच्या पांढर्या सोनटक्याच रोप तु घे. माझ्याकडे होता आधी पिवळा सोनटक्का पण गेला आता.
मी कसल्याही प्रकारची शेती
मी कसल्याही प्रकारची शेती अजुन केली नाही. घरचीही जुजबी शेती आहे, मुळ धंदा वेगळा आहे, त्यामुळे शेतीवर अवलंबुन राहावे लागत नाही.
साधना,
तुम्ही शेती न करताही एवढं सविस्तर,गाढा अभ्यास ?????????????
(मी अगोदर स्वत:च्या गालावर एक चपटी मारुन घेऊन हे लिहितोय......)
तुम्ही तर भल्या भल्या शेतकर्यांना,त्यांच्या बीएसस्सी,एमेस्सी ऐग्री केलेल्या पोरांना देखील लाजवाल इतकं ज्ञान आहे आणी तुम्ही ते वर टायपलयं !
माझी तर शंका आहे की तुमची खुप शेती आहे,ती तुम्हीच सांभाळताय पण ते इतराम्पासुन लपवत असाल कदाचित (टैक्स वाचवायला)
अनिल आपल्याला साधनावर आता
अनिल आपल्याला साधनावर आता डिटेक्टीव सोडायला लागेल.
जागू, कोकणात मी निव
जागू, कोकणात मी निव (निव्ह्)नावाच एक फळ पाहिलय. ते खाल्ल की पोटात गेलेला केस निघातो म्हणतात.
फळ मऊ काटे असलेल असत. ते तसच खातात. चव पण छान असते.
Pages