निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईत पक्षीगणना आहे येत्या विकांताला. पेप्रात आले आहे. ज्यांना इंट्रेस्ट आहे त्यांनी सहभागी व्हा.

मंडळी
गवताच्या पेरावरील तंतूही इतके छान दिसतात, पाहिले आहेत का तुम्ही?
याचा व्यास जेम तेम ८ ते १० मीमी असेल...
पुर्वी टाकला होता हा फोटो, परत एकदा
kaate1.jpg

जो_एस ,
अप्रतिम फोटो !

साधना,
त्या फार्मचे फोटो टाक ..
त्यांचा मला पत्ताही दे, एकदा नक्की भेट देईन !

जो, अप्रतिम फोटो Happy

साधना वाचुन मलाही त्या फार्मवर जावस वाटतय. बघु कधी जायला मिळत ते.>>>>मलापण न्या Proud

बदलापुर फार्मवरचे काही फोटो

मला उचलुन घ्या असा हट्ट धरणारे नवलकोल -

नवलकोलला उचलल्यावर मुळ्यांनीही हट्ट सुरू केला -

अजुन तयार न झालेले फ्लॉवर

बाहेर डोकवायला उत्सुक आंब्याचा मोहोर

नुकतीच लावलेली चवळी आणि केळी

फोटो काढायला अनुत्सुक, पानाखाली दडलेला दुधी -

तुरीची फुले आणि शेंगा -

राजुदादांच्या बागेतले अनोखे गुलाब - चारबाजुने चार फुले आणि मध्यभागी एक फुल अशी रचना आणि जबरदस्त घमघमाटी सुगंध -

पानात दडलेली काळी मिरी - अजुन हिरवीच आहे Happy

फार्मला जाताना वाटेत भेटलेले भुताचे झाड-

उन्हाळ्यात या झाडाचा वर दिसणारा फुलोरा गळुन पडतो. झाड फिकट गुलाबीसर असे होते आणि चांदण्या रात्री चमचमते. वेड्यावाकड्या परसलेल्या लांब फांद्या असलेले हे उंच झाड रात्रीचे पाहिल्यास हमखास कोणीतरी भुत उभे आहे असेच वाटते. मी ताडोबाला पहिल्यांदा पाहिलेले हे झाड. तिथे तर अगदी अस्सल भुत उभे होते. Happy

साधना, का ग बाई जळवतीयेस? कसल्या रसरशीत दिसतायत सगळ्या भाज्या.

मला लहानपणी मुळ्याची भाजी अजिबात आवडत नसे पण एकदा असच कोणाच्यातरी फार्महाऊसवर गेलो असतानी त्यांनी त्यांच्या मळ्यातली ताजी ताजी मु़ळ्याची भाजी शिजवली होती. तेव्हापासून भयंकर आवडायला लागलाय.

बाजारात अशा भाज्या दिसत नाहीत. बाजारातल्या फ्लॉवरच्या पानांना किडीने खाल्लेले असते. केमिकल्स मारुन मारुन वाट लावतात. वरच्या फ्लॉवरचे तुरे विजयच्या मित्राने तिथे उभ्याउभ्या कच्चेच खाल्ले. धुतल्याशिवाय कुठलीही भाजी वा फळे कधीही न खाणारी मी, मुळे पाहिल्याबरोबर त्यांना धुवायच्या भानगडीतही पडले नाही, तसेच खाल्ले Happy जमिनीतुन नुकतेच उपटले असले तरी स्वच्छ होते....
(हे लिहितानाही मी तिथुन आणलेले मुळे खातेय.. Happy )

आज सकाळी प्लॉवरची पाने+मुळ्याची पाने+पालकची पाने मिळुन पराठे केलेत.. एकदम ऑर्गॅनिक नाश्ता.

विजय तुमचे मनापासुन आभार... महिन्यातुन एकदा मी येणार आता बदलापुर फार्मवर Happy

साधना माझ्याकडे आलीस की मी पण तुला फार्मवर नेईन माझ्या माहेरच्या गावात भरपुर आहेत. माझ्या माहेरीही आधी आम्ही भरपुर शेती करायचो. वांग्याचे शेत, टोमॅटोचे शेत, कोबी,फ्लॉवरचे, अलकोलचे शेत, मिरचीचे शेत, पालेभाज्या, कोथिंबिरीचे शेत. गवार, भेंडी शेत. आता नाही करत शेती. हिस्से झाल्याने सगळ्यांनी घरे बांधली आणि शेती लयाला गेली. पण माझ्या मनात आठवणि अजुन ताज्या आहेत. मी पण मळ्यात मज्जा म्हणुन काम करायला जायचे. पाटाचे पाणी सोडून पाणी घालणे हा तर माझा आवडता छंद होता.

नमस्कार निसर्गवेडी-मंडळी. (मलाबी घ्या तुमच्यात)
साधना, कित्ती दिवस लोटले, इतक्या ताज्या भाज्या खायला लांब, बघायलाही मिळाल्या नाहीयेत. Sad
हे सगळं पाहून मला रडू येणार बहुतेक Proud
आणि तो गुलाबही कसला छान आहे.
जो, फोटो मस्स्स्स्त आहे !

रुणुझुणू तुझाही काही अनुभव सांग निसर्गाबद्दलच्या ओढीचा. म्हणजे तुला काय आवड आहे ते. त्यावरुन झालेला एखादा किस्सा

जागू, माझं आजोळ खेडेगावात होतं. (म्हणजे आहे....पण आता तिथे कुणी राहत नाही, त्यामुळे जाणं होत नाही.) मी शहरात वाढलीये. ३-४ दिवस लागून सुट्टी आली की माझी गडबड असायची तिकडे पळायला.
तिथे नदीपासून ५ मिनिटांवर शेतात मामाचं घर होतं. घर पक्कं, सिमेंटचं....पण आजूबाजूला भाताची हिरवी शेतं.
मी मामीसोबत नदीवर जायचे. आणि चतुर पकदणे, लव्हाळ्यांशी खेळणं, नदीच्या पात्रातून नागरमोथा गोळा करून आईला इम्प्रेस करणं...असले उद्योग चालायचे.
आहाहा...: नॉस्टॅल्जिक बाहुली :
आजही मला निसर्गाची ओढ आहे म्हणजे नेमकं काय आहे, किंवा काय होतं कळत नाही.....पण हिरवाई पाहून पिसं लागतं. अगदी हळुवार हळुवार व्हायला होतं. Happy

रुणुझुणू मस्त ग. मला पण नदी आवडते. पण आमच्या एरियामध्ये नदी नाही. समुद्र आहे. लहान असताना आम्ही भावंड सुट्टीत रोज समुद्रावर जाउन भिजायचो.

जागु, पुण्यात समुद्र नाही, म्हणून एकेकाळी जाम वैतागायची मी. मग कॉलेजसाठी मुंबैत राहिल्यावर समुद्राचा आनंद लुटला.
आत्ता सध्या तर ६ किमीची जमीन सोडली तर आजूबाजूला समुद्रच समुद्र आहे. Proud
......पण आता इतकं निळं पाहून पाहून मला हिरवाईची ओढ लागली आहे. माबोवर कुणीही शेतातले, घाटातले हिरवे फोटो पोस्टले की कससंच होतं. Sad देशाची आठवण येते.
इथे हिरवाई म्हणजे नारळ-सुपारीची , केळीची मोठ्ठाली झाडं. गवत कुठेच नाही. सगळीकडे पांढरी वाळू.

आणि आम्ही इथे तरसतोय मालदिवला जायला मिळेल का म्हणुन Proud हिरवा नीळा, पोटातले सगळे जीवजंतुमासे बोटीतुनही स्वच्छ दाखवणारा सागर पाहायला आम्ही तळमळतोय... Happy

जागु, तुही सामिल हो पक्षीनिरिक्षणात. उरण चेही नाव आहे लिस्टमध्ये, खुप पक्षी पहायला मिळतात म्हणुन. तुला घरबसल्या काम करता येईल. मी माहिती वाचते आणि तुला कळवते.

साधना.......वेलकम. लवकर जमवा गं, मी इथे असेस्तोवर. तुमच्या नजरेतून मालदीव मला 'अनुभवता' येईल.
माझा नवरा माझ्यासोबत बेटावर भटकायला उत्सुक नसतो. एकटी जायला ऑकवर्ड वाटतं. जवळजवळ प्रत्येक व्यक्ती ओळखते. मी एकटीच भटकले, किंवा कुठल्याशा झाडाकडे टक लावून बघत बसले तर लोक मला वेड्यातच काढतील. Proud
सोबत मिळाली नाही की आवड दबून जाते, ह्या गोष्टीचं मी एक उदाहरण आहे Sad

विजय तुमचे मनापासुन आभार... महिन्यातुन एकदा मी येणार आता बदलापुर फार्मवर
साधना,
म्हणजे आता भाजी मंडईतील भाजी (ताजी,हिरवी आणि रसायनदार) खरेदी बंद म्हणायची का ?
Lol

वांग्याचे शेत, टोमॅटोचे शेत, कोबी,फ्लॉवरचे, अलकोलचे शेत, मिरचीचे शेत, पालेभाज्या, कोथिंबिरीचे शेत.
जागु,
वांगी,टोमैटो ,कोबी माहीत आहे पण हे "अल्कोल (नक्की अल्कोहोलच असणार)" पीकाबद्दल माहिती घ्यायला नक्की आवडेल, अंगणातच त्यांची झाडे लावता येतील
:स्मितः

अनिल त्याला नवअलकोल म्हणतात. वरती साधनानी दिलेल्या फोटोत पहिले दोन फोटो नवअलकोलचेच आहेत.

साधना, कित्ती दिवस लोटले, इतक्या ताज्या भाज्या खायला लांब, बघायलाही मिळाल्या नाहीयेत
रुणुझुणु,
त्यात एवढं वाईट नको वाटुन घेऊस ...
तसं इकडे भारतात देखील असल्या ताज्या भाज्या आजकाल कुठे मिळता खायला,कारण नुसत्या (हायब्रीड आणि रसायनमिश्रीत) भाज्या ५० रु. च्या खाली नाही मिळत तिथे अशा ऑरगैनिक कुठे परवडणार ?
आणि शेवटी दिव्याखाली अंधार त्याप्रमाणे इथला शेतकरी काही प्रमाणात अशा अस्सल भाज्या,फळे,धान्य पिकवतो पण त्यातलं तो किती खातो (खायला परवडतं नाही,खाल्ल तर विकणार काय?) हा मला पडलेला प्रश्नच आहे ..
ही थोडी आतिश्योक्ती वाटेल पण यात तथ्य नक्कीच आहे,(किमान स्त्रियांच्या बाबतीत तरी.

ही थोडी आतिश्योक्ती वाटेल पण यात तथ्य नक्कीच आहे,(किमान स्त्रियांच्या बाबतीत तरी.

???? काय कळले नाही तुला काय म्हणायचेय ते???

बाकी इतर काही जे तु लिहिलेय ते बरोबर आहे. बाजारातल्या भाज्या रसायने फवारलेल्या आहेत.

ऑर्गॅनिक भाज्या लोकांना परवडणार नाही असा युक्तिवाद ऑर्गॅनिकवाल्यांकडुन केला जातो. त्यांच्या मते ऑर्गॅनिकचे पिक कमी येते म्हणुन रेट जास्त. मला तरी हे खोटे वाटते. रासायनिक खतांना सरावलेल्या जमिनीला परत नैसर्गिक खतांसाठी तयार करण्यासाठी जो वेळ जाईल तेवढाच. त्यानंतर रसायने किंवा नैसर्गिक दोघांची उत्पादकता सारखीच असणार. किंबहुना असलीच पाहिजे. केवळ स्वतःच्या फायद्यासाठी ऑर्गॅनिकवाले भाज्या महाग करतात आणि केवळ उच्चभृ लोकच ह्या भाज्या खाऊ शकतात. मुंबईच्या अनेक श्रीमंत वस्तीतल्या दुकानांमध्ये मी ऑर्गॅनिक कडधान्ये, भाज्या इ. दुपटीपेक्षा जास्त किमतीला विकताना पाहिलेय.
(राजुदादांशी चर्चा करायला पाहिजे या विषयावर).

पिकवतो पण त्यातलं तो किती खातो (खायला परवडतं नाही,खाल्ल तर विकणार काय?) हा मला पडलेला प्रश्नच आहे ..
ही थोडी आतिश्योक्ती वाटेल पण यात तथ्य नक्कीच आहे,(किमान स्त्रियांच्या बाबतीत तरी.

ज्याच्या कडे पिकत ते मुबलक प्रमाणात असत. कधी कधी टाकुन द्यायचीही वेळ येते. अगदी भाजी विकणार्‍यांच्या बाबतीतही अस होत. एकवेळ शिजवलेल्या अन्नाबद्दल स्त्रियांच्या बाबतीत पुरवठा करण्यासाठी अस घडत असत काही ठिकाणी.

???? काय कळले नाही तुला काय म्हणायचेय ते???
साधना,
थोडं विषयांतर होतयं पण
माझ ते मत थोडं सर्वसाधारण लहान शेतकरी आहेत त्यांच्याबद्दल आहे
मला एवढचं म्हणायचं होतं कि शेतकर्‍यांनी स्वतः पिकवलेले जेवढं खाल्ल पाहिजे किंवा घरच्यांकरता वापर केला पाहिजे तेवढा होताना दिसत नाही ,या मागे अज्ञान/दुर्लक्ष हे एक मुख्य कारण आहे, त्याबरोबरच तो बर्‍याचदा चांगला आणि अस्सल माल अगोदर बाजारात विकतो, राहिलेला घरी वापरतो ...
घरात ७-८ लीटर दुध निघतं पण घरातल्या मुलांना १-२ लीटर प्यायला द्यायचं धाडस करणारे किती आहेत् ..

ऑरगैनिक शेती करायला सुरुवातीला तर खर्चिक, अवघड आहेच,कारण अलिकडे पिकांवरचे रोग इतके वाढलेत (ताकदीनेही वाढलेत) कि अनेक किटकनाशक,बुरशीनाशक वापरुन देखील कधी कधी ते आटोक्यात येत नाहीत,त्यामुळे ऐनवेळी नुकसान होतं ,या परिस्थितीत हे न करता पीक आणणं हे तेवढं सोपं नाही, त्यात तुम्हाला देशी औषधं (कडुलिंब,गुळ,गाईच मलमुत्र इत्यादी) तर वापरावी लागणारच

जिथे आजुबाजुला खुप बागाईत असेल,समजा द्राक्ष बागा असतील,किंवा भाजीपाला असेल आणि सगळे बेसुमार औषधांचा फवारा करत असतील तर त्या तुम्ही एकट्यांनी औषध न मारता पीक आणणं एवढं सोप नाही ,बाकी जिथे अशा पिकांची कमी गर्दी आहे किंवा शहरांजवळच्या शेतीला मात्र यात फायदा खुप आहे.गावाकडे सध्याही कोणतही औषध न मारलेला कांदा,मुळा,कोबी ,मेथी पेंढी यांचा दर हा अनुक्रमे १०-१५, ४-७, ७-१०, १-३ रु. च्या वर कधीच गेलेला दिसत नाही, कारण बहुतेकांना मुंबई खुप दुर है और पेट्रोल्-डिझेलचे दर तर वाहतुक दारांसाठी खुपच वाढले आहेत

Happy

Pages