Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पीव्हीसी म्हणजे vinyl. त्याला
पीव्हीसी म्हणजे vinyl. त्याला पाणी चालते म्हणून हे flooring किचनमध्ये, बाथरुममध्ये वापरतात. हे बर्याच रंगात आणि डिझाइन्समध्ये येते. ग्लॉसी असते. लॅमिनेट वेगळे.
पक्क्या, माझं गाव चाकणात नाही
पक्क्या, माझं गाव चाकणात नाही अन कोकणातही नाही.
माझं गाव मुळशी तालुक्यात 'बावधन' जवळ आहे.
http://www.maayboli.com/node/15736
बाकी नी , तुमच्या घर बांधून झाल्यावर जरूर पहायला आवडेल. निदान छायचित्रातून तरी. कारण पुढच्या ऑक्टोबर मधे आमच्या फार्म हाऊसचे काम सुरू करणार आहे. ते फार्महाऊस वरील लिंक दिलेल्या फोटोंमधल्या शेतातच बांधलं जाणार आहे.
पुण्यात, उत्कॄष्ट आर्कीटेक्टस, इंटेरीअर डिझायनरस, कारपेंटर्स यांची कमी नाही. पुणे शहराच्या झपाट्याने होणार बांधकाम क्षेत्रातला विकास पाहून इथे त्यांना बराच वाव आहे.
अरे वा ! सुकि मी पण येणार
अरे वा ! सुकि मी पण येणार तुझं आणि नीरजाचं घर बघायला. तुझं घाटावरचं आणि नीरजाचं कोकणातलं, वेगवेगळे फ्लेवर्स असतील
झालं बांधून की जरूर टाकेन
झालं बांधून की जरूर टाकेन फोटो. एखादं ललितही पाडेन बहुतेक...
आमचा इंटीरीयर डेकोरेटर पण
आमचा इंटीरीयर डेकोरेटर पण चांगला आहे असावा. घरी पहील्यांदा आलेल्या अनेक पाहुण्यांनी त्याला अॅप्रिशिएट केले आहे. कुणाला संपर्क हवा असल्यास कळवावे. त्याआधी घर बघायचे असल्यासही कल्पना द्यावी.
भारतात पिव्हिसी वुडन फ्लोरिंग >>>>
असा काहीही प्रकार नाही/नसावा. पिव्हीसी मटेरीयल मधे वुडन डिझाईनचे मटेरीयल असेल.
शहाबादी फरशांची (कोटा स्टोन?)
शहाबादी फरशांची (कोटा स्टोन?) मुंबईच्या हवेला खूप चांगली वाटली मला. गारवा रहातो, टिकायला दणकट, मस्त पॉलीश करून घेतले की छान दिसतात, साफ करायला एकदम सोप्या. हल्ली एकाच शेडच्या फरशा मिळतात त्यामुळे आणखीनच मस्त दिसतात. मधे मधे मार्बल / ग्रॅनाईटचे तुकडे, पट्ट्या टाकून एकदम रॉयल लूक देता येतो.
नीरजा सारखी व्यक्ती इथे असताना पडदे, बेड / सोफा कवर्स अशा महत्वाच्या बाबींबद्दल काहीच चर्चा नाही झाली अजून? हल्ली तेच तेच पडदे बघून खूप कंटाळा आलाय. नीरजा तुम्ही काही तरी वेगळे सुचवा ना.
शहाबादी फरशांची (कोटा स्टोन?)
शहाबादी फरशांची (कोटा स्टोन?) >>> शहाबादी फरशा व कोटा हे २ वेगळे प्रकार आहेत.. शहाबाद मध्ये साधे जे पुर्वी च्या घरात वापरायचे ..एकदम रफ टाईप्स..आणि पॉलिश शहाबाद जे दिसायला थोडेसे कोटा सारखे दिसते पण कोटा नसते..
कोटा हे थोडा जास्त चांगल्या प्रतीचे असते आणि पॉलिश शहाबाद पेक्षा महाग पडते.. कोटा मध्येहि साधे पॉलिश आणि मिरर पॉलिश असे २ प्रकार असतात..
धन्यवाद मृनीश. मला पण ते
धन्यवाद मृनीश. मला पण ते वेगवेगळेच वाटत होते पण माझ्या कडीयाने ते एकच आहेत असे सांगितले मला. म्हणूनच मी वरच्या पोस्ट मध्ये ? टाकले होते.
मिरर पॉलिश >>> माझ्या घरी
मिरर पॉलिश >>> माझ्या घरी आहे, खरच खुप छान दिसत.
खूप छान बाफ. माझ्याकडे वूड्न
खूप छान बाफ.
माझ्याकडे वूड्न इफेक्ट्च्या सिरॅमिक टाइल्स आहेत. दोन दा पुसले दिवसातून तरी चालते. मी सर्व फ्लोरिन्ग मधून मधून इजी ऑफ बँग ने साफ करते. दोन टाइल्स च्या मध्ये काळी घाण जमते ती टूथ ब्रश ने घासून बँग लावून जाते. व मस्त साफ दिसते.
बेड सोफा, कर्टन्स साठी आता खूप चॉइसेस आहेत. माझ्या ब्लू बेडरूम मध्ये मी वेस्टिन बेड सारखा बनविला आहे. सुंदर सफेद व अतिशय आराम दायक. उठावेसेच वाट्त नाही. ब्लू वॉल्स व नाजूक व्हायोलेट रंगाचे पड्दे आहेत. दुसरी पिंक रूम आहे. दोन्ही ठिकाणी व्हॅनिला व लवेंडर वासाच्या पोपुरी आहेत. मंद सुवास येतो.
मी तीन वर्से जेन्सन निकोल्सन रंग कंपनीत रंग सल्लागार म्हणून काम केले आहे. घराचे कलरिंग पण उत्तम असले तर एक सुंदर उठाव येतो. त्याचे पण खास टेक्निक असते.
सोफा केल्यास वर साधे एक पांढरे कव्हर पण शिवून घ्यावे. ते रोज घालावे. खास दावत असेल त्या दिवशी
कवर काढावे. स्वच्छ व सुरेख दिसते. नवीन वर्षा निमित्त मी घरात सर्वत्र गुलाबी ब्लश कलरचे गुलाब- कळ्या ठेवले आहेत. खूप प्रसन्न दिसते.
बरोबर माधव..काही ठिकाणी
बरोबर माधव..काही ठिकाणी बिल्डर २ ही एकच असे सांगतात आणि पॉलिश शहाबाद बसवुन कोटा चे पैसे घेतात..म्हणुन मी फरक सांगितला म्हणजे कोणी फसायला नको..
एशियन पेंटस च्या होम
एशियन पेंटस च्या होम सोल्युशन्स या सर्व्हिसबद्दल कोणाचे काही बरे/वाईट अनुभव?
खरच छान बाफ, सगळा वाचला आवडला
खरच छान बाफ, सगळा वाचला आवडला
घरात जास्त सामान (फर्निचर वै.) ठेऊन जागा न अडकवता मोजक्याच लागणार्या वस्तु आणाव्यात हे कस वाटत.
लिविंग रुम मध्ये सीटिंग (सोफा, चेअर्स, कॉफी टेबल), TV, आणी ४-५ ड्रॉवर असलेल कपाट/फर्निचर ह्या शीवाय आणखी काही आवश्यक असत का?
आजकाल TV भींतीला लावतात, टि.व्ही. ट्रॉली वा फर्निचर सरफेस वर ठेवण Out of Fashion वाटत का?
एशियन पेंटस च्या होम
एशियन पेंटस च्या होम सोल्युशन्स या सर्व्हिसबद्दल कोणाचे काही बरे/वाईट अनुभव?>>
एशियन पेंटस कडुन मि घर कलर करुन घेतलेल ५ वर्षांपुर्वी. अजुनही नवीनच्या नवीन रंग आहे. भिंती फुसुन घेतल्या तरी चालतात. नंबर विचाराल तर नाही आहे, वेबसाईटवर इन्फो आहे. त्यांच्या लोकांनी कलर खुपच चांगल्या पध्द्तिने केला. अगदी प्रोफेशनल.
गोदरेज इन्टरियोच फर्निचर एकद्म चांगल आहे. जुनी गोदरेजची कपाट होति त्याला पण त्यांनी नविन लुक दिला आहे. आपल्या गरजेप्रमाणे मॉडीफाय करता येतात. हवितशी उंची, शेल्फ. शिवाय वेगवेगळे रंग पण आहेत.
जुनी गोदरेजची कपाट होति
जुनी गोदरेजची कपाट होति त्याला पण त्यांनी नविन लुक दिला आहे. आपल्या गरजेप्रमाणे मॉडीफाय करता येतात. हवितशी उंची, शेल्फ. शिवाय वेगवेगळे रंग पण आहेत.
>>>
माझ्याकडे आहे ते. पण दणकटपणा नाही त्याला. दिसायला एकदम ढासू आहे मात्र. कलर्स ची रेंज छान आहे. पण एका जागेवरून दुसरीकडे (एका खोलीतून दुसरीकडे) हलवायला गेल्यास दारांचे alignment बिघडते. त्यामुळे प्रत्येक वेळी डीसमँटल करायला गोदरेजची माणसे बोलवावी लागतात. same with godrej double bed as well! आणि प्रत्येक वेळी त्याचे चार्जेस घेतात. मिनिमम २५० रु.
किचन-प्लॅटफॉर्म आणि त्यावर
किचन-प्लॅटफॉर्म आणि त्यावर असणारी खिडकी याबद्दल माबोकरांच्या सूचना हव्या आहेत.
माझं स्वयंपाकघर पूर्व दिशेला आहे. त्यामुळे सकाळी रोजच उन्हाशी सामना करावा लागतो.
ओट्याची उंची ३१ इन्च. त्यावर २ फूट tiles,त्यावर अडीच फूट उंच खिड्की, व परत छतापर्यंत tiles
असं सगळीकडे असतं तसंच सद्ध्या डिझाईन आहे.पण त्यामुळे ओट्यावर कमी प्रकाश आणि डोळ्यावर सूर्यप्रकाश
असं काम करावं लागतं.(पडदा लावला की कोंदट वाटतं)
या रचनेत काही बदल करून कोणी किचन केलय का?
म्हणजे............. ३१ इन्च ओटा. मग दीड फूट sliding window.आणि त्याच्यावर tiles असं.............
यामुळे ओट्यावर, सिंकमधे natural light असेल आणि डोळ्यावर सूर्य येणार नाही...........
एशियन पेंट्स वाल्यांकडून
एशियन पेंट्स वाल्यांकडून माझ्या आईवडीलांनी पुण्यात घर पेंट करून घेतले ३ वर्षांपूर्वी. एकदम चांगले काम करतात. त्यांचे वेगवेगळे पॅकेज असते आपल्याला योग्य वाटते ते घ्यायचे.
२ बेडरूमच्या फ्लॅटला त्यांनी २५-३० हजार घेतले होते (नक्की माहीत नाही मला), माझ्या आई-वडीलांच्या मते एवढे पैसे थोडे महाग वाटत असले तरी काम बघीतल्यावर मात्र एकदम योग्य वाटतात. नंतर ४-६ महिन्यांनी पावसाळ्यात ओल आल्याने एक दोन ठिकाणी पोपडे आले होते तिथे ते परत एकदा येवून टच अप्स करून गेले.
हा प्रश्न कदाचित या धाग्याला
हा प्रश्न कदाचित या धाग्याला अनुसरून नसेल पण गृहोपयोगी वस्तू, उपकरणे (स्वयंपाकघर सोडून) यासाठी दुसरा कुठला धागा मिळाला नाही म्हणून इथे प्रश्न विचारते.
बेडच्या खाली रहातील असे प्लास्टीकचे स्टोरेज बॉक्सेस, चाकं असलेले असे मी कोणे एके काळी मुंबईत बिग बझार(फिनिक्स मॉल, परळ) मधे पाह्यले होते पण ते आता तिथे नाहीयेत बहुतेक तरी.
ते तसे मुंबईत अजून कुठे मिळू शकतील हे कोणी सांगू शकेल का?
केवळ कल्पना यावी म्हणून हे दोन फोटो बघा.
http://www.wannapack.co.uk/media/catalog/product/cache/1/image/5e06319ed...
http://www.acehardware.com/product/index.jsp?productId=1273692
हा प्रश्न कदाचित या धाग्याला
हा प्रश्न कदाचित या धाग्याला अनुसरून नसेल पण गृहोपयोगी वस्तू, उपकरणे (स्वयंपाकघर सोडून) यासाठी दुसरा कुठला धागा मिळाला नाही म्हणून इथे प्रश्न विचारते.
>>>
नी, हा प्रश्न इथे योग्यच आहे. मला या धाग्यात घराशी संबंधित सर्व काही अपेक्षित होतं हा धागा काढताना. पण धाग्याच्या इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं नाही म्हणून तुला हा प्रश्न पडला. आता अॅडते हे सुद्धा.
म्हणजे थोडक्यात स्टोरेज नसलेल्या (खालून मोकळ्या असलेल्या) पलंगाकरीता असे व्हीलवरचे स्टोरेज बॉक्सेस हवेत का तुला, नी??
हो तेच म्हणलंय मी.
हो तेच म्हणलंय मी.
नी, मला वाटतं गोदरेज इंटीरीओ
नी, मला वाटतं गोदरेज इंटीरीओ वाले असे कस्टमाईज्ड स्टोरेजेस बनवून देतात. पण प्लास्टीकचे नाहीत बहुतेक. तिथे चौकशी केलीयेस का??
निंबुडा तू जरा लिंक बघतेस का
निंबुडा तू जरा लिंक बघतेस का आधी?
मला प्लास्टिक बॉक्सेस च हवेत.
निंबुडा तू जरा लिंक बघतेस का
निंबुडा तू जरा लिंक बघतेस का आधी? >> सॉरी. ऑफीस मध्ये नो अॅक्सेस.
प्लास्टीकचेच असं ठळकपणे मेंशन नव्हतं तुझ्या पोस्ट मध्ये, म्हणून गोदरेज इंटीरीओ चा ऑप्शन सुचवला.
नी हायपर सिटी मलाड मध्ये
नी हायपर सिटी मलाड मध्ये किंवा शॉपर्स स्टॉपमध्ये मिळेल वाटत.
मालाड हायपर सिटीमधे बघितले
मालाड हायपर सिटीमधे बघितले गं. नाहीयेत.
शॉपर्स स्टॉप कुठलं? सगळीकडेच नसतो सगळा स्टॉक.
खूप विचारांती शवटी घरात
खूप विचारांती शवटी घरात पीव्हीसी फ्लोरींग करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. पीव्हीसी च्या स्ट्रीप्स आणि टाईल्स असे दोन प्रकार बघायला मिळाले. स्ट्रीप्स प्रकारात वूडन फील (टच नव्हे) असलेले सँपल्स होते. पण टाईल्स प्रकारात नव्हते. त्यामुळे हॉल आणि बेडरूम मध्ये वूडन फील स्ट्रीप्स आणि किचन मध्ये कॉम्बिनेशन मध्ये टाईल्स असे करण्याचे ठरले आहे.
स्ट्रीप्स आणि टाईल्स ची मिनिमम जाडी किती असावी? 1.2 mm to 2.2 mm च्या रेंजमधले सँपल्स आम्ही बघितले.
घरात सध्या रंगकाम चालू केले आहे. ते संपले की पीव्हीसी फ्लोरींग करणार.
पीव्हीसी करून देणार्याने सांगितले की स्कर्टिंगला पीव्हीसी बसवता येत नाही. त्यामुळे घराला कलर करताना ऑईल पेंट लावून घ्या. whereas रंगार्याने सांगितले की स्कर्टिंगला ऑईल पेंट एकदम बकवास दिसेल. आणो पीव्हीसी स्कर्टिंगला लावता येते. फक्त कटिंगला वगैरे खूप मेहनत लागते आणि किचकट काम आहे. त्यामुळे ते टाळण्याच्या दृष्टीने पीव्हीसी वाला काँट्रॅक्टर तसे म्हणतोय. कुणाला या विषयी काही माहीत आहे का?
घरात सध्या वॉल टू वॉल कारपेट आहे. ते काढणे खूप जिकिरीचे असते का? ते काढल्याशिवाय पीव्हीसी फ्लोरींग लावता येणार नाहीये. आणि ते काढण्याचा extra charge लागेल असे पीव्हीसी करून देणार्याने सांगितले. extra charge लागेल इतपत कठिण काम आहे का ते?
शॉपर्स स्टॉप कुठलं? सगळीकडेच
शॉपर्स स्टॉप कुठलं? सगळीकडेच नसतो सगळा स्टॉक.>>>
मलाड शॉपर्सस्टॉप ला होम शॉप आहे २र्या मजल्यावर. तिथे मस्त मस्त स्ट्फ असतात.
त्याशिवाय तिथे ह्यानड्लुम एंपोरियम च पण आउअटलेट आहे.
ओके ओके. बघेन आता.
ओके ओके. बघेन आता.
पीव्हीसी करून देणार्याने
पीव्हीसी करून देणार्याने सांगितले की स्कर्टिंगला पीव्हीसी बसवता येत नाही. त्यामुळे घराला कलर करताना ऑईल पेंट लावून घ्या. whereas रंगार्याने सांगितले की स्कर्टिंगला ऑईल पेंट एकदम बकवास दिसेल. आणो पीव्हीसी स्कर्टिंगला लावता येते. फक्त कटिंगला वगैरे खूप मेहनत लागते आणि किचकट काम आहे. त्यामुळे ते टाळण्याच्या दृष्टीने पीव्हीसी वाला काँट्रॅक्टर तसे म्हणतोय. कुणाला या विषयी काही माहीत आहे का?
घरात सध्या वॉल टू वॉल कारपेट आहे. ते काढणे खूप जिकिरीचे असते का? ते काढल्याशिवाय पीव्हीसी फ्लोरींग लावता येणार नाहीये. आणि ते काढण्याचा extra charge लागेल असे पीव्हीसी करून देणार्याने सांगितले. extra charge लागेल इतपत कठिण काम आहे का ते?>>>>>
रंगार्याने दिलेली माहिती बरोबर आहे.. स्कर्टींगला ऑइल पेन्ट अगदीच वाईट दिसेल.. आणि स्कर्टींग मग ते टाइल्सचे असले तरी किचकटच असते.. कारण स्कर्टींगसाठी बर्यापैकी कटींग करावे लागते..
आधीचे जे कारपेट लावले आहे ते कुठले सोल्युशन वापरुन लावले आहे त्यानुसार ते काढायला किती अवघड आहे ते अवलंबून आहे... जनरली जे सोल्युशन वापरतात ते रबर सोल्युशन असते. ते काढण्यासाठी कारपेट गरम केले की निघते... आणि extra charge किचकटपणामुळे नाही तर त्यांच्या नेहमीच्या वेळा पेक्षा जास्त वेळ लागतो त्यासाठी घेणार... समजा एका खोलीला पीव्हीसी लावायला १ दिवस लागत असेल तर आधीचे काढून नवीन लावायला दिड दिवसाचा वेळ लागेल... त्यामुळे त्याच्यासाठी जास्त पैसे घेणारच...
नीधप, मीपण लो परळाच्या बिग
नीधप, मीपण लो परळाच्या बिग बझारमधनं आणलेत ४-५. इन फॅक्ट माझ्या बिल्डिंगमधल्या बर्याच बायांनी ते फटाफट घेतले. म्हणूनच संपले असावेत.
असो. मी आठवड्यातून किमान एक चक्कर बिग बजारला मारतेच. दिसले तर कळवीनच.
पण दादरला किर्तीकरमार्केटात असू शकतील. किंवा माहिमच्या मॅग्नेटमध्ये?
Pages