पुण्यात घर घ्यायचय?

Submitted by नानबा on 16 May, 2010 - 10:33

ह्या धाग्याच्या मूळ उद्देशात मी गृप बूकिंगसाठी लोक जमतात का हे पहायचं असं लिहिलं होतं..
पण काही प्रतिसादांमधे असे गृप ऑल्रेडी आहेत आणि त्यांना अनुभवही आहे असे प्रतिसाद आले - त्यांचं म्हणणं पटल्यानं आणि चर्चेचं मूळ स्वरूप हळूहळू बदलून "पुण्यातल्या चालू प्रोजेक्ट्सची/लोकेशन्सची माहिती/घर विकत घेताना लक्षात घ्यायच्या गोष्टी" - असं झाल्यानं माझं हे मुळच पोस्ट मी बदलतेय.
--- पुण्यात घर विकत घेऊ इच्छिणार्‍यांना शक्य ती माहिती मिळावी - म्हणून हा बाफ!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, सुपर बिल्ट अप च्या नावाखाली चार्जेस आकारले आहेत, टाऊनशीप आहे पण हॉस्पीटल नाही पण स्वीमींग पुल, जीम, देऊळ, गार्डन आहे, क्लब हाऊस पण असेल.

Minimum Agreement बद्दल थोडीफार माहिती मीळाली,६०-८० हजार वाचविण्यासाठी अस अ‍ॅग्रीमेंट करु नये अस आम्हाला वाटतय तर काहीजण पैसा वाचवायचा चान्स आहे तर ट्राय करायला हरकत काय म्हणतात.

सगळेच बिल्डर्स "कॉर्पस" चार्जेस घेत नाहीत्,पण हा बिल्डर सगळ्यां कडुन कॉर्पस चार्जेस घेतोय म्हटल्यावर काही बोलता येत नाही Sad

Corpus Charge is skinking fund for future Common repairs of the Township अस बिल्डर म्हणाला पण जेव्हा जेव्हा ह्या फंड मधुन पैसा वापरला जाईल तेव्हा लगेच कॉन्ट्रि काढुन सदस्यांना परत ह्या फंडला मुळ रकमेवर आणुन ठेवाव लागेल.

प्रत्येक सदस्याला सारखाच ४५-५० हजार Corpus लावलाय अस बिल्डर म्हणाला ह्या बाबत आम्हाला शंका आहे ज्यांनी २-४ वर्षांपुर्वी बुकींग मध्ये घर घेतली त्यांना पण ईतका कॉर्पस कसा आकारला असेल?

रेडी वा जवळ जवळ होत आलेली घर घेतांना बहुदा बराच जास्त Extra पैसा जातो.

अनिल,
छान आणि वेगळी माहिती !
धन्यवाद !
एकदा जागा बघायला आवडेल !
बाकी एका कर्नलकडे एवढी जमीन अस शकते ,याचं मात्र विषेश वाटलं !
Happy

सुमेधा जी

डीएसके विश्व चांगली आहे स्कीम. या रहायला लवकर. ( पाणी मात्र थेट धरणातून उचललेले आहे. शुद्धीकरणाची यंत्रणा स्वतःची आहे. त्याचं बिल इतर कुठल्याही स्कीम पेक्षा जास्त येतं. त्यावरून डीएसके आणि रहिवासी यांच्यात मोठा वाद आहे.)

अनिलजी, धन्यवाद. सध्या फार महाग भाव चालु आहे तिथे. गच्चिचे पण पुर्ण पैसे मागत आहेत. आणि ओपन पार्किन्ग चे दीड लाख. जरा जास्त महाग वाटते आहे. त्याच एरिआत इतरत्र कमि भावात जागा अस्तिल तर बघावे असे वाटते आहे तसेच नान्देड सिटि पण बघायला हवि. तिथे २९०० भाव आहे. DSK madhe toch bhav 3400 ahe.

मी सांगतो तुम्हाला नक्की. तुम्ही देखील धायरी कात्रज रस्त्यावर काही चांगल्या स्कीम्स चालू आहेत त्या नजरेखालून घाला. डीएसके दर कमी करत नाहीत पण हे लोक थोडी सूट देऊ शकतात.

"घर बँक लोन काढुन विकत घेतल तर टॅक्स वाचतो पण आपण घेतलेल्या लोन वर बराच व्याज भरतो त्यामुळे वर्षांनंतर म्हणजे लोन कालावधी संपल्यावर वा लोन फेडल्या नंतर घर आपल्याला मुळ किंमती पेक्षा बर्‍याच जास्त किमतीत पडलेल असत .

लोन मुळे टॅक्स वाचत असला तरी व्याजाच्या रुपातुन आपला बराच पैसा जातो जो वाचलेल्या टॅक्स च्या रकमे पेक्षा बराच जास्त असतो.

तेव्हा कमीत कमी किंवा शक्य असेल तर लोन न काढता घर विकत घ्याव."

ह्या बाबत माबो करांना काय वाटत, वरील विधान बरोबर आहेत का, तुमचे ह्या बाबत काय अनुभव आहेत.

(ह्य अगोदर हि चर्चा इथे कुठे झाली असेल तर प्लीज त्याची लींक देणे)

आमचा औंध्-बाणेर कडे घर घेण्याचा विचार बदललाय्..सध्या कोरेगाव्-पार्क अ‍ॅनेक्स, मगरपट्टा सिटी आणि आजूबाजूचा भाग सोयिस्कर वाटतोय. कुणाला काही माहिती असल्यास प्लीज कळवा.
अनिल सोनवणे, तुम्ही जो भाग म्हणताय तो सोलापूर हायवे कडे येतो का?

@समु
नक्कीच.... व्याजात खुप पैसा जातो Sad
पण आजकाल घराच्या किमती बघता नोकरदार लोकांना कर्ज न काढता कॅश घर घेणे जवळजवळ अशक्यच!
तरी शक्यतो जास्तीत जास्त डाउनपेमेंट करावे (शक्य असल्यास आई-वडीलांकडून किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांकडून कर्जाऊ रक्कम (बिनव्याजी Happy ) घ्यावी आणि होमलोनचा भार कमीत कमी ठेवावा Happy

कर्ज कमी ठेवावे असे वाटणे ठीक आहे पण वाढत्या इन्फेशनचाही विचार करावा. आज जास्त वाटणारा हफ्ता काही वर्षांनी कमी वाटु शकतो. त्यामुळे दोन्ही अंगांचा वापर व्हावा असे मला वाटते.

स्टँप ड्युटी आणी रेजीस्ट्रेशन चार्जेस कमी लागण्या साठी बिल्डरला काही रक्क्म कॅश देण हे तुम्हाला योग्य वाटत का? >>

नाही! .
ब्लॅक मनी जनरेशन / भ्रष्टाचार ह्यांना आपणच नावे ठेवतो, आपणच मग ते करणे योग्य वाटते का? "५ पैसे जास्त गेले तरी चालतील पण करणार ते पांढर्‍यातच" असा दृष्टीकोण ठेवा.

अनिल सोनवणे, तुम्ही जो भाग म्हणताय तो सोलापूर हायवे कडे येतो का?

फक्त अनिल म्हणालात तर छान वाटेल. असं पुर्ण नावाने हाक ऐकायची सवय नसल्याने जरा विचित्र वाटतंय Happy

हा भाग सिंहगड रस्ता या विभागात येतो. धायरी गावातून बंगळुरू महामार्गाला समांतर रस्ता जातो. शास्त्री भवन, बेनकर वस्ती, पारी कंपनी ( रोबोटिक्सच्या क्षेत्रातील विख्यात कंपनी) इथं या रस्त्यावर जी गृहसंकुलं आहेत त्याबद्दल बोललो होतो.

नाही! .
ब्लॅक मनी जनरेशन / भ्रष्टाचार ह्यांना आपणच नावे ठेवतो, आपणच मग ते करणे योग्य वाटते का? "५ पैसे जास्त गेले तरी चालतील पण करणार ते पांढर्‍यातच" असा दृष्टीकोण ठेवा.
>> अगदी अगदी केदार

ब्लॅक मनी जनरेशन / भ्रष्टाचार ह्यांना आपणच नावे ठेवतो, आपणच मग ते करणे योग्य वाटते का? "५ पैसे जास्त गेले तरी चालतील पण करणार ते पांढर्‍यातच>>>>>>>>> हो अगदि बरोबर!!!! घरी सगळ्यांच्याच मनात आणी डोक्यात हेच विचार आलेले नर्णय घेतांना. Happy

स्वरुप, नात्या,
ताई कडचे आणी आम्ही मीळुन घर घेण्याचा विचार आहे. घरचे, नातलग यांच्या कडुन (बिनव्याजी) रक्कम जमा होऊ शकते. मग गरज नसतांना कर्ज नको शीवाय टॅक्स पेक्षा व्याज जास्त पडतो अस घरातल्या मोठ्यांच म्हणण आहे.

बाळु,
१ जानेवारी २०११ पासुन स्टँप ड्युटी वाढणार आहे अस आम्ही पण एकलेल म्हणुन आम्ही घराची अ‍ॅग्रीमेंट करुन घेतली १-२ दिवसांपुर्वी.

सर्व्हिस टॅक्स आणी आणखी एक चार्ज (वॅट बहुदा) सरकार लागु करणार आहे ना नविन वर्षा पासुन, कि तो आम्हाला पण द्यावा लागेल?

बिल्डरने स्टँप ड्युटी आणी Registration ६% आकारल आहे, ह्यात सर्व्हिस टॅक्स आणी वॅट आकारल नसेल ना? घर रेडी पजेशन मधल आहे. तळेगावच्या स्टँप ड्युटी आणी Registration चार्जेस बद्दल कुणाला माहिती आहे का प्लीज?

@बाळू जोशी:
माझ्या माहितीप्रमाणे - ती सगळी जमीन मारूती देवस्थानच्या मालकीची होती. राहुलपार्क वाल्यानं ती सगळी मिळून ५ कोटीला पूर्वी विकत घेतली.. त्यानंतर त्यांच्यावर पूर्वीच्या जमीन मालकानं केस केली की फसवून कमी पैशाला जमीन घेतली.. त्यामुळे डी आणि ई बिल्डिंग्जवर स्टे आलेला.. पण ती केस राहुलवाल्यानं जिंकली आणि स्टे उठला..
ह्याव्यतिरिक्त इतर काही असेल तर माहित नाही..

आज वाचला हा बाफ संपुर्ण ...

मी सिंहगड रोडला गोयल गंगाच्या 'अमृत गंगा' प्रोजेक्ट मध्ये २००९ जुलै मध्ये १ बीएचके बुक केला . पझेशन २०१० डिसें. मध्ये देऊ असे सांगितले होते, पण तशी चिन्हं दिसत नाहियेत. परवादिवशीच जाऊन आले तेव्हा खालच्या (पहिल्या-दुसर्‍या) मजल्यांवरच्या दरवाज्याच्या चौकटी, ओटा असे बसलेले दिसले.. माझा फ्लॅट १०व्या मजल्यावर आहे, मी अजून ६ महिन्यांची तयारी ठेवली आहे.
गोयल गंगाबद्दल मला तरी काही वाईट अनुभव नाही अजूनपर्यंत.. माझ्याकडे त्यांनी काही कॅश वगैरे मागितली नाही. सर्व पैसे मी चेकनेच दिले आहेत. आत्तापर्यंत तरी सर्व काही सुरळित सुरू आहे.
वेळेत पझेशन मिळत नाही ही एक सार्वजनिक चिंता/बोंब आहे. मी असंच एक दिवस त्याबद्दल चौकशी केली तर मला बिल्डरची बाजू समजली.... त्याच्या स्वत:च्या घरातले मृत्यू, कॅश फ्लो, बांधकामासाठी सरकारी कामासाठी करावी लागणारी खटपट व त्यासाठी द्यावे लागणारे पैसे... मजूरांच्या दांड्या/अजारपणं... इतर चालू असलेल्या साईट्स, बांधकाम मटेरियलची कमतरता... इ. अजून पण असतील काही... सध्या इतक्याच आठवतायंत. डिमांड लेटर वगैरे पोस्टाने येते, त्यात पैसे भरण्याचा कालावधी बर्‍यापैकी असतो... शिवाय.. लेट झाला तर चार्जेस काही लावले नाहीत. (मला एकदा लेट झाला होता पैसे भरायला)

फक्त लोनच्या वेळेला मला संपुर्ण डिसबर्समेंट साठी थोडं प्रेशराईज केलं गेलं होतं... पण मी ते ऐकलं नाही, पण बिल्डरच्या लोनचं काम पाहणार्‍या माणसाने माझ्या तोंडावर वाक्यं फेकलं की १३ लाखाने गोयल गंगाला फरक नाही पडत.. मग मी म्हणलं मग इतकं प्रेशराईज का करताय, द्या की सोडून.. माझं मला ठरवू द्या.. डिस्बर्समेंट कशी घ्यायची ते... त्यानंतर कोणतेही बौद्धिक वगैरे झाले नाही.. ना माझे ना त्यांचे... आता घरात हवे असलेले चेंजेस करण्यासाठी डोकेफोड करावी लागेल. पण बिल्डिंगमधे अजून एकांनी फ्लॅट घेतलाय ते भेटलेले त्यांनी सांगितलं की चेंजेस चे पैसे बिल्डर अव्वाच्या सव्वा सांगतोय..

क्रमश:

क्रमशः? म्हणजे महाभारतच आहे की काय? Uhoh
सध्याच्या योजनांचे पूर्ण्त्व प्लॅन दीड -दोन वर्षानन्तर चे आहेत.

घरामध्ये काही बदल सांगितला उदा. tiles, basin,sink, etc.
तर मटेरिअलच्या फरकाची रक्कम घ्यावी अशी आपली अपेक्शा असते.
पण नव्या मटेरिअलची पूर्ण किंमत आणि तीही अव्वाच्या सव्वा सांगितली जाते.
शेवटी सामान्य माणूस बिल्डर देईल ते घेऊन गप्प बसतो.

यावर एक ऊपाय आहे, फक्त थोडा कष्टाचा आहे पण स्वताचे पैसे वाचवायचे शिवाय वेळेत, दर्जेदार काम हवे तर ऊपाय निश्चीत चांगला आहे: जे काही बदल हवे असतील त्याचे मटेरीयल्/सामान स्वतः खरेदी करून द्यायचे. बिल्डर ने मूळ दिलेल्या सुविधा/सामनांची रेट शीट असते ज्यात नळ, बेसीन, ओटा ई. ची किम्मत लावलेली असते- त्याचा वापर करून तुम्ही एकतर बिल्डर कडून न बसवलेल्या वस्तूंची किंमत नवीन वस्तूंच्या खरेदी किमतीत वळती करून घ्या किंव्वा, लोन घेतले असेल तर थेट बेंकेमार्फत पुढील दिसबर्स्मेंट ची रक्कम अ‍ॅड्जेस्ट करून घ्या. बिल्डर पहिल्या पर्यायाला तयार होईल.
अर्थात जे सामान आणायचे आहे त्याच्या स्पेसिफिकेशन साठी तज्ञ इंजीनीयरची/ईंटिरीयर डिझायनर/आर्किटेक्ट ची मदत घेणे सर्वात महत्वाचे. बरेच वेळा तुमचा ओळखीचा ईंटीरीयर डीझायनर असेल तर तो ही सर्व कामे तुमच्यासाठी करू शकतो. तुम्हाला मग फक्त वस्तूचे रंग, रूप, ई. बद्दल निर्णय घ्यावा लागतो.
असो. याऊलट एक दुसरा अनुभव/सल्ला असाही आहे की जे बिल्डर देत आहे ते घेवून त्या घरात एक दोन वर्षे राहिल्यावर मग आतील बदल करायचे. पहिले एक दोन वर्षे घरातील भिंती, वस्तू, प्लास्टर, रंग, टाईल्स, बाथरूम मधिल फिक्सचर्स ई. सर्व गोष्टी या बदलत्या हवामानाला जुळवून घेत असतात. या स्थित्यंतरातून जाईपर्यंत कधी प्लास्टर पडणे, ओटा गळणे, टाईल्स ओल्या रहाणे, भिंतीला, कॉलम ला तडे, बालकनी मध्ये पाणी साचणे, ई. समस्या येवू शकतात- ऊपाय एकच, चक्क एक दोन वर्ष थांबून मग संपूर्ण आतील बदल पुन्हा करून घेणे. दरम्यान च्या काळात सोसायटी फॉर्मेशन वगैरे बाबी पार पडल्याने आतील बदल व ईतर बदल करणे थोडे सोपे होते.

मी परवा पुण्यातील एका घरात राहून आले. घराला बाल्कन्या नाहीत. बाल्कनी असणे आपल्याला किती महत्त्वाचे वाट्ते? लिफ्ट ही त्या घराची गैरसोयीची आहे. लोकेशन चांगले आहे फक्त. रिसेलचा फ्लॅट आहे.
मुलांच्या शिक्षणाच्या द्रुष्टीने जागा महत्त्वाची म्हणून घेतल्यासारखा वाट्ला. त्यांनी आतून चांगला बनविला आहे. एक तरी बाल्कनी असावी नाही का?

ग्लोरीयाचा सध्याचा रेट माहीत नाही पण चार बिल्डिंग तयार आहेत, पझेशन देणे चालू आहे. अजून दोन बिल्डिंग्स बांधणार आहेत ते पण अजुन त्याची सुरुवात नाही. स्कीम चांगली झाली आहे, कामही चांगले केले आहे. फक्त तोटा म्हणजे टोलबुथच्या पुढे आहे. त्या बाजूला अजुन तेवढी वाढ नाही. पुढे कदाचित टोल बुथ हलेल आणी दुसर्‍या बाजुने (हायवे) डिपी रोड होणार आहे. अजुन काही माहिती हवी असेल तर देऊ शकीन.

Pages