क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, गोडायवा आण आता. >>> हो म्हणजे काय? आणावा लागणारच.

अपून ने बोलाथा ३०० + बस होतील. अभिनंदन.

बा द वे पॉन्टिन्गची आज ड्रेसिंग रूम मध्ये काय अवस्था असेल >> मी ती पण मॅच पाहत होतो. पॉन्टिन्गची अवस्था लै बेक्कार होती बोलताना. तो रिटायर होईल. Happy

भाऊराव,

तुमचं बरोबर आहे. श्रीसंथ चा देखील विजयात मोठा वाटा आहे. विशेषतः पहिल्या डावात डी व्हिलर्सचा ० वर त्रिफळा व दुसर्‍या डावातले ३ बळी (त्यातला कॅलिसला टाकलेला सामन्यातला सर्वोत्तम चेंडू) अप्रतिम होते. पण त्याने व ईशांतने नोबॉल वर खूप नियंत्रण आणले पाहिजे. ईशांतला कदाचित डोळ्यांवर आलेल्या केसांमुळे क्रीजची रेषा दिसत नसेल, पण श्रीसंथला तशी काही अडचण नाही.

एक सूचना - ईशांतला दिल्लीतले किंवा आफ्रिकेतले कटिंगचे दर परवडत नाही असं वाटतंय. यापुढे संघात व्यवस्थापक, डॉक्टर, प्रशिक्षक यांच्या बरोबर एखादा हेअरकटर पण घ्यावा.

ईशांतला कदाचित डोळ्यांवर आलेल्या केसांमुळे क्रीजची रेषा दिसत नसेल, पण श्रीसंथला तशी काही अडचण नाही. >>
ह्या साठी त्यांनी मीटर (कवितेचे नाही!!) वापरायला पाहिजे. निदान प्रॅक्टीसला तरी. काल पोलॉक सांगत होता की त्यालाही हाच प्रॉब्लेम होता तो त्याने मीटर ने सोडवायचा प्रयत्न केला.

शांतला दिल्लीतले किंवा आफ्रिकेतले कटिंगचे दर परवडत नाही असं वाटतंय. यापुढे संघात व्यवस्थापक, डॉक्टर, प्रशिक्षक यांच्या बरोबर एखादा हेअरकटर पण घ्यावा. >>. लोल देशी का विदेशी ह्यावरून भांडण होईल मग.

<<यांच्या बरोबर एखादा हेअरकटर पण घ्यावा.>> ज्या शिस्तीत सध्या भारतीय संघ खेळतोय, त्यावरून गॅरी कर्सटन हजामतही चांगलीच करत असावा असं आपलं माझं इंप्रेशन झालं होतं ! Wink

लो स्कोअरिंग मॅच मधे तिसर्‍या इनिंगला आपले ७ आउट झाल्यावर असाच ५० -६० नी स्कोअर वाढवला होता. >>> क्रिकइन्फो च्या कॉमेंटरीत त्याने आणि झहीर किंवा कोणीतरी ७० चीच भागीदारी केली होती आधीच्या एका मॅच मधे असे वाचले. चेक करतो.

लक्ष्मण जबरी. पुन्हा एकदा.

मास्तुरे द्रविड ने घेतलेला कॅच बघितला का? तेवढ्यासाठी तरी अजून काही दिवस राहू दे Happy

पॉन्टिंग फॉर्मात असताना आणि विशेषतः मैदानावर भांडताना वगैरे पाहून खूप राग यायचा. पण आता ज्या इंग्लंड ला नेहमीच यांनी चौफेर धुतले त्यांच्यासमोर पुचाट अवस्था पाहून तेवढेच वाईटही वाटते. त्याची दुसर्‍या डावातील विकेट वर्ल्ड कप मधल्या सचिन च्या विकेटची (किंवा गुल का आसिफ ने एकदा त्रिफळा उडवला होता ती) आठवण आली.

क्रिकइन्फो च्या कॉमेंटरीत त्याने आणि झहीर किंवा कोणीतरी ७० चीच भागीदारी केली होती आधीच्या एका मॅच मधे असे वाचले >> बरोबर ४ वर्षांपूर्वी त्याने आणि झहीरने आफ्रिकेविरूद्धच जोहान्सबर्गमध्ये ७-१४८ वरून ८-२१८ पर्यंत स्कोर नेला होता. काल पण त्यांनी तेच केलं. (क्रिकइन्फो वरून साभार Happy )

धन्यवाद मनीष!

http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/6592657.stm

आत्ताच्या स्थितीवरून हा एप्रिल २००७ मधे लिहीलेला लेख कसा वाटतो बघा Happy तेंडुलकर आणि पॉन्टिन्ग दोघांच्या दृष्टीने.

लिन्कबद्दल धन्यवाद, फारएन्डजी. लेख छान इंग्लीशमध्ये लिहिला असला तरी मला वाटतं त्यावेळी जी चर्चा सर्वत्रच चालु होती त्यामध्ये कांही नवीन छातीठोकपणे या लेखात सांगण्यात आलेलं नाही. मला नाही वाटत जयसुरिया, हेडन किंवा इतर कुणी वयाच्या ३७ वर्षांपर्यंत खेळले, याचा विचार कर्रून सचिन आपला निर्णय घेईल; किंबहुना अशा तुलना न करतां स्वतःचे निर्णय स्वतःला जोखून घेऊनच तो घेतो म्हणून तर तो नवनवीन विक्रम करतो व मोडतो ! असो.
मला पाँटींगच्या क्रिकेटींग टॅलंटबद्दल प्रचंड आदर आहे. त्याने सचिनसारखं कप्तानपद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं तर अजूनही तो मैदान गाजवेल [व, कुणी सांगावं, सचिनकडून सौजन्याचा धडा घेतला तर लोकप्रिय पण होईल !].
नंद्याजी, धन्यवाद फोटोबद्दल. एका भारतीय गोलंदाजाने द.आफ्रिकेच्या कालीसची केलेली हालत दाखवतो आहे, ही ह्या फोटोची ऐतिहासिकता आहे ! साधारणपणे परिस्थिति उलटीच असते !! Wink

>>> मास्तुरे द्रविड ने घेतलेला कॅच बघितला का? तेवढ्यासाठी तरी अजून काही दिवस राहू दे

द्रविड माझा आवडता खेळाडू आहे. तो स्लीपमधला एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. २०० झेल घेणारा तो एकमेव खेळाडू. पण त्याची इनिंग आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्याला २०११ च्या विश्वचषकासाठीच्या संघात घेतलेले नाही. कसोटीमध्ये त्याचे सातत्य कमी झाले आहे. पुढच्या महिन्यात तो ३८ वर्षांचा होईल. तो संघात नसताना सामने बघणे अवघड जाणार आहे.

का भारतीय गोलंदाजाने द.आफ्रिकेच्या कालीसची केलेली हालत दाखवतो आहे, ही ह्या फोटोची ऐतिहासिकता आहे ! साधारणपणे परिस्थिति उलटीच असते !!>>> हो अगदी सहमत. ७८ साली माजिद खान का कोणीतरी कपिल च्या बोलिंग ला हेल्मेट मागितले ते बहुधा भारतीय बोलर विरूद्ध पहिल्यांदा होते (पूर्वी काही फास्ट बोलर होते पण तेव्हा हेल्मेट्स नसावीत). तसा क्षण म्हणावा लागेल.

मास्तुरेजी, ह्या धाग्याचा शुभारंभच <<द्रविड है ही बेस्ट!>> या स्वरूपजींच्या वाक्याने झाला आहे व म्हणूनच द्रविडच्या इनींगसारखाच हा धागा साठ पानं पार करूनही अजून फॉर्मात आहे !! द्रविडबद्दल आणखी काय बोलावं !! Wink
आग्रहास्तव व्यंगचित्राचा हा प्रयत्न -
mischief.JPG आपले पवारसाहेब फिल्डींग लावून विकेट घेण्यात टॉप एक्सपर्ट आहेत ! त्या पाँटीगने एका बक्षीस समारंभात त्यांचा अवमान केला, तर बघ त्यानी भारताला व इंग्लंडला अचूक टीप्स देऊन त्याची कशी वाट लावली !!

सही भाऊ... तसे दोघेही आपापल्या राज्यात शेर आहेत... पण शेरास सव्वा शेर भेटतातच Happy

<<पाँटिंग ला लाथ पडण्याची चिन्हे आहेत .>>पण इतक्या तोफा डागूनही जर तुमच्या चित्रातली साधी भिंत पडत नाही, तर साध्या लाथेने पाँटींग पडेल ? Wink

Wink !

धोनीने टॉस जिंकून [!] प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं कारण पावसाची शक्यता होती व द.आफ्रिकेच्या १७-१
[ स्मिथ पायचित झहीर]असताना खरंच पाऊस आलाय !

द. आफ्रिका - १७४-४; अरे, धोनीच्या संघाला प्रोत्साहन द्यायला मायबोलीच्या स्टँडमध्ये कुणीच नाही !!

आज परत एकदा ऑसीजची वाट लागलीये.. १३४/४ आणि पाउस... पावसानी जर ही मॅच घालवली तर मौज्जा ही मौज्जा...

काहीही म्हणा पण पाँटींग इतक्यात काही बाहेर पडत नाही.. आपल्याकडे सुद्धा जसे पूर्व पुण्याईच्या बळावर बरेच काळ संघात निवड होतच रहाते तसेच तिकडे पण होणार... आणि पाँटींगचा तोरा औरच आहे.. त्यामुळे तो कप्तान म्हणूनच खेळणार... कदाचित परत एकदा विश्वचषक वगैरे पण जिंकून देईल... त्यात परत कालच मॅकग्रानी त्याची बाजू घेतलीच आहे.. की पाँटींग सचिन विक्रम मोडेल वगैरे..

सा.आ. २६४-६
श्री ने सलग चेंडुत प्रिन्स आणि बाऊचरला आऊट केला.आता सा.आ.ची भिंत (कॅलिसला)लवकर कोसळवा.

भारत १३९-२. द.आफ्रिकेला अजून २२३ची आघाडी. गंभीर ६५, साहेब ४७ खेळताहेत !
हा सामना रंगतदार होणारसं दिसतंय, अर्थात पावसाने पाणी नाही ओतलं तर !
सेहवाग असा स्वतःचं करिअर संपवायला कां इतका उत्सुक आहे कांही कळत नाही !!
आणि श्रीसंथ क्र.१चा गोलंदाज व्हायच्या वाटेवर त्याच्या चेंडूच्याहीपेक्षा अधिक वेगाने कसा प्रवास करतोय !!!

श्रीशांत ने कालिस ला टाकलेले काहे चेंडू, त्याने प्रिन्स ची दांडी उडवली तो चेंडू वगैरे मस्त होते... स्विंग भारी मिळत होता त्याला..

हो. श्री जेंव्हा चांगली गोलंदाजी करतो तेंव्हा बघायला पण आनंद वाटतो. विकेट मिळणे ही गोष्ट निराळी, त्याची गोलंदाजी बघण्याच्या आनंदच जबरी असतो. पण बरेचदा तो ओव्हर इन्थू असतो. नेहमी हायपर. त्याला थोडं गोडाचं कमी द्यावे अशी विनंती मी केली आहे. Happy

आजच्या क्रिकइन्फोवर लेख प्रसिद्ध झाला आहे त्याच्याबद्दल. त्याच्याशी सहमत. तो थोडा बॅलन्स झाला तर श्री ला खेळणे अवघड होईल असे वाटते. देवाने ही बुद्धी त्याला नक्कीच द्यावी. Happy

त्यात परत कालच मॅकग्रानी त्याची बाजू घेतलीच आहे.. की पाँटींग सचिन विक्रम मोडेल वगैरे..>> मॅकग्रा ला काल हे आठवले असेल ...

http://www.youtube.com/watch?v=XVcpV_38JLc

आणि त्यामुळे चिडला असेल..

ही बहुधा २००१ च्या सिरीज मधली धुलाई आहे. त्या वन डे सिरीज मधे सचिन ने मॅग्राथ ला टार्गेट केले होते.

आता कालिसच पॉन्टिंग च्या पुढे जाईल असे दिसते, आत्ताच्या फॉर्मवरून तरी. पॉन्टिंग ला खेळाडू म्हणून १-२ वर्षे मिळतील अजून.

Pages