Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निंबे, तुला नेमकं काय करायचं
निंबे, तुला नेमकं काय करायचं ह्यातलं??
>>>
योडे, आपल्या पोस्ट्स क्रॉस झाल्या
मी पण क्रॉस होतो आता.
मी पण क्रॉस होतो आता.
मार्बल (किंवा टाईल्स) सारखं
मार्बल (किंवा टाईल्स) सारखं वाटतंय. फ्लॅश चमकलेला दिसतोय म्हणून म्हणतेय.
>>
टाईलच आहे ती निंबे.
वर वुडन फिनीश्ड टाईल्स बद्दल म्हणत होतीस ते हेच का??
>>
नाही, हे तसं नाही. ह्यात लाकुड कापलं तर जशी वर्तुळं येतात तशी आहेत थोडीशी.
वुडन फिनीश्ड टाईल्समध्ये तुला प्रॉपर वुडनचाच फिल येतो. जास्त देखभाल करावी लागत नाही. इथे बघ.
थोडं फार असं
यातही वूडन फील (टच नव्हे) असणारी डीझाईन्स मिळतात.
>>
वुडन टाईल्समध्ये तुला फक्त फिलच येईल. टच मिळणार नाही.
एक काम कर. सॅनिटरी शॉपमध्ये जाऊन वुडन फ्लोरींग दाखवायला सांग, म्हणजे तुला कसं असतं ते कळेल.
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे.
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे. कोणता चांगला असतो ? स्टील फोम की लाकडी ? लाकडी नकोच शक्यतो. >>>
जागू, आमच्या कडे तरी स्टीलचा आहे. लूक वाईज यात काही खास नाही. अगदी कॉमन असतो. मला स्वतःला लाकडी सोफा अगदी रॉयल वाटतो. पण हल्ली तो ही फारसा कुणी वापरत नाही असे दिसते. लाकडामुळे त्याला मेंटेन करणे जिकिरीचे होईल.
हल्ली गोदरेज इंटीरीओ या रेंजमध्ये सोफ्यांचे खूप प्रकार आणि व्हरायटी बघायला मिळते. फोम चे आणि लेदर कव्हर्स असलेले शिवाय सुबक आकार असणारे कितीतरी प्रकार आहेत. १२००० रु. पासून ३०००० रु. पर्यंत रेंज बघितली आहे. शिवाय काही काही शोरूम्स वाले नंतर घरी येऊन सोफ्याचे कव्हर वगैरे वॉश करून देखील देतात. त्याची काहीतरी वेगळे चार्जेस अर्थातच घेतात. कव्हर्स च्या फॅब्रिक मध्ये पण खूप व्हारायटी आणि आपल्याला हवा तो रंग निवडण्याची सोय असते. कस्टमाईज्ड आकारातही बनवून देतात.
दिसायला छान दिसतात त्यांच्या रेंज मधले सोफे. प्रत्यक्ष उपयोग ज्यांनी केलाय त्यांनी त्यांचे अनुभव इथे टाकल्यास बरे होईल.
मी वेगवेगळ्या लोकांच्या घरातील आणि शोरूम्स मधील सोफे पाहून एक ठाम मत बनवले आहे. की सोफा शक्यतो खाली पुष्कळ जागा मोकळी राहील असा असावा. म्हणजे अगदी जमिनीलगत असलेला नको. कारण सोफ्याच्या अवजडपणामुळे तो हलवून खालची साफसफाई करणे अवघड जाते. सफाईच्या दृष्टीकोनातून मग स्टीलच्या सोफ्याचा ऑप्शन चांगला. खाली पूर्ण मोकळा. आणि हवे तेव्हा कुशन्स आणि त्याचे कव्हर्स बदलताही येतात.
मला स्वतःला लाकडी सोफा अगदी
मला स्वतःला लाकडी सोफा अगदी रॉयल वाटतो. << अगदी खरं आहे. आमच्याकडे सुद्धा लाकडीच सोफा आहे. सागवानी लाकडाचा असेल तर टिकायलाही उत्तम.
अवल... भारतातल्या हवेत ते
अवल... भारतातल्या हवेत ते नाही फारसे सुटेबल होत.
>>> हे पटतच नाही.. पूर्वी संपूर्ण भारतात लाकडी घरेच होती की...
सावली, घारूअण्णा, अमृतांजन.. चांगले मुद्दे...
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे.
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे. कोणता चांगला असतो ? स्टील फोम की लाकडी ?
>>> माझ्याकडे साधा 'केन'चा सोफासेट आहे... हवा तसा रंग दया त्यांना. आणि दर काही दिवसांनी त्यांची पोझिशन बदला येती.. स्वस्त आणि मस्त..
केन मध्ये महागडे डिझाईन सुद्धा मिळतात... ५ वर्षे काही होत नाही...
पभ, केन म्हणजे वेतच
पभ, केन म्हणजे वेतच ना??
माझ्याकडे केन च्या हँड्मेड खुर्च्या आहेत. पण फिनिशिंग लईच बेक्कार.
रस्त्यावरून स्वस्त आणि मस्त म्हणून विकत घेतलेल्या. पण खरखरीत आहेत एकदम. आणि त्यांचे तूस बर्याचदा बोटात वगैरे जाते असा अनुभव आहे.
केन स्वस्त असले तरी हवेतसे
केन स्वस्त असले तरी हवेतसे बनवून मिळते.. पोलिश करून हवातसा रंग पण मारून मिळतो...
पभ, लाकडी घरांमधले वासे,
पभ, लाकडी घरांमधले वासे, खांब, दाराच्या चौकटी काही दिवसांनी कश्या होतात? लक्षात आहे ना? आणि जमीनीशी तर धुवा-पुसा इत्यादी जास्त होत रहातं ना. त्याचं फिनिशिंग नाही टिकत. जुन्या घरातल्या खांबा-दरवाज्यांना पॉलिश नाही केलं तरी चालतं कारण त्यावरची कारागिरी असते. परत लाकडी खांब इत्यादी भरीव असतात. फरशीला घातलेलं लाकूड म्हणजे तसं पातळच ना. ते कसं टिकणार?
नीधप .. मान्य आहे. पण अजिबात
नीधप .. मान्य आहे. पण अजिबात सुटेबल नाही हे मान्य नाही असे म्हणतोय मी.. मेंटेनन्स नक्कीच जास्त आणि वेळखाऊ राहील...
जुने लाकडाचे वाडे राहिले कारण तसे त्या दर्जाचे लाकूड देखील होते.. आता फ्लोरिंगला जे लाकूड वापरले जाते ते कुठले ह्याबद्दल कोणी काही सांगेल का?? टिकवूड?
टिकवूड? >> पण तरीही ते टिकत
टिकवूड? >> पण तरीही ते टिकत नाहीच ना?
वन प्लस वन करताना आम्ही
वन प्लस वन करताना आम्ही वरच्या रुमला प्लाय टाकलाय, भिंतीत चॅनेल्स टाकले नाहीत म्हणुन. पावसाळ्यात प्लाय थोडसं फुगतं ह्युमिडिटीने, पण थंडीत बर्यापैकी सुटं होऊन ते तुकडे खालीवर होतात थोडेसे. बहुतेक वुडन फ्लोरींगचं सुद्धा असंच होईल काहीसं.
पण तरीही ते टिकत नाहीच ना?
पण तरीही ते टिकत नाहीच ना?
माझ्या घरामध्ये सर्वच्या सर्व दरवाजे सागाचे आहेत. जुन्या पद्धतीचे...
हल्ली लाकडाचा दर्जा खूप खालावलाय. साग आणि रोसवूड सारखे इतर लाकूड सहजा तोडू देत नाहीत का? (लाकूडचोरी तर होतच असते)
शिसवी इत्यादी फ्लोरींगला
शिसवी इत्यादी फ्लोरींगला घालायचं असेल तर घराचे हप्ते कुठून भरायचे?
शिसवी इत्यादी फ्लोरींगला
शिसवी इत्यादी फ्लोरींगला घालायचं असेल तर घराचे हप्ते कुठून भरायचे?
त्याव खरस..
शिसवी इत्यादी फ्लोरींगला
शिसवी इत्यादी फ्लोरींगला घालायचं असेल तर घराचे हप्ते कुठून भरायचे? << म्हणजे ते असं होईल..
आधी बांधावे दार मगच उभारावे घर.
सागाच्या लाकूडतोडीवर बंदी घातली आहे. दारांमधे पण थोड्यादिवसांनी रिप्लेसमेंट सुविधा येईल. पण दार हे लाकडीच असावं. टोलेजंग वाड्याला असणार्या दारावरूनच तर वाड्याची विशलाता कळून यायची.
तशीही "जेल" ची दारेही अस्सल सागाची अन भली मोठी असतात.
शिसवी इत्यादी फ्लोरींगला
शिसवी इत्यादी फ्लोरींगला घालायचं असेल तर घराचे हप्ते कुठून भरायचे?
>>>> खाली चकचकवल्यावर वर कौलं किंवा माडाच्या झापा घालायच्या
निंबुडा माझ्याकडील सोफ्याला
निंबुडा माझ्याकडील सोफ्याला आधी वेलवेटचे कापड होते ते लाईट झाल्यावर आम्ही त्याला लेदरचे कापड लावुन घेतले पण त्याचा रंग १ वर्षातच उडाला.
भटक्या तुमच्या सोफ्याचा फोटो टाकाल का ?
(No subject)
जागू माझ्याकडे लेदरचा सोफा
जागू माझ्याकडे लेदरचा सोफा आहे हाऊसफुल शोरूममधून घेतलेला . अजिबात जड नाहिये सरकवायला चांगला आहे. लुक तर अप्रतिम आहे आणि खूपच कंफर्टेबल आहे.हाऊसफुल च्या वेबसाइट वर पहा .पण बसून बसून आत चाललाय असे नवरोबांचे म्हणणे आहे(तात्पर्यः माझ्या वजनाने...दिवसभर काऊच पोटॅटो झालीय असे म्हणणे डायरेक्ट बोलण्याचे धाडस नसावे)
पभा- रोझवुड फ्लोरिंग ??
पभा- रोझवुड फ्लोरिंग ?? (बेशुद्ध पडलेली बाहुली)
ए त्या केनच्या सोफ्यांबाबतही माझे सांसारिक मत निंबुडासारखे. घेऊ नका. रस्त्यावरचे चांगले निघत नाहीत आणि दुकानातील प्रचंड महाग असतात. पोराबाळांच्या/खूप वापराच्या घराला केनच्या सोफ्यांची शान परवडत नाही.
लेदर म्हणजे खरे लेदर की फेक (रेक्झिन)? तेही माझ्यामते मुंबईच्या हवामानासाठी फारसे सुटेबल नाही. उन्हाळ्यात अगदी बसवत नाही त्यावर.
आणि स्वप्नाने लिहीले तसे बसून बसुन आत जातात.
लेदरचे सोफे बर्याचदा दिसायला
लेदरचे सोफे बर्याचदा दिसायला आकर्षक दिसतात पण टिकण्याच्या बाबतीत शून्य, अन बर्याचदा ते लेदरचे नसून फोमचे असतात. अन असे सोफे असल्या घरात मांजर, कुत्रा असे पाळीव प्राणी सुद्धा पाळता येत नाही.
बाकी स्वप्ना तूषार .. पर्याय म्हणून बीन बॅग वापरली तरी हरकत नाही.
बीन बॅग सुद्धा घरात .. लिव्हिंग रुंम मधे आकर्षक दिसते.
हवं तिथं फदकल मांडून बसता येतं.
पक्का भटका, पुर्वी लाकडी वाडे
पक्का भटका, पुर्वी लाकडी वाडे असायचे पण त्यांचं नियमित तेल पाणी होत असे. आजकालच्या काळात हे तेलपाणी करणे वेळेच्या दृष्टीने अवघड वाटतं.
सूकी, बिन्स बॅग घेताना जरा
सूकी, बिन्स बॅग घेताना जरा मोठीच घ्यावी, अन खरच वापरली जानार ना हे मनाला विचारावं. आमच्याकडे मारे लेकाने उत्साहाने घ्यायला लावली पण फारसा वापर होत नाही.
अवल, अनुमोदन. अगदी खरं आहे.
अवल, अनुमोदन. अगदी खरं आहे. जुन्या वाड्यांच्या भिंती सारवणे, त्यातल्या लाकडी वास्यांना कीड, वाळवी लागू नये म्हणून घेतलेली काळजी. माळ्यावरच्या लाकडी फळ्यांनाही हे करावं लागत असे. नाहीतर उतानं झोपल्यावर, घोरताना हमखास बोरीक पावडरने थोबाड रंगायचं.
चूली पासून गोठ्यापर्यंत नियमीत पणे निगा राखली जायची. अगदी चिमणी दिवा, कंदील सुद्धा.
फदकल मांडून बसता येतं. >>>
फदकल मांडून बसता येतं. >>> फतकल असा शब्द आहे ना???
लेदर म्हणजे खरे लेदर की फेक
लेदर म्हणजे खरे लेदर की फेक (रेक्झिन)? तेही माझ्यामते मुंबईच्या हवामानासाठी फारसे सुटेबल नाही. उन्हाळ्यात अगदी बसवत नाही त्यावर.
रैना रेक्झिन आहे तु म्हणतेस ते १००% बरोबर उन्हाळ्यात माझी मुलगी झोपली त्यावर की घाम सुटतो तिला.
स्वप्ना हाउसफुल शोरुमची साईट पाहते धन्स.
मला आपला अजूनही कोबा आणि
मला आपला अजूनही कोबा आणि त्यात कोरलेलं डिझाइन आवडतं. मोठ्ठं घर असेल तर तेच छान दिसतं. आणि मग हवं तसे गालिचे किंवा मॅट टाकायचे.
पण गार पडते फार ही कोबा घातलेली जमीन.
अगदी खरं आहे, कोबा केलेली भुई
अगदी खरं आहे, कोबा केलेली भुई गार पडते. पण ती उकलते सुद्धा लवकर. जास्त दिवस टिकत नाही.
Pages