Submitted by निंबुडा on 26 December, 2010 - 08:52
राहत्या किंवा नवीन घरात अंतर्गत सजावटीच्या दृष्टीने काही बदल करायचे झाल्यास पडणार्या प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बाफ.
घराचे रंगकाम, फर्निचर, टाईल्स लावून घेणे, प्रकाशयोजना, किचन ट्रॉलीज्, फ्लोरिंग, गृहोपयोगी वस्तू, उपकरणे, घरात नवीन फर्निचर किंवा उपकरणाच्या दृष्टीने करावे लागणारे सिव्हील बदल, खरेदीच्या उत्तम जागा इ.इ. जे काही घराच्या सजावटीत अंतर्भूत असेल त्यावरील प्रश्नोत्तरे इथे अपेक्षित आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पीव्हीसी फ्लोरिंग विषयी
मला पीव्हीसी फ्लोरिंग विषयी कुणी माहिती देऊ शकेल का?
त्यात काय काय प्रकार अवेलेबल आहेत?, साधारण प्रति चौरस फूटाचा खर्च किती असतो?, कुणाकडे घरात फ्लोरिंगचा हा प्रकार असल्यास त्यांचा त्याबाबतीतला अनुभव (फायदे-तोटे/other concerns) काय आहे? तुम्ही इतराना तो प्रकार रेकमेंड कराल का? मेंटेन करणे किती सोपे/कठीण आहे??? इ. विषयी माहिती असल्यास प्लीज सांगा.
मला कोणी एक चांगला architect
मला कोणी एक चांगला architect सुचवू शकेल का, please? फार महाग नाही पण innovative. जरा हटके ideas सांगेल असे कोणी तरी. मी पूण्यात camp जवळ राहाते. Thanks !
मला घरी वुडन फ्लोरिंग करून
मला घरी वुडन फ्लोरिंग करून घेण्याबदल माहिती हवी आहे... हल्ली इटालियन / जर्मन कोटिंगची तयार वूड्स बाजारात उपलब्ध आहेत. ती कोणी वापरली असल्यास मत द्यावे... धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पभ, पीव्हीसी मध्येही वुडन
पभ,
पीव्हीसी मध्येही वुडन फ्लोरिंग अवेलेबल असते. पण किचन मध्ये प्रेफेरेबल नाही. (कारण किचन मध्ये पाण्याचा सर्वाधिक वापर होतो) असे ऐकले आहे.
कुणाला काय अनुभव आहे इथे शेअर करा प्लीज.
पीव्हीसी मधे वूडन !
पीव्हीसी मधे वूडन !![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
वुडन फ्लोरिंगचा (भारतातील)
वुडन फ्लोरिंगचा (भारतातील) अनुभव चांगला नाही. ते अक्षरश : चिकटवतात आणि मग ते प्रकरण निघते खळ गेल्यावर. रोज फरशी पुसल्याशिवाय गत्यंतर नसते, आणि त्याने ते अजून खराब होते. फर्निचरचे ओरखडे उठतात वगैरे.
रैनाला अनुमोदन . भारतातल्या
रैनाला अनुमोदन . भारतातल्या हवेत ते नाही फारसे सुटेबल होत. अर्थात एसी खोलीत ठीक आहे, पण तरीही जरा विचारच करावा ...
निबुडा/पभ... पिव्हीसी मध्ये
निबुडा/पभ... पिव्हीसी मध्ये वुडन फ्लोरेंग मिळतात. माझा स्वतःचा अनुभव खुप चांगला आहे ... साधारण ६५रु. ते ४५०रु स्व्केअर फुट अशी रेंज आहे..
रैना वूडन पिव्हीसी मध्ये बरेच प्रकार आहेत ..water proof, आणी end to end PVC केल तर फारसा त्रास होत नाही.
शक्यतो टेक्शरची फ्लोरिंग घेउ नयेत प्लेन घ्यावित .
पण सध्या वुडन फिनीश्ड
पण सध्या वुडन फिनीश्ड टाईल्सपण मिळतात. त्यातही रैना म्हणतेय तसा प्रॉब्लेम होतो का??
रेकमंड नाही करता येणार.
रेकमंड नाही करता येणार. घेताना ते एक्स्ट्रा घेऊन ठेवावे लागते. पुढे मधला एखादा तुकडा बदलायचा झाल्यास सेम डिझाईन मिळत नाही. पावलांना / त्वचेला पीव्हीसीचा सततचा स्पर्श चांगला नाही असं म्हणतात..
पावलांना / त्वचेला पीव्हीसीचा
पावलांना / त्वचेला पीव्हीसीचा सततचा स्पर्श चांगला नाही असं म्हणतात.. >>>![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ओह
हे नवीनच ऐकले
पिव्हीसी म्हणजे काय? अगं योडी
पिव्हीसी म्हणजे काय?
अगं योडी पण टाईल्समध्येच खूप सुंदर प्रकार असतात. वुडन फिनीश्डच का बरं ?
अवलला अनुमोदन. सगळे घर बंद करुन एसी असेल तरच ठिक.
भारतातील हवामानासाठी या गोष्टी अजिबात अनुकुल नाहीत.
घारूअण्णा- आमच्या एका घरमालकाने एक भिकार वुडन फ्लोरिंग लाऊन घेतले होते, त्याचा फार त्रास झाला. कदाचित ते चांगल्या प्रतीचे नसावे.
भारतातल्या वुडन फ्लोरिंगचा
भारतातल्या वुडन फ्लोरिंगचा अनुभव नाही. पण इथे सगळी कडे वुडन फ्लोरिंग आहे. त्यानुसार विचार करुन लिहिते.
एकंदरीत वुडन फ्लोरिंग म्हटले की ते धुता येणार नाही. फक्त पुसावे लागेल. सारखे पुसुन त्याचे पॉलिशिंग खराब होतेच. नेहेमीसारखे शाईनिंग रहात नाही. (पण पुन्हा शाइनिंग करुन घेता येते असं वाटतं).
भारतात धुळ खुप येते, घर बराच वेळ उघडं असतं. अशा वेळी फ्लोरिंग नीट साफ होणार नाही.
प्लेट मधल्या बारिक फटिंमधे धुळ साचुन रहाणार, ती काढणे फार त्रासदायक.
मुलं असतील तर फ्लोरिंग वर लगेच चरे, ओरखडे पडतात. खेळणी आपटुन फ्लोरिंग तुटतात सुद्धा.
वर्षभराच्या दमट हवेत लाकुड खराब व्हायची त्यात पेस्ट्स व्हायची शक्यता खुप आहे. घराला पेस्ट कंट्रोल केलेलं नसेल आणि झुरळं / उंदिर यांचा त्रास असेल तर तो फार वाढु शकतो.
काही प्रोब्लेम होत नाही
काही प्रोब्लेम होत नाही सह्सा. सततचा स्पर्श हा क्रायटेरिया मार्बल लाही लागु होतो.
रैना ... नेहेमी खर्च
रैना ... नेहेमी खर्च वाचवण्यासाठी काही वेळा आहेत्या फ्लोरींगवरच टाइल चिकटवतात . खरतर RCC पर्यंत सगळा माल काढुन नी सीमेंट घोटुन जामीन लेवल करुन मगच ही फ्लोरींग करावी.
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे.
हॉलमधला सोफा मला बदलायचा आहे. कोणता चांगला असतो ? स्टील फोम की लाकडी ? लाकडी नकोच शक्यतो.
वुडन फिनीश्डच का बरं
वुडन फिनीश्डच का बरं ?
>>>
वुडनच हवंय असं काही नाही, पण मला वुडन फ्लोरींग म्हणताय ते नेमकं काय हे कळतं नाहीय.
मी माझ्या घरी लावलंय असं.
मोबाईलने घेतलाय फोटो, त्यामुळे क्लीयर नाहीय. थोडाफार वुडन इफेक्ट आहे.
घारुआण्णा , असं केलं तर
घारुआण्णा , असं केलं तर एखादीच प्लेट बदलायची असेल तर ती कशी बदलणार?
सावली हे तुम्ही पुर्ण वुडन
सावली हे तुम्ही पुर्ण वुडन विषयी लिहिलेल आहे . PVC मध्ये जो ग्लु वापरतात त्यामुळे किटकांचा त्रस होत नाही.
हेबघ वुडन फ्लोरिंग हो मी
हो मी पुर्ण वुडन विषयी बोलतेय. वरती विचारलं होतं वुडन विषयी ना..
सिंगल प्लेट कटरनी बदलता येते
सिंगल प्लेट कटरनी बदलता येते पण कारागिरच बोलवावे लागतात
अगं, मग ह्या टेक्श्चरच्या
अगं, मग ह्या टेक्श्चरच्या टाईल्स मिळतात कि बाजारात.
http://www.en8848.com.cn/Arti
http://www.en8848.com.cn/Article/Home/Decorating/57116.html
>> हे बघा.
इथे आणखी डिझाईन्स पाहता येईल.
http://www.inlays.com/Wood_Floor_Design_Ideas.asp
पीव्हीसीचा स्पर्श.... मघाशी
पीव्हीसीचा स्पर्श....
मघाशी नव्हतं आठवलं. घरात रांगणारं मूल असल्यास पीव्हीसी प्लोअरिंग टाळावे असं वाचनात आलं होतं. ( कार्पेटस देखील धूळ शोषून घेत असल्याने मुलांच्या बाबतीत हानीकारक )
पीव्हीसी मटेरियलच्या वूडन लूक
पीव्हीसी मटेरियलच्या वूडन लूक असलेल्या टाईल्स वेगळ्या
आणि संपूर्ण लाकडीच फ्लोअरिंग वेगळं.
वूडन लूकच्या टाईल्स वगैरे वॉटरप्रूफ असतात. कारण ते मटेरियलच मुळात लाकडी नसतं.
सावलीने दिलेला फोटो मस्त. हे पूर्ण लाकडीच फ्लोअरिंग असतं. ह्याची देखभाल जिकीरीची असते. हे बरंच महागही असतं.
पीव्हीसीच्या वूडन लूकच्या टाईल्स/ दरवाजे is just an imitation of the original wooden work.
प्लीज, फरक लक्षात घ्या.
खरं सोनं आणि बेंटेक्स.
खरं सोनं आणि बेंटेक्स.
पोर्णिमाशी सहमत. मुंबैच्या
पोर्णिमाशी सहमत. मुंबैच्या हवेला पुर्ण लाकडी फ्लोरिंग टिकणर नाही आणी बरच महाग ही पडेल .
PVC चा पर्याय मात्र जरा कमी खर्चीक आणी दिसायला सुंदर आहे.
धुळीच्या बाबतीत मात्र सर्व फ्लोरिंग सारखचं . मर्बल्/टाइल्स स्वछ करतानाही साबण व इतर केमिकल्स वापरावि लागतातच . आणी त्यावर धुळ चटकन जमते/दिसते.
पीव्हीसीच्या वूडन लूकच्या
पीव्हीसीच्या वूडन लूकच्या टाईल्स/ दरवाजे is just an imitation of the original wooden work.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>
बरोब्बर. हेच क्लॅरीफाय करायला आले होते मी इथे.
योडे, तु करून घेतलेलं
योडे, तु करून घेतलेलं फ्लोरिंग मार्बल (किंवा टाईल्स) सारखं वाटतंय. फ्लॅश चमकलेला दिसतोय म्हणून म्हणतेय. वर वुडन फिनीश्ड टाईल्स बद्दल म्हणत होतीस ते हेच का??
पण टाईल्स बसवायला आधीची फ्लोरिंग उखडून काढावी लागेल. आणि जास्त खर्चिकही होईल ते. म्हणून पीव्हीसी फ्लोरिंग चा ऑप्शन टॅप करून पाहण्याचा विचार करतोय.
आधी एकदा वॉल टू वॉल कारपेटचा अनुभव घेऊन झाला आहे. जो अतिशय बेक्कार आहे.
एक तर जिथे जिथे कारपेट वर ऊन पडते तिथे तिथे रंग फिक्कट झाला आहे. फर्निचर सरकवताना ते उचकटून निघतेय. शिवाय जोडणी केलेल्या ठिकाणी डीझाईनची एकसंधता दिसत नाहीये. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पीव्हीसी हे पण एक प्रकारचे एकदा वॉल टू वॉल कारपेटच आहे, पण जास्त जाडीचे असते असे म्हणे.
नील वेद ने सांगितले की पीव्हीसी टाईल्स हा पण एक प्रकार असतो. ज्यात अॅक्च्युअल टाईल्स जशा तुकड्या तुकड्याने जमिनीवर लावतात तसेच पीव्हीसी चे चौकोन ग्ल्यू ने जमिनीवर चिकटवतात. यातही वूडन फील (टच नव्हे) असणारी डीझाईन्स मिळतात.
/ दरवाजे is just an imitation
/ दरवाजे is just an imitation of the original wooden work.
>>
पौर्णिमा, अनुमोदन.
खरं सोनं आणि बेंटेक्स.
>>
अगदी अगदी आशु.
निंबे, तुला नेमकं काय करायचं ह्यातलं??
Pages