निसर्गाच्या गप्पा-१

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 December, 2010 - 10:33

इथे मी हा नविन धागा काढत आहे कारण आधी निसर्गाच्या गप्पा हे गप्पांच्या पानांमध्ये झाले होते त्यामुळे ते उडून जात होते. पण सगळ्यांचीच माहीती अगदी जतन करुन ठेवण्यासारखी असल्याने आधीचे काही गप्पांच्या पानांचे मजकुर इथे कॉपी करुन पेस्ट करत आहे.
निसर्गाच्या गप्पा

ज्यांना निसर्गाच्या झाडा, पाना, फुलांचे किंवा इतर नैसर्गिक घटकांचे आकर्षण आहे अशा व्यक्तिंना इथे विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी हा धागा आहे. आपल्याला आवडत असलेल्या नैसर्गिक घटकाची माहीती इथे शेअर करा.

आत्तापर्यंत इथे खालील गप्पांरुपी माहीती जमा झाली आहे. सावलीने प्रत्येक पान चाळून पानांवरील मुद्दे जमा करुन माझे काम सोपे केले आहे.
पान १:
चर्चा- स्वर्गिय नर्तक,अप्सरा ,कोतवाल,हॉर्नबिल/ धनेश /ढापणचोच्या,पळस
फोटो- हॉर्नबिल/ धनेश, पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा
Tree List - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २:
चर्चा- हळद्या /गोल्डन ओरिओल,मधुमालतीची वेणी ,फुलांच्या वेण्या,बुचाचे झाड,बकुळी/ओवळीण,केळफूल,केळी,चवई
फोटो- बकुळीचे झाड ,पपई,अबोली,मिरची,कोरांटी,पळस,सूझन
मराठी पक्षांची नावे शोधण्यासाठी एक वेबसाईट
http://www.birdsinfo.net/birdsinfo/marathibirdnames.aspx

पान ३:
चर्चा- पांगिरा/पारिंगा/पांगरा/पांगारा ,पर्जन्यवृक्षाची फूले ,सँडपेपर चे झाड
फोटो- पावडर पफ,गणेशवेल/चित्तरंजन, जांभळ फुल,अंजीराच्या कूळातील झड ,वाघूळ फूले/ब्रम्हदंड

पान ४:
चर्चा- सावरीची बोंडे ,मेक्सिकन सिल्वर कॉटन ,गजरे
फोटो- निगडी/ वनई/ निर्गुडी,नागवेलीची पान,माका

पान ५:
चर्चा- सप्तपर्णी,भांबुर्ड्याची पाने ,ओवा, नागवेलीची पान ,दिल्ली सावर,खाऊची पानं
फोटो- ओव्याचं झाड,नरक्या

पान ६:
चर्चा- एरंड,खायच्या पानांची वेल ,काटेसावरी, बकुळ/ओवळीण, घाणेरी,पावडर पफ,ओवळदोडा,कवटी चाफा,भुईचाफा
फोटो -अस्वने,घाणेरी

पान ७:
चर्चा- सुगंधी अशोक ,सुरण फूल
फोटो -माऊ,टोपली कारवी

पान ८:
चर्चा- टोपली कारवी , पपनस ,तिवर,बांबु
फोटो - हाशाळे, हिरडे,अंबोलीची जांभळे,रातांबे/ कोकम,नेर्ल्या, तोरणं,रानद्राक्षं, वेली करवंद ,बांबु

पान ९:
चर्चा- चारोळ्याचे झाड,माकडांचे लाडु ,अस्वलाच्या भाकर्‍या, बेडकीचा पाला ,अहमदाबादी मेवा, बांडगूळ,सोनघंटा
फोटो - निळी जास्वंद,चिकट पारदर्शक रसवाली फळ, शिवण / गंभारीची फूले,केसात माळायची करवंदे, वाघरी (आमरी म्हणजेच ऑर्किड)

पान १० :
चर्चा - बांडगुळ, अहमदाबादी मेवा/रांजणं, अंबोली, सुंब्ळकाव्/कांगला, रोरायमा, माउंट केनया, वेलीवरील कंदमळे - कोनफळ, रान कंद-हलदे, हळद
फोटो - दिल्ली सावर, चेंगट, चिवडुंग फुल, गुलाब, वेलीवरील कोनफळे, जंगली फळे, हलदे, हळद

पान ११:
चर्चा - ओल्या हळदीचे लोणचे, पाम ट्री, चापलुस जंगली फुल.
फोटो - जास्वंद, जास्वंद फळ, नॅपी व्हॅली, जंगली फळे, हळद पुष्पकोष, चापलुस जंगली फुल, सालेर-मुल्हेर मधील फुले, धोतरा फुल, फळ, निवडुंग फुल, गणेशवेल

पान १२:
चर्चा - टॅबेबुया
फोटो - गुलाबी टॅबेबुया, चेंडूफळ, चित्तरंजन, सोनबहावा, सब्जा

पान १३ :
चर्चा - सब्जा, गप्पा
फोटो - पांढरी फुले, कनकचंपा, गायत्री, गोरखचिंच, अनोखे गुलाबी फुल, केशरी फुले, विषवल्ली, जांभळा, पांढरा, गुलाबी, रक्त कांचन, चाफा, रंग बदलणारी फुले, शेवग्यांची फुले, माशांचे, मुंग्यांचे घरटे, झरबेरा, कमळ, कुंदा, गुलाब.

पान १४:
चर्चा - मोरआवळा, मधुमालती, लाजेरस्ट्रोनिया, राणिच्या बागेतील गटग, फुलांचे प्रदर्शन, कॉफी, मुंग्या, गांधिलमाशि, मधमाश्या
फोटो - कोबीसारखे फुल, घाणेरीची फळे, भुईरिंगण

पान १५:
चर्चा - रानवांगी, काटेरिंगण, काटेरी धोत्रा, उंदीर, वनऔषधी
फोटो - रिंगण

पान १६ :
चर्चा - उंदीर मारण्याचे उपाय, ठाकरं, विजय बदलापुर फार्म
लिंक - संडे शेतकरी बदलापुर फार्म - http://sundayfarmer.wordpress.com/

पान १७:
चर्चा - राणिचा बाग गटग, शेल्फेरा, सोनसावर, स्पॅथेडीया, बदलापुर फार्म,
फोटो - स्पॅथेडीया
लिंक - शेल्फेरा - http://www.maayboli.com/node/21956
सावलीची लिंक - http://www.maayboli.com/node/21676?page=3

पान १८:
चर्चा - पक्षीगनणा, शेतकरी, ऑगॅनिक भाज्या
फोटो - गवतावरील काटे, बदलापुर फार्मवरील भाज्या, अनोखे गुलाब, मिरी, भुताचे झाड

पान १९:
चर्चा - डोंबिवली, अ‍ॅलोपथी, आयुर्वेद, शेतकरी जीवन, कुंडीतील कोथिंबीर लागवड, वांगी, कलिंगड, मिरी लागवड, तुळशीचा उपयोग्/वापर, जास्वंद, झाडावरील किडींवर घरगुती उपाय
फोटो - लालमाठ, हिरवा माठ, पालक, पातमुळा, वाल, तुर, भेंडी
लिंक - ट्री लिस्ट - http://www.astro.caltech.edu/~vam/abadtrees.html

पान २० :
चर्चा - शेती, कदंब, अ‍ॅडेनियम, रतन अबोली, अबोलीच्या जाती, भोपळा लागवड, बिया गोळा करण्याच्या पद्धती, भोपळ्याला फळ धरण्याचे उपाय

पान २१:
चर्चा - मिरी, असुदेची शेती, बियाण, झाडे लावण्याच्या टिप्स, पिक काढणे, पुष्करणी, बियाणे जमवायच्या सोप्या टिप्स, भाज्यांच्या सालींचा उपयोग,
फोटो - मिरची, टोमॅटो, भेंडी, केळी, पोलिओ डोस

पान २२:
चर्चा - पोलिओ डोस, कलिंगड टोपी, घायपात, गाजर लोणचे, गावठी गुलाब
फोटो - दिल्लीसावर, घायपात, पांगारा, पळस, पांढरी सावर

पान २३:
चर्चा - गुलाबवेल, झाडांची दृष्ट, घायपात, गान्धीलमाशीला आकर्शीत करण्याचा उपाय, पाठारे नर्सरी, कांडोळ
फोटो - उन्दीरमारी

पान २४:
चर्चा - गिरिपुष्प, कांडोळ, कावळ्याच्या घरट्याचे निरिक्षण, पिंपळ पान, पॅशनफ्रुट
फोटो - कांडीळ, पिंपळ, कोवळी पिंपळ पाने

पान २५ :
चर्चा - वड पिंपळ आणि पक्षांचा वावर,कमण्डलु, पिंपळी, कलिंगड, ऋतुचक्र आणि बहर,
फोटो - कांडोळीचे फुल, कमण्डलु, मिरीवेल

पान २६
चर्चा - मिरची, मुंग्या, अळीव
फोटो - बशीच्या आकाराची फुले, पावडरपफ, निळी फुले, उंदीरमारी, नेवाळी

पान २७ :
चर्चा- ग्लिरीसीडीया (उंदीरमारी) ची माहीती, गिरीपुष्पाचे रंग,
फोटो - अळीवाची रोपे, किरकिरीचे झाड, किरकिरीची फळे,
लिंक - उंदीरमारी http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:5L9miXEOFGUJ:www.fl...
http://www.youtube.com/watch?v=D5E5TjkDvU0

पान २८:
चर्चा - सायली, नेवाळी, जुई, कृष्णकमळ, मधुमालती, द्राक्ष, गोकर्ण, तोंडली वेली, पॅशनफ्रुट च्या रोपांचे वर्णन, कुंडीतील वेली, अफ्रीकन ट्युलिप
फोटो - अ‍ॅडेनियम, लाल सदाफुली, सदाफुलीच्या शेंगा, अळू, निशीगंधा, जास्वंद्,झिपरी,

पान २९:
चर्चा - सावरीची बोंडे, हळद लागवड, पळस, बांबु, पांगारा, किडीवरील घरगुती औषध (हिंग, हळद)
फोटो - डवचाणे/आंबोठोल, पळसाची फुले, नागचाफ्याचे फुल, ब्राउनियाचे फुल, स्प्रिंगसारखी फुले, कलाबश, बांबुचा फुलोरा, पांगारा

पान ३०:
चर्चा - पांगार्‍याच्या बिया,हळद, बांबुचा फुलोरा, द्राक्षाच्या वेलीची लागवड,डवचाणे,कवठीचाफा. झुरळाचे झाड, गुंज, आघाड्याच्या बिया, मेदळ शेंगा
फोटो - कवठीचाफा, मेदळ शेंगा,वेल्,फुले

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा पळसाच्या माहीतीबद्दल धन्स. कधी फोटो मिळाला तर तो पण टाका.
बाकी पारिंग्याच्या फुलाबाबत अगदी बरोबर लिहीलत. मी दिनेशदांच्या कुठल्यातरी लेखात कर्दळीचा फोटो टाकला होता अगदी तसाच कलर असतो.

जयु हे बकुळीचे झाड आहे.
Bakul.JPG

वा! मस्त धागा.... आमच्या घरी परसबाग नाही, पण चुलतबहिणीच्या घरी काल गेले होते...तिने मोठ्या हौसेने पपई, वेली भोपळा, कोरांटी, मिरची लावलेत.... नुकताच कोरा करकरीत कॅमेरा हाती आलाय.... त्यामुळे मुक्तपणे क्लिकणे सुरु आहे. बहिणीच्या परसबागेचे हे काही फोटोग्राफ्स :

पपईच्या झाडाला लगडलेल्या पपया इतक्या छान रसरशीत दिसत होत्या म्हणून सांगू...

हा क्लोज-अप!!!!!

ही देखणी पिवळी-केशरी फुलं हिरव्या कंच पानांच्या पार्श्वभूमीवर इतकी मस्त उठून दिसतात...

मधूनच हिवाळी उन्हात अंग शेकणारी अबोली....

तोर्‍यात मिरवणारी लाल चुटुक्क मिरची....

आणि ज्या कोरांटीच्या गजर्‍यांसाठी लहानपणी अगदी जीव टाकायचो ती ही पांढरी कोरांटी....

कसला तिचा देखणा पसारा ..

परसबागेचा आनंद काही न्याराच असतो. कोवळ्या लुसलुशीत पानांचा तो थंड गार स्पर्श, लवलवणार्‍या फांद्या, केसांत अडकणारी पाने, कोवळ्या उन्हांत शेक घेणारी पालवी, हिरवाईचा मस्त सुगंध... मला हा आनंद काल लुटता आला, इथे तुमच्या बरोबर तो शेअर करत आहे. Happy

अरे वा. अप्रतिम धागा.

अकु पपया कसल्या गोल गरगरीत आहेत Happy

धनेश बद्दल चर्चा झालीये ना मागच्या पानावर. त्याला ढापणचोच्या असं पण म्हणतात. मी पाहिलेले पिवळ्या धम्मक आणि खुप मोठ्या चोचीचे होते.

कोकणात आणखी एक हळद्या नावाचा पक्षी दिसतो साधारण कावळ्याएवढा पण पुर्ण पिवळा धम्मक.
ठाण्यात अगदी आतापर्यंत खुप तांबट, खंड्या दिसायचे पोपट दिसायचे. आता जरा कमी झालेत.

अरुंधती पपई मस्तच आहेत.
ती पिवळी फुले पण खुप सुंदर आहेत. अग मी सकाळी मॉर्निंग वॉकला जातेना तेंव्हा मला रस्त्याच्या कडेला तिन प्रकारच्या कोरंट्या दिसतात. पिवळी, पाढरी आणि जांभळी. मी ते बघतच जात असते. आज बुचाची फुले बघत थांबले तेंव्हा शेवटी नवरा ए फुलवेडी चल करुन मला आपण मॉरनिंग वॉकला आलोय ह्याची आठवण करुन दिली.

सावली धन्स.

सावली, हळद्या उर्फ गोल्डन ओरिओल, मुंबईत पण दिसतो कधी कधी. मस्त चमकदार पिवळा रंग असतो त्याचा.
चला अकुला पण आमचे वेड लागले म्हणायचे.

जागू, अगं माझ्या मामाआजोबांच्या बंगल्याच्या कंपाऊंडला पांढर्‍या, पिवळ्या व जांभळ्या कोरांटीची भली थोरली झुडुपे होती...त्यांच्याकडे राहायला गेले की रोज त्या फुलांचा भरघोस गजरा करून माळायचे. खूप मस्त दिसतो हा गजरा. बहीण ह्या कोरांटीची वेणी गुंफते. मला येत नाही करता....पण करायला कौशल्याचे काम. आणि अशी वेणी दिसतेही छान. Happy

दिनेशदा, वेड तर लहानपणापासूनच आहे Proud अगोदर नजरेने मनात बंदिस्त करायचे, आता कॅमेर्‍यात करतेय! Happy

माझ्या लहानपणी मी निसर्ग खुप जवळून पाहिलाय. त्यामुळे मला हे सर्वच वाचयला खूप आवडते.

जागू,पळस तू पाहिलाच असशील.... करवंदं किंवा जांभळं द्यायला कातकरी लोक पळसाच्या पानाचा द्रोण बनवतात. किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळी मिळायच्या.

palash leafs.jpg

हा फोटो पाहून ती म्हण आठवते.. ''पळसाला पाने तीनच "

वर अबोली,पपई आणि बकुळीचा फोटो दिल्याबद्दल धन्स.. Happy ...

बहीण ह्या कोरांटीची वेणी गुंफते
माझ्या गावी मधुमालतीची वेणी गुंफतात. इतकी सुंदर दिसते ती. फुलाच्या अगदी मुळाशीच अगदी घट्ट वेणी घातलेली असते आणि मग बायका अंबाड्यावर माळतात आणि शाळकरी मुली दोन वेण्या घालुन त्यापैकी एका वेणीवर माळतात.

अशी देठानीच वेणी गुंफण्यासाठी आदर्श फूले म्हणजे आकाशनीम आणि गुलबक्षी. गोव्यात त्याच्य अश्या वेण्या वळतात.
अपल्यासारख्या सामान्य माणसांना वेण्या गूंफाव्या लागतात. पण खर्‍या निसर्गकन्येसाठी खुद्द निसर्गच वेणी गुंफून देतो. त्याचे नाव सीतेची वेणी ( य नावाचे एक ऑर्किड असते. सुंदर गुलाबी नाजून फूलांची वेणीच जणू )
याच सीतेची आसवं पण याच नावाच्या फूलांच्यारुपाने निसर्गाने जपून ठेवलीत.

अकुच्या फोटोतल्या केशरी फूलांना सूझन म्हणतात. दक्षिण आफ्रिकेतील आहेत ती मूळची.

थक्स जागू बकुळीच्या फोटोबद्दल. असे झाड आमच्या शाळेच्या आवारात होते.पण तेव्हा मला माहित नव्ह्ते हेच ते बकुळीचे झाडं. :(नाहितर मी फुले वेचुन ठेवली असती.
वर बर्याच जणांनी फुलांच्या वेण्यांबद्दल लिहले आहे.त्याचे नमुने पह्हयला आवड्तील. Happy

वर बर्याच जणांनी फुलांच्या वेण्यांबद्दल लिहले आहे.त्याचे नमुने पह्हयला आवड्तील
अता कुठे मिळणार असले नमुने? मी गावी गेल्यावर विचारीन गावात अजुनही कोणाला येताहेत का वेण्या ते आणि विडिओ बनवेन.

आज सिवुड्सला गेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजुंवर आकाशनिम बहरलाय अगदी..... नव्या मुंबईत हे एक बरे आहे. एकेका रस्त्याला एकेक झाडांची नावे आणि मग त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला फक्त तीच झाडे... Happy

सोलापुरला गेले होते तेव्हा आकाशनिम प्रथम पाहिला. सोलापुरहुन सुमो करुन पंढरपुर वगैरे तिर्थे करायचा घाट घातलेला सिनियर मंडळींनी, सोबत आम्ही Sad शहरातुन जाताना मी नेहमीप्रमाणे मान वाकडी करुन सुमोत बसुन बाहेरची झाडे पाहात होते तोच अगदी धुंद सुगंधाचा मोठा झोत अंगावर आदळला. गंध एकदम अनोळखी. वेल आहे, झाड आहे, झुडुप आहे की अजुन काय आहे ते कळेना. गाडी तोवर पुढे गेलेली पण त्या गंधाने अगदी बेचैन केले. कुठल्या फुलाचा वास आहे ते कळल्याशिवाय आराम नाही जीवाला. संध्याकाळी परत तिथुन परतताना नीट लक्ष ठेऊन राहिले आणि गंध कुठुन येतोय त्याचा शोध लावला. झाड पुर्ण पांढरे झाले होते. पुर्ण फुललेला आकाशनीम अतिशय सुंदर दिसतो. (आज संध्याकाळी कॅमेरा घेऊन जाणार आहे फोटो काढायला). तेव्हा त्याचे नाव माहित नव्हते. 'बुचाचे झाड' हे नाव खुप मराठी कादंब-यात वाचलेले. इंटरनेटशी ओळख झाल्यावर एके दिवशी सहजच हे नाव शोधले आणि सोलापुरला भेटलेल्या झाडाचे नाव कळले.

गोकाकला गेले होते तिकडे या झाडांची विशेष गर्दी पाहिली. जिकडे तिकडे हीच झाडे आणि सप्टेंबरातही झाडांखाली फुलांचा खच पडला होता. एका बोर्डावर गोकाकची माहिती लिहिली होती त्यात या झाडाचा उल्लेख गोकाकची झाडे असा करुन यावरुनच त्या गावाचे नाव गोकाक असे पडले असे लिहिले होते.

मस्कतमधल्या मूख्य रस्त्यावर पण याची खूप झाडे आहेत.
वेण्या आणि आंबाडा यांचे नाते होते. केसांच्या वेणीवर गजरा शोभतो, वेणी नाही.
टपोरे गुलाब, मोगरा, झिपरीची पाने, शोभेची करवंदे, सोनचाफ्याच्या कळ्या, कलाबूत, पांढरी पिवळी शेवंती, मरवा, बटन शेवंती सगळे वापरले जायचे, वेण्या करताना.

दिनेश आमच्या गावी बायका लग्नकार्य वगैरे असलं की आंबाड्यावर एका वेळी एक वेणी माळुन थांबत नाहीत. त्यांना दोन दोन लागतात Happy तो भलाथोरला अंबाडा घातला की आधी एक मोठ्या शेवंतीची जाडजुड, भरपुर कलाबुत, हिरवा व गडद गुलाबी रंग असलेली सुतळी आणि शिवाय ती ग्रेट झिपरीची पाने घातलेली (याचे नाव मला माहित होते, आता विसरले) वेणी माळायची आणि मग त्याच्याझाली अबोलीचा वळेसार.

मी कधी एकापेक्षा जास्त फुले डोक्यात घातली की मैत्रिणी हसायच्या 'काय फ्लॉवरपॉट केलायस' म्हणुन. मी म्हणायचे, गावी या, आम्ही नुसत्या फ्लॉवरपॉटवर थांबत नाही, अख्खे झाडच घालतो डोक्यात Happy

दिनेशदा, तुमचं जुन्या माबोवर एक पोस्टच होतं ना, वेण्या, वळेसर यांबद्दल? वाचल्याचं आठवतंय.... आता पुन्हा शोधायला लागेल. त्यात बरीच माहिती होती वेण्या, गजरे, वळेसरांबद्दल. कोणाकडे लिंक असेल तर द्या इथं प्लीज!

तमिळ लोकांकडे देवाला अर्पण करण्याचे जे हार असतात तेही सुई-दोर्‍यावाचून बनवलेले असतात. फुलं अगदी घट्ट गुंफलेली.... वळेसरासारखीच धाग्यावर विणून घट्ट गुंफलेली.... त्यांबद्दलही माहिती असेल तर जरूर सांगा. हे असे दिसतात ते हार : puja1.psd_.jpg

साधना, गावाकडे गेलीस की नक्की त्या वेण्यांचे फोटो घे आणि टाक इथं.

अरे हो तो जांभळा गोंडा राहिलाच की. मस्त कॉन्ट्रास्ट असायचा.
अकु बघायला पाहिजे ते पोस्ट कुठे आहे का ?

साधना, फुलांचे कौतूक कोकणी बायकांनीच करावे. अगदी आजही तिथल्या बायका केसात फूल माळणारच, भले ते जास्वंदीचा का असेना. मुंबईत कोळणी अशीच फूले माळायच्या.
पण डॉ डहाणूकरांनी लिहिले होते की अगदी अलिकडच्या काळापर्यंत त्यांच्या भागात (श्रीरामपूर वगैरे ) बायकांनी केसात फुले माळणे निषिद्ध होते. ती बाई वाईट चालीची समजली जायची. आणि तशी खास माळण्यासाठी फूलेही मिळायची नाहीत.

वर डहाणुकर बाईंनी लिहिलेय त्याच्या नेमके उलट कोकणात आहे. माझ्या आईच्या पिढीतल्या सौ. बायका ह्या केसात फुल माळल्याशिवाय घराबाहेर पडणारच नाहीत. अजुनही एखादी कोकणी वृद्ध स्त्री दिस्ली तर तिच्या केसांकडे पाहा. अगदी शेपटी झालेले चार केस, त्यांची जुडी करुन रबरात गुंडाळली असेल पण त्या जुडीवर एक अगदी अनंताचे का होईना पण फुल खोवलेले असेलच असेल.

माझ्या सासुबाई माझ्याकडे आल्या की कुंडीतले जे मिळेल ते फुल तोडुन केसात खोवतात. मी फुले तोडत नसल्याने माझा जिव अगदी खालीवर होतो पण गप्प बस्ते. त्यांना तर आनंद मिळ्तो ना??

अकु.. हल्ली जे दिसेल त्याचे डॉक्युमेंटेशन करायचा सपाटा लावायचे ठरवलेय. अजुन १० वर्षांनी आज दिसतेय तेही दिस्णार नाही Sad

दिनेशदा,
राजापूर भागात बकुळीला 'ओवळीण' म्हणतात का?
कोकणातल्या आमच्या घरी परसदारी मूळ पुरुषाचे म्हणून बकुळीचं झाड आहे.
कातरवेळी त्याच्याकडे बघत राहताना खूप आश्वासक वाटत मला !

सगळ्या गणगोतावर, लेकराबाळांवर, घरावर, वाडीवर त्याची कृपा आहे, वडीलधारी नजर आहे.
असं वाटत राहतं.
निसर्गाशी असणारे आपले रेशीमधागे असेच अतूट असतात.
त्याच्याप्रती वाटणारी कृतज्ञता शब्दातीत आहे.

बकुळीच्या फूलाला निसर्गतः एक छिद्र असते. त्याचा गजरा करण्यासाठी सुईची गरज नसते, म्हणून हे नाव पडले असेल का ?
मुंबईत फ्लोरा फाऊंटनला एक छान वाढलेले बकुळीचे झाड आहे, अगदी अनपेक्षितरित्या तिथे फूले अंगावर पडतात.
मस्कतला अनेक ठिकाणी याची झाडे आहेत. रस्ता दुभाजकावर पण ती आहेत. तिथल्या कडक उन्हाळ्यात ही सुगंधी फुलाची झाडे आहेत आणि ती भरभरुन फूलतात, याचेच कौतूक आहे. अर्थात त्या लोकांना सुगंधाचे वेड आहेच. सुगंध आणि उष्णता यांचे नाते आहे.
इथे नैरोबीत जागोजाग गुलाबाची झाडे आहेत, भरपूर फूले येतात, आकार मोठा आणि रंगाचे वैविध्य असले तरी अजिबात सुगंध नसतो. (कारण इथली हवा अगदी थंडगार आहे.)

एखाद्या झाडाचे फूल बघितले कि त्याचे परागीभवन कोण करत असेल, असा माझा विचार सुरु होतो.
केळफूलाची रचना बघा. ती फूले वरच्या दिशेने दिसतच नाहीत. (वर आवरण असते) म्हणावा तसा सुंगध नसतो. रंगही आकर्षक असा नाही. म्हणजे पक्षी, किटक, मधमाश्या यांच्यावर या झाडाची जबाबदारी नाही.
एका झाडावर पाळत ठेवली त्यावेळी संध्याकाळच्या वेळी त्यावर पाकोळ्या (वटवाघळाचा छोटा प्रकार ) भिरभिरताना दिसल्या आणि हे कोडे सूटले. त्यांना बसण्यासाठी अगदी योग्य आकार. असा प्रकार सर्वच केळ्यांच्या बाबतीत दिसला, अगदी घाटात पावसाळ्यात जाग्या होणार्‍या चवई च्या बाबतीत पण खरा.
(बंगरुळुला तर खार पण त्या केळफूलाच्या आता खुडबुडताना दिसली )

पण नायजेरियात एक वेगळीच जात बघितली. झाड कर्दळीपेक्षा जरा मोठे. हि झाडे माझ्या नेहमीच्या बघण्यातली. मग एकदा त्यावर फुले आलेली दिसली, ती अगदी केळफूलासरखी पण वरच्या दिशेने टोक असलेली. मग कायम त्या झाडांवर नजर ठेवली. काही दिवसांनी त्याला केळ्यासारखीच पण अगदी छोटी फळे लगडलेली दिसली. ती पण फण्यांच्या स्वरुपातच पण फण्यांचा अंतर्गोल भाग वरच्या दिशेने.
मला राहवले नाही म्हणून त्या घरात चौकशी केली तर ती केळीच असून खाद्य आहेत ते पण कळले.
फोटो काढायचा राहिलाच. कुणी बघितली आहेत का ?

दिनेशदा.. हे झाड कोणते.. केळीसारखेच दिसते.. रानकेळी असा काही प्रकार का ? केळी येतात पण खाण्यास योग्य असतात का.. ?

हे नक्कीच एखाद्या घाटात दिसले असेल. याला चवई म्हणतात. याचे केळफूल आणि केळी दोन्ही चवदार असतात. केळी जास्त गोड असतात पण केळ्यात छोट्या बिया असतात. याची पाने अंथरुण म्हणून वापरता येतात.

Pages