इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
शेवटी मिल्याने गाडी घेतली की
शेवटी मिल्याने गाडी घेतली की नाही?
आता टाटाची आरिया येतेय ना!
माहितीसाठी धन्यवाद गिरीराज
माहितीसाठी धन्यवाद गिरीराज
त्या विकत घेणारे लोक्स असणं
त्या विकत घेणारे लोक्स असणं हे आपली अर्थव्यवस्था चांगली चालल्याचे लक्षण आहे.>>>
हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. हा वाढत्या विषमतेचा निर्देशांकही असू शकतो. आपल्या देशासारख्या वैविध्य आणि दारिद्र्य असणार्या देशात ही वाढती विषमता भयावहही ठरू शकते. नव्हे ठरतेच आहे. दरवर्षी वाढणारी नक्शल जिल्ह्यांची संख्या काय दाखवते? हा ह्या बी बी चा विषय नाही. पण अर्थव्यवस्था चांगली चालल्याचं लक्षण आहे असा निष्कर्ष काढण्यात जरा घाई होतेय एव्ढेच माझे मत....
अॅक्टिव्हा सकाळी स्टार्ट
अॅक्टिव्हा सकाळी स्टार्ट होताना फार त्रास देते . म्हनजे बटन स्टार्ट तर होतच नाही पण किकनेही लवकर होत नाही. हा सगळ्या आक्टीवांचा प्रॉब्लेम आहे असे म्हणतात...याचे कारण काय आणि उपाय काय?
माझी स्कूटी होती तेव्हा असे
माझी स्कूटी होती तेव्हा असे व्हायचे तेव्हा मेकॅनिकने सांगितले होते की साईड स्टँडला गाडी सतत असेल तर बॅटरीमधल्या लिक्विडची लेवल बरोबर यायला वेळ लागतो. त्यामुळे असे होत असावे. सध्या माझी अॅक्टिव्हा साईड स्टँडला लावली की सकाळी हा अनुभव येतो. मेन स्टँडला असताना लवकर सुरु होते. हे कारण खरंच असावे असा अंदाज.
सगळ्या अॅक्टिव्हांचा >> जड असल्याने बहुधा अॅक्टिव्हा साईड स्टँडलाच असतात, हे माझे निरीक्षण.
आशु.. जर हे कारण असेल तर
आशु.. जर हे कारण असेल तर काहीतरी चुकीचे वाटते आहे.. तरीपण जर असे होत असेल तर बॅटरी मध्ये व्यवस्थित पाणी आहे की नाही ते चेक करुन घे.. कारण गाडी जेव्हढी तिरकी होते त्यावरुन पाण्याची लेव्हल जर जास्तच कमी तरच हा प्रॉब्लेम येऊ शकेल.. अन्यथा दुसरे काही तरी कारण असणार..
मला नाही येत रे हिम्या हा
मला नाही येत रे हिम्या हा प्रॉब्लेम नेहमी.. मुळात माझी गाडीच ५-५ दिवस बंद असते. पण स्कूटीच्या वेळेस हे सांगितल्याचे आठवते की शक्यतो रात्री तरी गाडी मेन स्टँड्ला लावा. आता मला त्याची सवयच झाल्याने तसा प्रॉब्लेम आलाच नाही. त्यामुळे 'हे खरं असावं असा अंदाज' असंच सांगितलं.
५-५ दिवस गाडी बंद
५-५ दिवस गाडी बंद राहिल्यामुळे बॅटरी डिस्चार्ज होऊन प्रॉब्लेम नक्की येऊ शकतो.. पण ते बॅटरी तिरकी होऊन पाण्याची लेव्हल वगैरे.. जर खरे असेल तर त्या पाण्याचे गुणधर्म नक्कीच तपासावे लागतील..
आता कुठून तपासू रे बाबा..
आता कुठून तपासू रे बाबा.. गेली माझी स्कूटी... पाण्यासकट.
आमचा मेक्यानिक म्हनतो, ४
आमचा मेक्यानिक म्हनतो, ४ स्ट्रोक गाड्यांचा हा प्रोब्लेम असतो. इतके दिवसात हा दूर का होत नाही?
छोटी कार घ्यायचा विचार आहे.
छोटी कार घ्यायचा विचार आहे. शेवरर्ले बीट आणि निस्सान मायक्रा या दोन चांगल्या वाटतात. यांच्यापैकी कोणती अधिक चांगली याबद्दल कोणी माहिती देईल का?
हा धागा पुन्हा वर आणण्याचे
हा धागा पुन्हा वर आणण्याचे प्रयोजन एवढेच, की मला तुम्हा सर्व लोकांना धन्यवाद द्यायचे आहेत.
कळवण्यास आनंद वाटतो, की मी परवाच मारुती सुझुकी रिट्झ (व्ही डी आय) बुक केली. या निर्णयापर्यंत येतांना मला वरील चर्चेची फार मदत झाली.
इथे लिहिणार्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार !
आणि 'साजिरा' यांचे तर विशेष आभार !!
संजय२०१०, माझं मत निस्सान
संजय२०१०,
माझं मत निस्सान मायक्राला
ज्ञानेश, तुझा प्रतिसाद आता
ज्ञानेश, तुझा प्रतिसाद आता पाहिला. धन्यवाद. नवीन गाडीबद्दल हार्दिक अभिनंदन.:) विश यू द फँटॅस्टिक राईड्स!
संजय २०१०, दोन्ही गाड्या ग्रेट. पण निस्सानची किंमत लाखाने तरी जास्त आहे. शिवाय थोडी जास्त मोठी आणि इंप्रेसिव्ह पण आहे 'बीट' च्या तुलनेत.
सगळं डिस्कशन मी परत वाचून परत
सगळं डिस्कशन मी परत वाचून परत काही प्रश्न विचारेन योग्य वेळ येईल तेव्हा. तूर्तास... स्कॉर्पियो बद्दल सांगण्यासाठी हे पोस्ट.
मोठी गाडी असायला हवी तशी ही गाडी अजिबात स्टेबल नाही. फार उड्या मारते. लांबच्या प्रवासाला गाडीत बसून थकायला होतं इतकी हाडं खिळखिळी होतात.
कोकणात इत्यादी तर उपयोगच नाही. जुन्या खिळखिळ्या इंडिकामधे जेवढे हाल होणार नाहीत तेवढे झालेत माझे हाल.
स्कॉर्पियो बद्दल सांगण्यासाठी
स्कॉर्पियो बद्दल सांगण्यासाठी हे पोस्ट.
मोठी गाडी असायला हवी तशी ही गाडी अजिबात स्टेबल नाही. फार उड्या मारते. लांबच्या प्रवासाला गाडीत बसून थकायला होतं इतकी हाडं खिळखिळी होतात.>>>> माझ्या चुलत भावाकडेही स्कॉर्पियो आहे. त्यानेही असेच सांगितले.
आम्ही आय १० स्पोर्ट्झ
आम्ही आय १० स्पोर्ट्झ ऑटोमॅटीक घेतली. छान वाटतेय अजुन तरी.
परवा मला ओरिसात इंडिगो आणि
परवा मला ओरिसात इंडिगो आणि चेन्नैत लान्सर हॉटेल तर्फे, मजा आली नेहमी इंडिकाच असते ताबडायला.
नॅनो वर चार वरशाची वारंटी देणार आहेत. तरीही सेल्स पिकप करत नाही.
मोठ्या गाड्यांमधे जो कंफर्ट
मोठ्या गाड्यांमधे जो कंफर्ट इनोव्हा मधे आहे तो स्कॉर्पिओ, झायलो ला नाही.....
नवीन टाटा अरिआ पण डिझाईन्वाईज मस्त आहे....कोणी बसून ड्राईव्ह केलिये का?????
त्यामानाने प्राईज जास्त आहे.....
इंडिगो इ सीएस बद्दल कोणी
इंडिगो इ सीएस बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का?
इंडिगो इ सीएस साठी खालील
इंडिगो इ सीएस साठी खालील लिन्क वाचावी
http://www.team-bhp.com/forum/test-drives-initial-ownership-reports/9398...
in general -
www.team-bhp.com या साईट ची पारायणं करायला हरकत नाही.....
मायबोली व्यतिरिक्त मी तिथेच पडीक असतो
---------------
http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/
http://www.team-bhp.com/forum/official-new-car-reviews/
http://www.team-bhp.com/forum/test-drives-initial-ownership-reports/
http://www.team-bhp.com/forum/long-term-ownership-reviews/
http://www.team-bhp.com/forum/hatchbacks/
http://www.team-bhp.com/forum/sedans/
http://www.team-bhp.com/forum/suvs-muvs-4x4s/
http://www.team-bhp.com/forum/modifications-accessories/
http://www.team-bhp.com/forum/technical-stuff/
http://www.team-bhp.com/forum/travelogues/
प्राची, सॉरी. उत्तर द्यायला
प्राची, सॉरी. उत्तर द्यायला उशिर झाल्याबद्दल.
अर्थात इंडिगो इ सीएस च्या रिव्हुज साठी वरची लिंक वाचली असशीलच.
आता तिच्यासोबत इतर गाड्यांशीही तुलना करून बघायला हवी.
कमी किंमतीतली कॉम्पॅक्ट सेदान (सी.एस.) कार म्हणून इंडिगो-इसीएस ही गाडी ओळखली जाते. सध्या बाजारात असलेली सर्वात कमी किंमत असलेली सेदान किंवा नॉचबॅक (मागे स्वतंत्र बूट- डिकीस्पेस) असलेली ही गाडी. पण मुळची इंडिकाच. इंजिन तेच. म्हणजे टाटाचे. यातली डिझेल गाडी म्हणजे 'इंडियाज् मोस्ट फ्युएल इफिशियंट कार' अशी जाहिरात टाटा मोटर्स करते.
तू पेट्रोल गाडी घेते आहेस, की डिझेल- हे स्पष्ट केलेले नाहीस. अर्थातच तिचा काय आणि कितपत उपयोग करणार आहेस- हेही. (कौटुंबिक/व्यावसायिक वापर- कुठे वापरणार, रनिंग किती होणार.. इ.)
अर्थात किंमत कमी असते म्हणजे अनेक ठिकाणी तडजोड- हे ओघाने आलेच. एकतर टाटा मोटर्सने आपल्या कार्समधून स्वतःची इंजिने हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. (मेंटेनन्स, इंजिनचे कमी आयुष्य, आवाज/व्हायब्रेशन्स इ. कारणे.) इंडिका व्हिस्टा आणि इंडिगो मांझाला फियाटची इंजिने आहेत. या नवीन गाड्या इंजिनाची गुणवत्ता, आयुष्य, आवाज, व्हायब्रेशन्स, रिफाईनमेंट, नवीन तंत्रज्ञान, स्टाईल, पर्फॉर्मन्स, लिक्स आणि मुख्यतः मेंटेनन्स- या सार्याच बाबतीत टाटांच्या जुन्या गाड्यांपेक्षा (ज्यांत टाटांची इंजिने होती) सरस आहेत. याचमुळे जुन्या इंडिगोसीएस (नॉचबॅक-सेदान)पेक्षा नवीन इंडिका व्हिस्टा (हॅचबॅक) ची किंमतही जास्त आहे.
आऊटडेटेड लुक्स, इतर गाड्यांच्या तुलनेत एकंदरितच फिट-फॉर्म-फिनिशचा अभाव आणि जुने इंजिन- हे मुख्य प्रॉब्लेम्स. इंडिगो या नावाचा फायदा होतो आहे आणि विकली जातेय तोवर विकायची- सुगी करून घ्यायची- असं या गाडीचं आहे. (अर्थात हे तर सार्याच कंपन्या करतात). पण काहीही असले, तरी मला तरी सार्याच बाबतीत ही काँप्रोमाईज कार वाटते..
त्यातूनही टुरिस्ट पर्पज / इतर व्यावसायिक वापरासाठी असेल, तर ठीकच आहे. पण कौटुंबिक कारणासाठी असेल, तर थोडे जास्त पैसे टाकून स्विफ्ट डिझायर, इंडिगो मांझा, टोयोटा इटिऑस या गाड्यांचा विचार करून बघ.
बजेट वाढवायचं नसेल, तर इंडिका व्हिस्टा इज द राईट ऑप्शन.
अजून काही सूचलं, तर इथे लिहिनच. तोवर कुणाचे काही अनुभव असतील, तर तेही लिहा प्लीज.
धन्यवाद साजिरा. स्विफ्ट
धन्यवाद साजिरा.
स्विफ्ट डिझायर आणि इंडिगो इव्हीएस अश्या दोन आहेत यादीत. शक्यतो मारुती किंवा टाटाचीच गाडी घ्यायची आहे. कारण, देशभरात कुठेही सर्व्हिस स्टेशन्स असतात.
ओळखीत एकाची स्विफ्ट डिझायर आहे. त्यामुळे, त्याबद्दल माहिती होती. चालवूनही पाहिली, आवडली आहे.
पण इंडिगोची माहिती मिळाली नव्हती, म्हणून विचारले.
धन्यवाद.
फिगो कार ऑफ द इअर
फिगो कार ऑफ द इअर
भुंगा, मोठ्या गाड्यांमधे जो
भुंगा, मोठ्या गाड्यांमधे जो कंफर्ट इनोव्हा मधे आहे तो स्कॉर्पिओ, झायलो ला नाही.....
>>>> मी कंफर्टकरता कधीही CRV ला प्राधान्य देईन. पण आता CRV चं जे नविन डिझाईन आलय त्यात कारची उंची कमी केलीये.
Fortuner चा कोणाला काही अनुभव?
प्रची स्विफ्ट डिझायर खरच
प्रची स्विफ्ट डिझायर खरच व्ह्याल्यु फॉर मनी कार आहे.
http://www.carwale.com/research/comparecars/ इथे तु दोन्ही कार कंपेयर करुन पाहू शकतेस.
Fortuner माझी पण आवडिची गाडी
Fortuner माझी पण आवडिची गाडी आहे. त्याचे लुक्स मस्त आहेत, ग्राउंड क्लियरंस चांगला आहे. पण आत बसल्यावर इनोव्हा पेक्षा जास्त कही फरक नाही वाटला मला. (हे माझ र्पसनल ओपिनीयन आहे)
Fortuner चा कोणाला काही
Fortuner चा कोणाला काही अनुभव>> छान दिसते.
मी कंफर्टकरता कधीही CRV ला
मी कंफर्टकरता कधीही CRV ला प्राधान्य देईन.>>>>> पण इनोव्हा ,स्कॉर्पिओ ई ची किम्मत आणि CRV ची किम्मत यात भरपूर फरक आहे. आणि फॉर्च्यूनरची तर विचारूच नका!
मी फोर्चुनरने प्रवास केला
मी फोर्चुनरने प्रवास केला आहे.सुपर्ब गाडी,मला तांत्रिक ज्ञान अजिबात नाहि,पण माझे भाऊ,दिर्,आणि नवरा जाम खुश होते,त्यांच्या मते जर आम्हि अफोर्ड करु शकलो असतो तर हिच गाडी घेतली असती.
वडिलांच्या मित्राची गाडी होती,आमच्याकडे २ आठवडे होती आणि सगळ्यांनी हात मारुन घेतला
Pages