अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं अचानक ची बेसिक थीम वेगळी होती. एखाद्याला फाशीची शिक्षा देण्यापुर्वी, तो पूर्णतः तंदुरुस्त असावा असे कायदा सांगतो. मरणासन्न विनोद खन्नाला जगवण्यासाठी डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, आणि तो बरा झाल्यावर त्याला फाशीसाठी नेण्यात येते.

त्याची बायको, त्याच्याच मित्राबरोबर संबंध ठेवून असते (हि मित्राची भुमिका एका मराठी नटाने केली होती, बहुतेक रविराज.) तिला मारताना जे तंत्र तो वापरतो, ते त्याने सैन्यात शिकलेले असते. तसेच पाठलाग करणार्‍या कुत्र्याला कसे चकवायचे, हे पण तो शिकलेला असतो.

कुत्रे पाठलाग करत असताना, विनोद खन्ना 8 च्या आकारात काही वेळ धावतो असे दाखवले आहे का ?
आणि मग नंतर पळताना पायांना कापड लावुन पळतो, असेच काही तरी.

हा शिनमा मी फार फार वर्षा पुर्वी मतगणना च्या वेळेस दूरदर्शन वर शिनमा दाखवत होते तेव्हा पाहिल्याचे आठवते.

मामी फिरकी घेताय का माझी Happy , आठवत नाही बघा आता.
अलसेसियन असतील किंवा डॉबरमॅन, कोणास ठाऊक ???
पॉमेरीयन तर नक्कीच नव्ह्ती.

कुत्रे पाठलाग करत असताना, विनोद खन्ना 8 च्या आकारात काही वेळ धावतो असे दाखवले आहे का

हो.... तुम्हालाही माझ्यासारखे तुकड्यातुकड्यात काहीतरी आठवायचा प्रोब्लेम आहे वाटते.

एनी वेज, अमा, तिथे कुत्रा महत्वाचा नव्हता तर आपला कुत्र्यांकरवी पाठलाग होत असेल तर कुत्र्यांना कसे गोंधळवायचे याचे प्रशिक्षण हिरोला मिळाले होते असे दाखवायचे होते. त्यामुळे कुत्र्यावर कॅमेरा फोकस केला नव्हता, म्हणुन ब्रीड कळु शकले नाही. Happy बायकोला मारतानाही तो माणसाला वेदना न देता अचानक कसे मारायचे हे आधी मिळालेले ज्ञान वापरतो .

बायकोला मारतानाही तो माणसाला वेदना न देता अचानक कसे मारायचे हे आधी मिळालेले ज्ञान वापरतो .>>
बगा मंजे कुत्र्याचे ट्रेनिन्ग लोक कश्यासाठी वापरतात. डॉगी बदनाम हुवा विनोदभाई तेरे लिये! मला पण विनोद खन्ना खूप आवड्त असे. मेरे अपने, इम्तिहान वगैरे. शिवाय ते रोज शाम आती थी गाणे मला उगीचच हनुमान टेकडीवरच शूट केले आहे असे वाट्त असे. अजूनही वाट्ते.

अ.अ. सीन्स खूप आहेत. थोडी कामाची बतावणी करून मग टाकते.

<< हा शिनमा मी फार फार वर्षा पुर्वी मतगणना च्या वेळेस दूरदर्शन वर शिनमा दाखवत होते तेव्हा पाहिल्याचे आठवते. >>

मे बी १९८३-८४ च्या आसपास (२६-२७ वर्षे), म्हणुन अंधुक अंधुक आठवतेय.

विनोद खन्ना च्या बायको चं रोल बहुतेक मंजु सिंह / विद्या सिंहा ने केली होती.

विनोद खन्ना च्या बायको चं रोल बहुतेक मंजु सिंह / विद्या सिंहा ने केली होती.

नेटवर पाहिले तेव्हा लिली चक्रवर्ती हे नाव आढळले. मी तिला परत कधी पाहिले नाही.

अमा - त्या चित्रपटात असे कुठले ज्ञान कुठे खुप आहेत... म्हणुन तर फ्लॅशबॅकमध्ये फ्लॅशबॅक आहे Happy पण चित्रपट सुंदर आहे, कुठे मिळाला तर बघ एकदातरी. विनोद खन्नाच्या बाजुने त्याचे बायकोबरोबरचे नाते अतिशय तरल दाखवलेय. बायको मात्र तो असताना त्याच्याशी गोडगोड बोलायची, त्याला गोडगोड कॅसेटी रेकॉर्ड करुन पाठवायची आणि आणि तो फ्रंटवर असताना त्याच्या मित्राशी मैत्रीपुर्ण संबंध ठेऊन असायची. Happy

विद्या सिन्हा त्यावेळी अस्तित्वातच नव्हती !!(सिनेमात) तिचा आणि विनोद खन्नाचा सिनेमा, ईन्कार.
अश्विनी, तो इंग्रजी आठ आकारात धावून, कूत्र्याला गोंधळून टाकतो आणि मग कुत्र्याला मारतो सुद्धा.

त्यातल्या फ्लॅशबॅकची एक गंमत.
तो हॉसिटलच्या बेडवर असताना, दूरवरून रेल्वेची शिट्टी ऐकू येते. त्याला रेल्वेतला एक प्रसंग आठवतो. तो प्रवास करत असताना, वरच्या बर्थवरची एक छोटी मुलगी, चोरून आईची लिपस्टीक लावत असते. मग त्याच्याकडे बघून डोळा मारते. त्यातून त्याला बायकोबरोबरचा प्रसंग आठवतो. तो तिला सांगतो एवढी लिपस्टीक लावली तर पोटात जाईल, कुणाच्या पोटात वगैरे.
असरानी ज्युनियर डॉक्टर आणि फरिदा जलाल नर्स म्हणून होते, दोघांची कामे छान होती.

अरेच्चा, त्या कुत्र्याला 8 आकारात पळून चकवण्याच्या क्लुप्तीवरुन आठवतय अंधुक अंधुक. पण असाच कुठचा तरी सीन मिथुनदांच्या संदर्भातही आहे का ?

मामी त्यावेळी डॉबरमॅन किंवा अल्सेशियन शिवाय दुसरी ब्रीडस होतीच कुठे ?

mhamaikar मला पण आठवतो हा सिनेमा. पुर्वी मतगणनेच्यावेळी सिनेमे दाखवायचे. पण तो आठ आकारात न धावता झाडाला गोल फेरया मारतो ना?

आत्ताच युट्युबवर, अक्षयकुमार वि. अंडरटेकर फाईट पाहिली (खिलाडीपट)...डोक्याला फारच ताप झाला Happy

अक्षय व ईतर मित्रमंडळ जय मातादी च्या घोषात अंडरटेकर ला लोळवतात. एका सीन मध्ये अक्षयचे तोंड टेकरला बंगाली वाघासारखे दिसते :-O

बर्‍याचदा केबलला हा पिच्चर लावुनही पुर्ण नव्हता पाहिला, आज हा सीन पाहुन __________/\_________

ही लिंक, पाहणारा पुढच्या होणार्‍या परिणामाला जवाबदार असेल,
http://www.youtube.com/watch?v=nu0bm3Ksiko&feature=related

शनिवारी टिव्हीवर 'फुल' नावाचा चित्रपट सुरू होता. कुमार गौरव माधुरीदिक्षितच्या प्रेमात असतो आणि त्याचे वडिल राजेंद्र कुमार यांना हे कळल्यावर रागमिश्रित धक्का बसतो, अशा प्रकारचा प्रसंग होता. राजेंद्र कुमार मुलाला विचारतो, 'तू बबलीला (माधुरीला) केव्हापासून ओळखतोस?" त्यावर पुत्र कुमार गौरव उत्तरतात, " हजारो साल से .... जब से मै ६ साल का था."

परवा बीफोरयु ला 'ये पर्बतों के दायरे' हे वासना चित्रपटातलं गाणं बघितलं! गंमत म्हणजे आख्या गाण्यात पर्बत दाखवलाच नाहीये.

फारेंडा, काल 'मेरे दो अनमोल रतन' (निम्माच) पाहिला. महान अ नि अ आहे. तुझ्या यादीत टाक. Happy

त्यात मुकुल देव आणि अर्शद वारसी यांपैकी आपला मुलगा नक्की कोण असा प्रश्न सदाशिव अमरापूरकराला वीस वर्षे पडूनच राहिलेला असतो. मग त्याच्या मित्राची मुलगी परदेशातून शिकून येते नि तिचा स्टडफार्मचा व्यवसाय असतो. तर ती केवळ घोड्याकडे पाहून घोड्याचं कूळ ओळखत असते म्हणून सदाशिवकाका तिला त्या दोघांच्या सवयींचा वगैरे तपशीलवार अभ्यास करून आपला मुलगा ओळखायची कामगिरी देतात. मग ती रीतीप्रमाणे त्यातल्या एकाच्या प्रेमात पडते. अर्धाच सिन्मा काल पाह्यल्याने पुढे काय होते हे माझ्यासाठी अजून रहस्यच आहे.

वर कुठे तरी वाचल की मासा हिरोला जाग करतो त्यावरून आठवल.

जल बीन मछली चित्रपटात
"ऐसे तडपू मै जैसे जल बीन मछली" हे अख्ख गाण मासा तडफडतो आणि संध्या त्याच्यासारखी नाचते.

तात्पर्य: मासेही संध्याला घाबरायचे

अरे हसुन हसुन मेले मी हे सर्व वाचुन.

अरे अजुन कोणी "निशब्द" बद्दल कस काय लिहील नाही, काय भयानक सिनेमा होता तो.कायतर साठ वर्षाचा म्हातारा सोळा वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडतो का तर ती त्याला निरागस वाटते म्हणुन, ती जिया कोणत्या बाजुनी निरागस वाटते ? काही पण...

Lol श्रद्धा, एकच अनमोल रतन पाहिलास का? तूच लिही उरलेला रतन पाहिलास की Happy

भिब्ररा, सॉलीड! Happy

पर्बतो के दायरे मधे पर्बतच नाही हे माहीत नव्हते Happy

काय धमाल लिहिले आहे रे सगळ्यांनी! खोलीत बसून गप्पा ठोकतो आहे असे वाटते आहे! हिंदी सिनेमे तसे आचरटच असतात बर्यापैकी.
गुझारीश पहिला असेलच! त्यात तर सगळेच अ आणि अ होते, भूमिकांची नावे , कपडे, अभिनय सगळेच कहर ! सध्याचे आपले सिने नट-नट्या इतके दिखाऊ आणि सिनेमा बांधणी इतकी तकलादू कि काही अपेक्षा करणे चुकीचे आहे असे वाटते.

परवा दिवशी 'रिटर्न ऑफ खुदा गवाह' पाहिला (म्हंजे माझी बायको घरात नव्हती हे सूज्ञांना कळलेच असेल!)
हिरोच्या एंट्रीचाच शॉट- काही गुंड देवाचा मुकूट घेऊन पळताहेत, हिरोला चाकू मारतात, हिरो सिगारेट काढतो (का ते विचारु नका) त्यावर गुंड म्हणतो ' जैसे बच्चा पैदा करने के लिए मर्द और औरत की जरुरत होती है वैसे ही सिगरेट पिने के लिए माचिस भी लगती है' (वरिजिनल तामिळमधे काय डायलॉग आहे याची मला फार उत्सुकता आहे!). त्यावर हिरो ती सिगारेट त्या चाकूवरील त्याच्या रक्ताला लावतो ..........आणि सिगरेट पेटते
का तर म्हणे 'मेरे खून में इतनी गर्मी है की मुझे माचिस की जरुरत नही' Proud
यापुढे हिरोने फक्त 'मूंछोंपे ताव' दिल्यानेच गुंड उडून पडतात इ.इ. प्रसंग होते पण आधीच्या प्रसंगाने मीच निपचित पडलो असल्याने ते नीट पाहिले नाहीत!!! Proud

दिनेशदा, आजकाल बहुतेक सगळ्याच मूव्ही चॅनेल्सवर या डब(डा) सिनेमाचा रतीब अस्तो. आमच्या सोलापूरात अस्ले सिनेमे थेट्रात पाहिले आहेत त्यामुळे माझी त्यांच्याशी जरा अ‍ॅटॅचमेंट आहे!!!

Pages