अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक

Submitted by नंदिनी on 22 May, 2007 - 00:00

तुम्हाला कुठले सीन अचाट वाटतात? किंवा जे सीन लिहीताना लेखक, निर्माते दिग्दर्शक लॉजिक बाजूला ठेवून काम केल्यासारखे वाटतात?

उदाहरणार्थ्: असंख्य चित्रपटात (म्हणजे भरपूर पिक्चर्मधे) नायिका बेशुद्ध पडते. डॉक्टर येतो, तिच्या हाताची नाडी बघतो आणि म्हणतो "मुबारक हो ये मा बननेवाली है.... "

या आधिचे सीन या दुव्यावर वाचा

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्मेंद्र, राज ढब्बद, शॉटगन सिन्हा अभिनित (?)

जीने नही दूंगा नावाचा सांस्कृतिक चित्रपट कुणी पाहीला का ?

कदाचित वेगळं संस्थळ बनवावं लागेल त्यासाठी !!

आम्ही पण सिनेमा बघायला उड्या मारत गेलो तर पिक्चर होता खंडहर...

आईगं कसली भयाण आठवण या चित्रपटाची.. लहाणपणी दुरदर्शनच्य कृपेने असले चित्रपटही पहायला लागायचे. चित्रपटभर नुसते खंडहरच आठवताहेत.. अर्थात तेव्हा असले आर्ट चित्रपट कळायचे वयच नव्हते, चित्रपट चांगलाही असेल कदाचित.. अजुन एक दीप्ती नवलचा अंधा कुऑ म्हणुन चित्रपट होता.. आम्ही तेव्हा टीवीलाच अंध्या कुव्यात का टाकू नये म्हणुन जोक करत होतो..

खंडहर मृणाल सेनचा..दूरदर्शन वर कलात्मक चित्रपटांचा रतीब लावायचे तेव्हा हा पाहिला होता. अजिबात आवडला किंवा कळला नव्हता पण मृणाल सेन, नसीर, शबाना यांचा चित्रपट आवडत नाही असे स्वतःशीच कबूल करायचीही हिंमत नव्हती.
याच चित्रपटा सारखे काही सीन्स व वातावरण गुलझारच्या खुशबू जीतेंद्र्-हेमा यांचा मधे आहेत.तिथे शर्मिला टागोर आहे.
अलीकडेच वक्त पाहिला. एक पती पत्नी आणि ३ मुलगे - बिछडना - बार बार सामने आना.. आखिर मे मम्मी पापा मिलने पे पहचानना. हा चित्रपट अमर अकबर एंथनीचा बाप आहे. पण मनमोहन देसाईने पार चमत्कार मालिका करून टाकलीय.
नेहमी संयमित अभिनय करणार्‍या बलराज सहानीचा वक्त मधला पंजाबी व्यापाराचा अभिनय (कॅरेक्टरला साजेसा असला तरी) उगाच लाउड वाटला.

वक्त इज माय ऑल टाइम फेवरीट.. त्यात सुनिल दत्त, साधना आणि राज्कुमारचा विमानतळावरचा सिन तर मला खुपच आवडतो.. चित्रपटात माझा फेव शशी पण आहे. खुपच क्युट दिसतो त्यात,,. मी डिविडीच घेतलीय याची...

याच चित्रपटा सारखे काही सीन्स व वातावरण गुलझारच्या खुशबू जीतेंद्र्-हेमा यांचा मधे आहेत.

मलाही तेव्हा तेच आठवत होते.....

चित्रपट- 'हिफाजत'
पहिलाच सीन प्राणच्या मुलाचा वाढदिवस आहे,त्याच दिवशी त्याचा मित्र म्हणजे अशोककुमारला मुलगी होते, मग ते 'इस दोस्ती को रिश्तेदारीमें बदलते हैं; इ.इ. फाल्तूपणा करत असतात तेंव्हाच, केक कापायची सुरी लागून त्या लहान बाळाच्या हातातून रक्त येते (इथे कादरखानीय जिनिअसची सुरुवात होते!). त्या बाळाचे दोन्ही हात रक्ताने माखतात आणि त्यांचा ठसा टेबलक्लॉथवर उमटतो. आता त्या बाळाला ताक्ताळ डॉक्टरकडे वगैरे नेतील असं आपल्यासारख्या सामान्यांना वाटेल, पण त्याएवजी तिथे एक ज्योतिषी येतो आणि हँडलेन्समधून ते ठसे तपासायला लागतो! आता सर्वांना काळजी तो काय सांगतो याची,ते पोरग गेलं फाफलत.तो ज्योतिषीही हसतहसत सांगतो- 'ये बेटा चक्रवर्ती होगा,क्योंकी इसकी सभी उंगलियोंपे चक्र है'
आता एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर, झकास! Proud

एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर,
>>
हसून मृत्यू...
Rofl

एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर,
>>
हसून मृत्यू...<<<<

Rofl

'ये बेटा चक्रवर्ती होगा,क्योंकी इसकी सभी उंगलियोंपे चक्र है'
आता एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर, झकास!
>>>>>>>
आगाऊ... Rofl

आगाऊ..:हहगलो:

तुमच्यापैकी नविन सभासदांचे जर जुन्या मायबोलिवरचे या बीबी वरचे अफलातुन किस्से मिस झाले असतील तर.. त्यांच्यासाठी.. उचापती या आय डी ची माफी मागुन.. त्याने तिथे टाकलेले एक पोस्ट जसेच्या तसे इथे टाकतो.. आजही वाचताना हहपुवा!

या बा.फ. वर अजुन पर्यंत “जानी” राजकुमारच्या सिनेमा बद्दल कसे लिहिले गेले नाही?
अचरटपणात “जानी” राजकुमारचे पिक्चर्स कशालाही हार जाणार नाहीत. त्याचा “तिरंगा” हा सिनेमा देखील असाच अचरटपणाने भरलेला होता. बरेच दिवसांपुर्वी पाहीला असल्याने फार तपशील आठवत नाहीत. ज़े आठवतात ते असे. सिनेमात प्रलयनाथ गुंडास्वामी (कि गेंडास्वामी) नावाचा खलनायक भारतात बॉम्बस्फोट, दंगली, अतिरेकी कारवाया वगैरे घडवुन अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामधे त्याला एका मंत्री सामील असतो. तो देशातिल तिन महत्वाची शहरे मिसाईलने उडवण्याचा प्लान करतो. त्या मिसाईल्स करता त्याला “फ्युज कंडक्टर” (?) नावाचा छोटासा पण महत्वाचा पार्ट लागणार असतो. त्या साठी तो भारतातिल नामवंत साईंटिस्टसना पळवतो व मारण्याची धमकी देउन “फ्युज कंडक्टर” मिळवतो. “जानी” राजकुमार ब्रिगेडीयर दाखवला असुन तो नाना पाटेकरच्या मदतिने खलनायकाला संपवतो व देशाला वाचवतो.

सिन क्र. 1 – गावा बाहेरील रानात प्रलयनाथचे गुंड हॅंड ग्रेनेड्स, बंदुका वगैरे कुठेतरी पाठवत असतात. एका ट्रेनी गुंडाला हॅंड ग्रेनेड बद्दल मुलभूत शंका निर्माण होते. त्याच्या शंका निरसनार्थ त्याचा सिनीयर गुंड त्याचे थोड्क्यात बौद्धीक घेतो व प्रात्यक्षिक म्हणुन एक हॅंड ग्रेनेड पिन काढुन रानातल्या झाडांमधे फेकतो. पण काय आश्चर्य़! ग्रेनेड फुटतच नाही. पुरेशी उत्सुकता ताणल्यावर झाडांमागुन राजकुमार ग्रेनेड चेंडु सारखा झेलत झेलत बाहेर येतो. नंतर त्या गुंडाचा तोच ग्रेनेड फेकुन खातमा करतो.
तात्पर्य : ग्रेनेड हा दिवाळीतिल आपटबारची मोठी अवृत्ती आहे. तो वरचे वर झेलल्यास फुटत नाही, जमीनीवर आपटल्यासच फुटतो.
शेवटचा सिन : यात नेहेमी प्रमाणेच खलनायकाचे पारडे वर आहे. प्रलयनाथने राजकुमार नाना पाटेकर यांना पकडुन बांधलेले आहे. त्यांनी जास्त गडबड करु नये म्हणुन त्यांच्या कुटुंबियांना सुध्दा पकडुन बांधले आहे. राजकुमारला पाईप ओढण्याची सवय असते. राजकुमार काहीतरी(च) संवाद म्हणत पाईप कढतो व प्रलयनाथला डिवचतो. प्रलयनाथ चिडुन पाईप खेचतो व फेकुन देतो. त्याबरोबर फेकलेल्या पाईपचा स्फोट होतो व उडालेल्या धुराळ्यात काहीच दिसत नाही. धुराळा खाली बसल्यावर सर्व काही पुर्वी सारखेच असते. म्हणजे राजकुमार, नाना पाटेकर त्याच्या जागेवरच उभे, त्यांच्या वर रोखलेल्या बंदुका, बांधलेले कुटुंबीय सर्व तसेच असतात. प्रलयनाथ राजकुमारला डिवचतो. “बघ. आपल्या प्रिय देशाचा नाश मरण्यापुर्वी आपल्या डोळ्यांनी बघ.” आणी मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. पहिले मिसाईल फायर करतात. पण मिसाईल टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. वैतागुन प्रलयनाथ दुसरे मिसाईल फायर करण्याची ऑर्डर देतो. ते पण टेक ऑफ न घेता नुसते जागेवरच धुर सोडते. तिसर्‍या मिसाईलची पण तीच गत होते. हे पाहुन प्रलयनाथ साईंटिस्टला गोळी घालुन मारून टाकतो. तेंव्हा राजकुमार हे आपणच केल्याचे व कसे केल्याचे सांगतो.
“प्रलयनाथ, हम जानते थे कि तुम हमारा पाईप छुओगे और फेकोगे जरुर. ईसलिये हमने उसमे डायनामाईट फिट किया था. ज़ब धमाका हुवा तब हमने तुम्हारे तिनो मिसाईलके “फ्युज कंडक्टर” निकाल लिये. अब तुम्हारे मिसाईलोमे धुवे के अलावा कुछ नही”
काय तो कॉंनफिडन्स. आणी डायनामाईट आपटबार सारखा नुसता फेकल्याने स्फोट होतो? मिसाईल मधे काय नुसता “धुंवा” आणी फ्युज कंडक्टर असतो? तसे असेल तर मिसाईल बनवणे फरच सोपे. फक्त फ्युज कंडक्टर मॅनेज करायचा. प्रलयनाथने बहुतेक “घरच्या घरी तयार करा” किंवा “हे तुम्हीही करू शकता” अशा सदरा खाली मिसाईल तयार करण्याची कृती वाचून मिसाईल्स तयार केली असावीत. कृती साधारणपणे खाली दिल्याप्रमाणे असावी.
घरच्या घरी मिसाईल तयार करा” (तुम्हीही घरच्या घरी मिसाईल बनवु शकता). साहित्य : एक 8-10 फुट लांबीचे व 8-10 ईंच व्यासाचे (डायमिटरचे) पत्र्याचे नळकांडे, एक दिड फुट उंच व 8-10 ईंच व्यासाचा पत्र्याचा कोन (शंकू), फ्युज कंडक्टर, 8-10 ईंच व्यासाची पत्र्याची तबकडी, थोडी लाकडे व काडेपेटी.
(टीप: नळकांडे, शंकू व तबकडी यांचा व्यास सारखा हवा). कृती : प्रथम नळकांडे घेउन त्याचे एका तोंडाला शंकू जोडावा. ज़ोडतांना शंकूचे तोंड नळकांड्यांच्या बाहेर राहील याची काळजी घ्यावी. नंतर लाकडे पेटवुन त्याची शेक़ोटी करावी. लाकडे नीट पेटायच्या आधीच नळकांड्यांचे उघडे असलेले तोंड शेक़ोटीवर धरावे. शेक़ोटीचा धुंवा नळकांड्यांत भरू द्यावा. धुंवा पुरेसा भरला गेल्यावर तबकडी घेउन नळकांड्यांचे तोंड सील करावे. तबकडीवर फ्युज कंडक्टर बसवावा. तुमचे मिसाईल तयार! आहे कि नाही सोपे. तर मग चला आपण घरच्या घरी मिसाईल बनवुया.

सिनेमात अजुन ही बराच मसाला आहे. ज्याला कुणाला सिनेमा आठवत असेल अजुन भर घालावी.

आता एवढं सांगितल्यावर ते पोरग मोठं होउन निदान मिथून चक्रवर्तीतरी होईल असं आपल्याला वाटतं पण ते होतं अनिल कपूर, झकास! >>> Rofl

घरच्या घरी मिसाईल तयार करा” (तुम्हीही घरच्या घरी मिसाईल बनवु शकता). साहित्य : एक 8-10 फुट लांबीचे व 8-10 ईंच व्यासाचे (डायमिटरचे) पत्र्याचे नळकांडे, एक दिड फुट उंच व 8-10 ईंच व्यासाचा पत्र्याचा कोन (शंकू), फ्युज कंडक्टर, 8-10 ईंच व्यासाची पत्र्याची तबकडी, थोडी लाकडे व काडेपेटी.
(टीप: नळकांडे, शंकू व तबकडी यांचा व्यास सारखा हवा). कृती : प्रथम नळकांडे घेउन त्याचे एका तोंडाला शंकू जोडावा. ज़ोडतांना शंकूचे तोंड नळकांड्यांच्या बाहेर राहील याची काळजी घ्यावी. नंतर लाकडे पेटवुन त्याची शेक़ोटी करावी. लाकडे नीट पेटायच्या आधीच नळकांड्यांचे उघडे असलेले तोंड शेक़ोटीवर धरावे. शेक़ोटीचा धुंवा नळकांड्यांत भरू द्यावा. धुंवा पुरेसा भरला गेल्यावर तबकडी घेउन नळकांड्यांचे तोंड सील करावे. तबकडीवर फ्युज कंडक्टर बसवावा. तुमचे मिसाईल तयार! आहे कि नाही सोपे. तर मग चला आपण घरच्या घरी मिसाईल बनवुया.
>>>

पडलेय मी इथे खुर्चीतून खाली Rofl

बाप्रे ! अशक्य........ Lol

राजकुमार आणि अचाट अतर्क्य हे समानार्थी शब्द आहेत्.. दिल अपना प्रीत परायी या चित्रपटातला हा प्रसंग ..जानी आणि मीनाकुमारी मोटारीतून कुठेतरी जात असतात्..वाटेत तमधेच स्वप्न दृश्य आणि त्यात 'मेरा दिल अब तेरा ओ साजना' हे गाणं सुरू होतं. दोघे ट्रॅडीशनल डे चे कपडे घालून नाचायला लागतात . गाणे संपते तेव्हा राजकुमार मीनाकुमारीचा हात पिरगाळतोय असे वाटते.

आगाऊ Rofl तो हिफाजत पाहिलाय मी पण. एकसे एक अचाट दृश्य आहेत त्यात. त्यातच एक 'बटाटावडा' अस गाण आहे. Biggrin
मुकुंद Lol

हिफाजतमधे भविष्यकथनाचा हा अल्टिमेट सीन संपताच कादरखानने पाठवलेले तीन डाकू येतात आणि त्या पोराचे अपहरण करतात. प्राण त्यांच्या मागे धावतो, ते पोरगं एका टोपलीत पडते,टोपली नदीत पडते आणि वाहत जाउन दुसर्‍याच गावाला पोचते. तिथे नदीच्या काठावर एक म्हातारा ते बाळ घेऊन, रामाच्या देवळात भजन करीत बसलेल्या जमिनदाराकडे देतो आणि मरतो. इकडे त्या पोराची आई म्हणजे नूतन (का हे लोक असली कामे करायचे?) तोच रक्ताचे छप्पे असलेला टेबलक्लॉथ घेऊन रडते. एवढे सगळे चालले असताना बॅकग्राऊंडला शब्बीर किंवा मुन्ना अझिझ यापैकी कोणीतरी गळा पिळवटून 'राम की बातें राम ही जाने' गात असतो. पोलिस,प्रेसवाले या जगात नसतात त्यामुळे डायरेक्ट २० साल बाद............
ते पोरगं अनिल कपूर होतं, ती अशोककुमारची मुलगी माधुरी दिक्षित होते, ते जंगलात भेटतात, हिरो हिरविणीला गुंडापासून वाचवतो आणि 'बटाटावडा महाराष्ट्राकी बडी फेमस डीश है, इसमें आलू और बेसन का संगम होता है' असे सांगून तिचे सामान्यज्ञान वाढवतो. मग ते 'चुकून' भांग मिसळलेले बटाटेवडे खातात (चुकीच्या गोष्टी खाल्याने चुकीच्या गोष्टी होणे ही थीम अ‍ॅडम-ईव्हपासून चालत आली आहे ) - कट टू ड्रीम साँग- 'बटाटावडा' Proud

(चुकीच्या गोष्टी खाल्याने चुकीच्या गोष्टी होणे ही थीम अ‍ॅडम-ईव्हपासून चालत आली आहे )

अ‍ॅडम आणि इव्हबद्दल माझ्याकडे एक अश्लील जोक आहे. इछुकानी माझ्या विपूत सम्पर्क साधावा. जोक मेल्वर पाठविला जाईल. Proud

झकास राव चित्रपटाचे नाव बलवान आहे. सुनिल शेट्टिचा पहिलाच चित्रपट.

हा महान चित्रपट मी वॉल्वोमधल्या पहिल्या सीटवर बसून पाहिलेला आहे . या सीटचे वशिष्ट्य असे की चित्रपटापासून तुम्ही मुळीच पळून जाऊ शकत नाही. डोळे बन्द केले तरी आवाज एवढा मोठा येतो बन्द डोळ्यांपुढे ती दृष्ये आपोआप तरळू लागतात.

यात सुनील भाऊ विनिस्पेक्टर झाले तरी त्यांच्या झिन्ज्या त्यांच्या पोलीसाच्या 'पी' कॅपमधून बाहेर आलेल्या असतात.

टोणग्या, कुत्रा माणसाला चावला तर त्याची बातमी बनत नाही. अ‍ॅडम आणि इव्ह चा व्हेज जोक आहे का तुझ्याकडे तर सांग बघू........

Pages