मी खर सांगु, मला ना उंच आकाशात उडायचय
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचय
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाउन पोचायचय
तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
आजकाल कधी नव्हे तो मी धावताना दमायला लागलोय
धावता धावता मधेच मागे वळुन बघायला लागलोय
मी पुढे जाण्यापेक्षा बाकीचे मागेच आहेत ना
याची खात्री करायला लागलोय
कुठुन आलो ते पहायला आता वेळ नसतो
कुठे चाललो त्याचे आताशा भान नसतं मला
अक्शरश: काळ मागे लागल्यासारखा पळत असतो मी
डोळ्यावर झापडं चढल्येत गं माझ्या
पाठीवर आसूड कुणाचा उडतोय
ही गोष्टसुद्धा आता गौण आहे,
इतका मी आता ह्या स्पर्धेचा गुलाम झालोय
खरं म्हणजे, हे सारं जाणवलच नसतं कधी मला,
म्हणजे धावताना एवढा विचार करायला वेळच नसतो मला
पण धावतानाच एकदा तो भेटला मला
आणि बदलूनच गेलं ग सगळं
म्हणजे काय झालं,
तर बाकीचे मागेच आहेत ह्याची खात्री करुन
मी जरा श्वास घेत उभा होतो
तर अशा गाफिल क्षणी तो मला दिसला
मी उभा आहे हे पाहुन तोही थांबला
माझ्याकडे पाहुन हसला आणि म्हणाला, दमलास?
मी म्हणालो, आजकाल लागतो कधीकधी थोडा दम
बरीच वर्ष धावतोय ना आता, असे व्हायचच
तो म्हणाला, मग आता बास कर, सोडुन दे आता धावणं
तुझ्यामाझ्या धावण्याने अथवा थांबण्याने फार काही बदलत नाही
सगळं तसच चालु राहील,
कुणाला कळणार देखील नाही आपण थांबल्याचे
अरे सतत गतीमान रहाण्याचे काम फक्त निसर्गाचं
प्रुथ्वीने सतत धावलच पाहीजे, स्वतःभोवतीही आणि सुर्याभोवतीही
तीनं धावण थांबवल तर मात्र खरच हाहा:कार उडेल
मग आपल्याला सगळ्यांनाच अचानक थांबाव लागेल
कारण बोलुन चालुन आपण सगळे मोजक्या श्वासांचेच धनी
म्हणुनच वेळेवर थांबुन
आपण धावण्याच्या पलिकड्चा विचार करायला पाहिजे
इतके श्वास आपल्या वाट्याला आले,
म्हणुन निसर्गाचे ॠणी रहायला पाहीजे
आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे
वाट्याला आलेला प्रत्येक क्षण पूर्ण जगला पाहीजे
कालची खंत आणि उद्याची काळजी न करता
आजचा दिवस पुर्णपणे उपभोगला पाहीजे
तेंव्हापासुन तुला सांगतो, धावणं मी कमी केलय
पण अजुनही होतो मोह कधीकधी, स्प्रर्धेचा
आणि मग मह्त्प्रयासानं तो मोह आवरत, स्वतःवरच चिडत
मी विचार करतो मग उंच आकाशात उडायचा
पार अगदी क्षितिजापलिकडे जाउन पोचायचा
जिथे कुणीच नसेल माझ्याशी स्पर्धा करायला
अशा अनोख्या जागी जाण्याचा
तुला माहीत्येय, तसं मला
तुला माहीत्येय, तसं मला स्पर्धेचं भय नाही
नाही...खरच नाही...
आजही नाही आणि आधिही नव्हतं कधी
पण काय सांगु तुला,
छान लिहिलेस .आवडले.पु.ले.शु.
धन्यवाद प्रकाश. असाच लोभ राहू
धन्यवाद प्रकाश.
असाच लोभ राहू द्या, ही विनंती.
.
.
मला वाटल मीच धावतो आहे.आवडली.
मला वाटल मीच धावतो आहे.आवडली.