Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16
एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...
"कविता" म्हणजे काय ?
त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .
इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...
गुलमोहर:
शेअर करा
<<<पण कोणतेही गद्य, ऑळींची
<<<पण कोणतेही गद्य, ऑळींची फेरफार करुन लिहीले तर मुकतछंदातील कविता म्हणून छापता येते.>>>
हा विपर्यास झाला.
# a composition written in metrical feet forming rhythmical lines
wordnetweb.princeton.edu/perl/webwn
# Poetry (from the Greek "ποίησις", , a "making") is a form of literary art in which language is used for its aesthetic and evocative qualities in addition to, or in lieu of, its apparent meaning. ..
अशा दोन्ही व्याख्या आहेत.
वृत्त , छंद हे काही झाले तरी तंत्राचा भाग आहे, तो कवितेचा आत्मा नाही.
<<< सौंदर्यशास्त्र - मांडणी किती मोहक व तालबद्ध आहे व त्यातून मानवी इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी सुंदर वाटतात तशीच पद्यरचना वाटत आहे का हे!
४. तत्वज्ञान - मानवी संस्कृतीच्या मूलभूत तत्वज्ञानाप्रमाणे कविता आहे की नाही. >>>
हे खूप पुस्तकी झाले. कवितेचा विषय काय यावरच तिचा फॉर्म ठरेल. मग ती मोहक न वाटता अंगावर काटा आणणारीही असू शकते. विद्रोही कविता मोहक तालबद्ध असेल तर ती प्रामाणिक ठरेल का? जर कलाविष्कार हा स्वतःला व्यक्त करण्यासाठी होत असेल, तर त्यात तत्वज्ञान , संस्कृती कशाला बसायला हवी?
वर वाचले की गझल ही सुचलेली असते. गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता, बहुधा वेगवेगळ्या विषयाचा, पण एकाच वृत्तात, एकसारखी यमके घेऊन आलेला. वेगवेगळ्या विषयावरच्या रचना एकसारखा आकृतीबंध घेऊन स्वतःच येतात, हा नक्कीच चमत्कार म्हणायला हवा.
a composition written in
a composition written in metrical feet forming rhythmical lines..
र्हायमिंग लाइन्स आल्या तर ती कविता होईलच की...... यात नाकारण्यासारखे काय आहे?
कोणतेही गद्य मुक्तछंद म्हणून लिहीता येतो हे मी इथेच सिद्ध करतो भरत जी.
वर वाचले की गझल ही सुचलेली असते. गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता, बहुधा वेगवेगळ्या विषयाचा, पण एकाच वृत्तात, एकसारखी यमके घेऊन आलेला. वेगवेगळ्या विषयावरच्या रचना एकसारखा आकृतीबंध घेऊन स्वतःच येतात, हा नक्कीच चमत्कार म्हणायला हवा.
आपल्या ह्या वरील परिच्छेदास मी मुक्तछंदातील कवितेचे रुप देतो.
वर वाचले,की सुचलेली असते.....गझल.,
प्रत्येक शेर असतो,स्वतंत्र कविता........
वेगवेगळ्या विषयाची.... बहुधा.
एकाच वृत्तात,
एकसारखी यमके घेउन आलेला.......
वेगळ्या विषयांचा, '' टणत्कार''
आकृतीबंधात येतो, एकसारख्या
हा नक्कीच आहे, खराखुरा,
''चमत्कार'' .
मागे (बहुतेक पान क्र.१) तू
मागे (बहुतेक पान क्र.१) तू आचार्यांच्या श्लोकांमधल्या यमकाबाबत लिहिले आहेस.
की त्या श्लोकात यमक नाही.
पण संस्कृतात मुळातच यमक ही पद्धत नाहीच.
प्रास असतो संस्कृतात. आणि अंत्य-यमक-सदृश (सदृश हे महत्वाचे) काही शब्द येतात
>>>> हेच मलाही म्हणायचे होते ! की यमक असलेच पाहिजे असे काही सक्ती नाही संस्कृतात ...मग मराठीत का ???
( इथे यमक नसलेली पण वृत्त छंद बध्द मराठी कविता उदाहरण म्हणुन सुचत नाहीये ...)
मित्रा , चर्चा कविता म्हणजे काय यावर चालु आहे ...मुक्तछंदाला कविता मानावे का ही उपचरचा आता जवळ पास संपली आहे .. कवितेवर आपले मत मांडावे .
आपण कविता बाह्य रूपावरूनच
आपण कविता बाह्य रूपावरूनच ओळखता व ठरवता.
------
इथे दिलेल्या दोन्ही व्याख्या कवितेच्याच आहेत, त्या कवितेच्या वेगळया अंगांचा वेध घेतात.
a composition written in metrical feet forming rhythmical lines
wordnetweb.princeton.edu/perl/webwn
# Poetry (from the Greek "ποίησις", , a "making") is a form of literary art in which language is used for its aesthetic and evocative qualities in addition to, or in lieu of, its apparent meaning.
ही एक छंदबद्ध शब्दरचना. मात्रा, यमके यांचे नियम पाळलेली. याला कविता म्हणणार का?
नेहमीचाच जिचा वाडगा असे रिकामा आणि मुखी ’द्या’
शेजीबाई उभी दारात, जरा विरजणा म्हणे दही द्या
मी म्हटले तिज,’ दूध नासले सारे माझे, तुम्हीच मज द्या!’
पाय आपटित गेली की ती पुढल्या दारी, घेउनि तो ’द्या’
दार लावता, गुणगुणले मी, सांगायाचे जे तिज नाही
(दो दिवस तरी) 'आता काही देणे घेणे(?) उरले नाही’
वर वाचले की गझल ही सुचलेली
वर वाचले की गझल ही सुचलेली असते. गझलेचा प्रत्येक शेर हा स्वतंत्र कविता, बहुधा वेगवेगळ्या विषयाचा, पण एकाच वृत्तात, एकसारखी यमके घेऊन आलेला. वेगवेगळ्या विषयावरच्या रचना एकसारखा आकृतीबंध घेऊन स्वतःच येतात, हा नक्कीच चमत्कार म्हणायला हवा>>>
प्रतिसादांना अजूनही उपरोधिक गंध येत असावा हे दुर्दैवी वाटते. गझल हे नक्कीच संस्कारीत काव्य आहे. पण एखादा मिसरा, एखादा शेर सुचू शकतो याचा अनेक गझलकारांनी अनुभव घेतलेला आहे. तेव्हा अगदीच कृत्रिम नाही.
composition written in metrical feet forming rhythmical lines
wordnetweb.princeton.edu/perl/webwn
# Poetry (from the Greek "ποίησις", , a "making") is a form of literary art in which language is used for its aesthetic and evocative qualities in addition to, or in lieu of, its apparent meaning.>>>>
या व्याख्या कुणी आणि कोणत्या संदर्भात केलेल्या आहेत? या व्याख्या करणार्यांनी कविता किती रचल्या आहेत? निदान या व्याख्येप्रमाणे! हेही समजले तर अधिक चर्चा करता येईल असे वाटते. समीक्षा, मतप्रदर्शन, रसग्रहण व प्रत्यक्ष कविता रचणे या भिन्न बाबी आहेत असे नक्कीच सगळ्यांना मान्य व्हावे.
नेहमीचाच जिचा वाडगा असे रिकामा आणि मुखी ’द्या’
शेजीबाई उभी दारात, जरा विरजणा म्हणे दही द्या
मी म्हटले तिज,’ दूध नासले सारे माझे, तुम्हीच मज द्या!’
पाय आपटित गेली की ती पुढल्या दारी, घेउनि तो ’द्या’
दार लावता, गुणगुणले मी, सांगायाचे जे तिज नाही
(दो दिवस तरी) 'आता काही देणे घेणे(?) उरले नाही
>>>>
१. या कवितेत वृत्ताचे सर्व नियम न पाळता काही सुटी आहेत.
२. हे बंडल काव्य आहे. हे मत सापेक्ष आहेच, पण यावर पॉल घेता येईलही!
-'बेफिकीर'
हे काव्य नाही असेच माझे
हे काव्य नाही असेच माझे म्हणणे आहे.
एखादाअ मिसरा , शेर सुचू शकतो आणंइ त्यावरच गझलेचे बांधकाम होते हे मान्य. पण बाकीचे सगळे शेर सुचलेलेच असतात का?
एक मिनिट! पुन्हा काहीसा गोंधळ
एक मिनिट! पुन्हा काहीसा गोंधळ वाटला मला!
भरतराव! प्रत्येक छंदोबद्ध रचना ही कविताच असते असा दावा कुणीही केलेला नाही.
मात्र मुक्तछंदात अपद्य नसल्याने 'कविता' या साहित्यप्रकाराची 'किमान अट'ही पाळली जात नाही म्हणून ती कविता नाही असा दावा मी व कैलासराव करत आहोत व विजयराव त्याच्याशी सहमत आहेत.
(कैलासराव व विजयराव - काही चुकत असल्यास दुरुस्त करावेत कृपया! )
-'बेफिकीर'!
बाकीचे शेर सुचलेलेच असतात का?
बाकीचे शेर सुचलेलेच असतात का? >>>
आता कृपया वाचावेत!
गझल ही तंत्राने बांधलेली रचना असल्यामुळे बहुतांशी कवी आधी तंत्र शिकण्यात बराच वेळ घालवतात. आत्ता मायबोलीवर असे अनेक कवी आहेत. तंत्र शिकताना त्यातील काही कंटाळतातही व सोडुनही देतात! काही पुढे जातात! मग काही जण जरा नावीन्यपूर्ण आशय मांडतात! मग त्यात सफाई नसते. मग हळूहळू सफाई यायला लागते. या प्रत्येक स्टेपमध्ये इतरांकडून जोरदार टीका व समीक्षा होत राहते. त्यामुळे काहीजण नाउमेद होतात. काही पुढे जातात. सफाईदार शेर जुनाट आशयाचे होतात. मग आशयात, शब्दरचनेत, प्रतिमा - रुपकातील नावीन्य वगैरे हळूहळू येते!
या सगळ्यानंतर गझलकार विटलेला असतो, बहुतेक वेळा! मात्र तो मनातल्या मनात काही ना काही गुणगुणतच असतो. मग एखादी गॅप येते. मग त्या गॅपमध्ये अनेक अनुभव येतात! मग त्यावर सुचलेला एखादा मिसरा बर्याच अधी सुचलेल्या एखाद्या मिसर्याच्या जमीनीत वगैरे असल्याचे भास होतात. मग हळूहळू एखादी गझल होते.
१०० % तंत्राकडून सफाईदार, गझलतंत्रातील मात्र सच्चा आशय असलेले शेर गुंफण्याकडे जाण्याचा हा प्रवास प्रत्येकाच्या बाबतीत विविध कालावधीचा असतो. अनेक जण मध्येच सोडतात! अनेक पोचतात!
मात्र, मुक्तछंदात केवळ 'काहीही शिस्त नाही' या एकाच गोष्टीचा फायदा घेऊन 'अगदी हवे तेच' लिहिण्याची परवानगी मिळते अणि तिकडे बहुतांशी लोक वळतात. मात्र त्यात गुणगुणण्याललास्कोप राहू शकत नाही. इथेच 'कविता' या शब्दापासून फारकत घेतली जाते. कविता गेय / गुणगुणण्याजोगी असायला हवी असे मत माझे आहे. काहींचे व आपले नाही. या गोष्टीचा आदर आहेच अर्थातच!
धन्यवाद!
(अर्थ - गझलमधील पाचही शेर सच्चे असू शकतात, मात्र तंत्रासाठी ते काही प्रमाणात संस्कारीतही असू शकतात.)
आत्ता या क्षणी माझ्या मनात एक मतला घोळत आहे. त्यातील दुसरा मिसरा गेले आठवडाभर सुचून डोके फिरवत होता. बरेच पर्याय तपासल्यावर एक पहिला मिसरा नक्की करावा की काय यावर आत्ता विचार चाललेला आहे.
थोडे जगून झाले, थोडे अजून आहे
मीही जगाप्रमाणे, आहे म्हणूण आहे
यातील दुसरी ओळ आहे तशीच सुचली. मात्र पहिली ओळ सुचेना! मग माझ्या आयुष्याशी प्रामाणिक अशी काय ओळ असेल याचा विचार आपोआप सुरू झाला. यात 'आपली गझल व्हायलाच पाहिजे' असे काहीही ध्येय नव्हते. नाहीतर ती आत्तापर्यंत प्रकाशितही झालेली असती. ती मी कदाचित प्रकाशित करणारही नाही. पण सध्या सुचलेल्या पहिल्या मिसर्याचा प्रभावी समारोप दुसर्या मिसर्यात होत नाही आहे असे वाटल्यामुळे थांबलेलो आहे.
-'बेफिकीर'!
बरं मग कविता या
बरं मग कविता या साहित्यप्रकाराचे व्यवच्छेदक लक्षण काय, की जे काव्याला इतर साहित्यापेक्षा वेगळे ठरवते?
वरच्या दोन्ही व्याख्या तुम्हाला मान्य नाहीत असे दिसते.
----------
जसे प्रत्येक छंदबद्ध लेखन हे काव्य असू शकत नाही, ते त्यातल्या आशयावर, अभिव्यक्तीवर ठरेल; तसेच छंदबद्ध नसलेली रचनाही त्यातल्या आशय आणि अभिव्यक्तीवर काव्य मानल्या जातात, हेच मला सांगायचे आहे.
वर कैलास यांनी कोणतेही गद्य लेखन मुक्तछंदाच्या रूपात देता येते असे म्हटले, त्यासाठीच मला या छंदबद्ध न-कवितेचा दाखला द्यावा लागला.
लिखाणाच्या बाह्य रूपावरून कविता ठरते की त्याच्या गाभ्यावरून?
दोन्हीवरून ठरायला नको का
दोन्हीवरून ठरायला नको का भरतराव?
कवितेत पद्य (तांत्रिकदृष्ट्या लयबद्धता) व काव्य ( आईचे मुलावर आईप्रमाणे प्रेम असणे हा निसर्ग आहे तर बापाचे आई नसलेल्या आपल्या मुलावर आईप्रमाणे प्रेम असणे हे काव्य असे मी मानतो) हे दोन्ही असायला नको का
आपल्याला काय वाटते??
धन्यवाद!
"मात्र, मुक्तछंदात केवळ
"मात्र, मुक्तछंदात केवळ 'काहीही शिस्त नाही' या एकाच गोष्टीचा फायदा घेऊन 'अगदी हवे तेच' लिहिण्याची परवानगी मिळते अणि तिकडे बहुतांशी लोक वळतात"
हे विधान पूर्वग्रहदूषित भासते. 'अगदी हवे तेच' नाही 'जे लिहावेसे वाटते' ते. परवानगी कोण कुणाला देणार? ज्याला लिहायचे तो लिहील ज्याला वाचायचे तो वाचील.
गझल लिहिणारा एक मिसरा सुचला की त्यातल्या यमकाशी जुळणार्या शब्दांची यादी करून त्यानुसार शेर सुचतात का हे पहात नाही, असे म्हणायचे आहे का?
असे करणे कमीपणाचे आहे, असे मी अजिबात म्हणत नाही. जसे चालीवरून गीत सुचते आणि लिहिले जाते तसे यमकावरून शेर जुळायला काहीच हरकत नाही.
जे लिहावेसे वाटते ते>>> हा
जे लिहावेसे वाटते ते>>>
हा मुद्दा आवडला. खरे आहे आपले म्हणणे!
पण वरती कैलासरावांनी म्हंटल्याप्रमाणे मुक्तछंद हा 'गद्याची काही प्रकारे तोडफोड करूनही' निर्माण झाल्याचे भास होतात व तशाही कवित येथे सुखेनैव नांदतात! (त्यबद्दल आकस नाहीच, ही चर्चा चालली आहे म्हणून म्हणालो).
हे योग्य वाटते का आपल्याला?
भरतराव, मला आपण वर दिलेल्या
भरतराव,
मला आपण वर दिलेल्या दोन्ही व्याख्या मान्य नाहीत असे का समजता? तो माझा अधिकारही नाही. खरे तर दुसरी व्याख्या जवळपास मान्य आहे. पहिली मात्र फक्त तांत्रिक आहे असे वाटते.
लिखाणाच्या बाह्य रूपावरून
लिखाणाच्या बाह्य रूपावरून कविता ठरते की त्याच्या गाभ्यावरून?
बाह्यस्वरूपावरून ती "कविता" आहे की नाही हे ठरवायला हवे. गाभ्यावरून ती चांगली की वाईट, आशयघन की सुमार ते ठरेल..... अर्थात हे पुन्हा व्यक्तीसापेक्षच असेल.....!
सहमत आहे श्री भुंगा!
सहमत आहे श्री भुंगा!
र्हायमिंग लाइन्स आल्या तर ती
र्हायमिंग लाइन्स आल्या तर ती कविता होईलच की...... यात नाकारण्यासारखे काय आहे?
हे डॉ कैलास यांचे विधान. आपण त्यांच्याशी तपासून पहावे.
'तांत्रिकदृष्ट्या लयबद्धता' : यात मुक्ततेचा, नैसर्गिकतेचा, उस्फूर्ततेचा अभाव आहे.
लय सहज आलेली असायला हवी, असे मला वाटते. ती कोंबता किंवा वरून थोपवता येत नाही.
माझा लयबद्धतेला आक्षेप आहे असा अर्थ कृपया काढू नये.
कविता हा लेखनातला सर्वात उत्स्फूर्त प्रकार मानला तर त्यातल्या आशयावर तंत्र आरूढ होता नये. तंत्रावर कवीला हुकुमत हवी (जी कदाचित अभ्यासाने येत असेल, कदाचित निसर्गतःच असेल), तंत्राशी झटापट करावी लागू नये.
मुक्तछंद याचमुळे उत्स्फूर्ततेच्या जवळ जातो. जे मुक्तछंदात लिहितात, त्यांना वृत्तात लिहिता येत नाही, यासाठी नाही, तर त्यांना त्यावेळी जे सांगायचे ते मुक्तछंदात अधिक प्रभावी उतरते, किंबहुना स्वाभाविकपणे तसेच सुचते म्हणून. शांताबाई शेळके, पाडगावकर, खेबूडकर या गीतकारांना मुक्तछंदात लिहावेसे वाटले ते याचसाठी.
अजूनही कवितेचे आपल्या मते व्यवच्छेदक लक्षण काय, याच्या प्रतीक्षेत.
व्यवच्छेदक लक्षण या
व्यवच्छेदक लक्षण या शब्दसमुहाचा अर्थ 'किमान बाबी, ज्यामुळे ती विशिष्ट गोष्ट ठरते' असा आहे का? तसे असल्यास माझ्यामते:
आपोआप लयीत सुचलेल्या विचारांना सुयोग्य शब्दांमध्ये मांडून रचलेले गीत / गीतपंक्ती, ज्यांचा आशय वाचकाची, श्रोत्याची किंवा कोणत्याही रसिकाची (समभाषिक व सज्ञान) मनस्थिती कवीच्या 'त्या ओळी रचण्यामागच्या' मनस्थितीप्रमाणे बनवू शकण्याइतके सामर्थ्य बाळगतो.
धन्यवाद!
<<कविता हा लेखनातला सर्वात
<<कविता हा लेखनातला सर्वात उत्स्फूर्त प्रकार मानला तर त्यातल्या आशयावर तंत्र आरूढ होता नये. तंत्रावर कवीला हुकुमत हवी (जी कदाचित अभ्यासाने येत असेल, कदाचित निसर्गतःच असेल), तंत्राशी झटापट करावी लागू नये. >>
भरतजींच्या या मताशी सहमत.
तंत्रावर उपजत असलेली आणि सरावाने येणारी हुकुमत यावर बेफिकिरजींनी एका पोस्टीत ती प्रक्रिया कशी होते ते मांडलेच आहे.
मुक्तछंद हा काव्यप्रकार किंवा एक फॉर्मॅट म्हणून मान्य असायला काही हरकत नसावी खरंतर....!
पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत चर्चा मुक्तछंदावरच घुटमळत राहील.
पण उत्स्फुर्तपणे लयीत सूचू
पण उत्स्फुर्तपणे लयीत सूचू शकत नाही असे तर आपण मानत नाही आहात ना?
भटांनी एका मुलाखतीत कुठेतरी म्हंटलेले होते. गझलेच्या ओळीही त्यांना गुणगुणता गुणगुणताच सुचायच्या!
आत्ताच मायबोलीवर पहिल्या पानावर असलेली 'अजून' ही कविता बघावीत! ती सुंदर शब्दांनी नटलेली आहे. काही र्हस्व दीर्घ सोडले तर वृत्तात आहे. मात्र तिचा आशय श्री भुंगा यांनी म्हंटल्याप्रमाणे एखाद्याला आवडेल, एखाद्याला नाही.
भरतजी, उगीच वेळ वाया
भरतजी, उगीच वेळ वाया घालवताय.
काही एक साध्य होणार नाहीये ह्या चर्चेने!
काही मतं वाचुन तर विशेशकरून गद्याचं मुक्तछंदात रुपांतर करतो म्हणे.
एकेकडे मुक्तछंद हे गद्यच आहे असे म्हणायचे व दुसरीकडे रुपांतर करून दाखवतो?
म्हणजे गद्य व मुक्तछंदात फरक आहे हे मान्य केल्यासारखे नाही का?
(माझी ही पोस्ट आगीत तेल ओतल्यासारखी वाटेलही, हरकत नाही )
आपण सध्यातरी इथे कवितेच्या
आपण सध्यातरी इथे कवितेच्या बाह्यरुपावरच चर्चा करायला हवी कारण आशय / गाभा याविषयी बोलायला गेलो तर पुन्हा मतमतांतरे ही असणारच....!!! आधी "कविता म्हणजे काय" यावर बोलल्यावर मग "आशयघन कविता कशाला म्हणायचे" यावर बोलता येईल......!!!!
अनुजा रानडे, १. सहभागाबद्दल
अनुजा रानडे,
१. सहभागाबद्दल धन्यवाद!
२. येथे शक्य आहे तोपर्यंत खिल्ली उडवणारे प्रतिसाद द्यायचे नाहीत असे सर्वंनीच ठरवले आहे. भरतरावही अत्यंत महत्वाचे प्रतिसाद देत आहेत व त्यांच्या मतांचा सगळे आदरच करत आहेत. आपण शक्य असल्यास ते मेन्टेन करावेत.
३. स्वातंत्र्य आपलेच आहे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
अरे बापरे! मी तर ऐकत आलोय की
अरे बापरे! मी तर ऐकत आलोय की कवी लोक गीतकारांना तुच्छ मानतात. गीत हे कवितेचे प्युरेस्ट रूप नाही, कारण त्यात कलेपेक्षा कारागिरी जास्त असते.
हे प्रत्येक वेळी खरे असतेच असे नाही.
असो. हे शेवटचे पुन्हा सांगतोय. कविता मी तरी तिच्या आशयावरूनच ओळखीन, ठरवेन.
कविता या लेबलखाली समोर आलेले लेखन वाचताना, प्रथम मी त्यातील आशय, भाव,इ. चा आस्वाद घ्यायचा प्रयत्न करतो. ती वृत्तात बसतेय का? मात्रा सारख्या आहेत का? र्हस्व दीर्घाची सूट घेतलीय का? या गोष्टी नंतर पाहीन. तांत्रिक दृष्ट्या परिपूर्ण रचना वाचायला मिळायचा आनंद हवाच, पण या हृदयीचे त्या हृदयी घालणे हे काम कवितेने केले तरी ते वाचनानंदासाठी मला पुरेसे ठरते.
मुक्तछंदाच्या नावाखाली न-कविता जशी खपवली जाते, तितक्याचे बेमालूमपणे ती छंदबद्धतेच्या नावाखालीही खपविता येते (उदाहरणे या चर्चेतच आली आहेत).
याउपर सांगण्यासारखे सध्या तरी काही नाही. प्रत्येकाचा वाचक,आस्वादक, लेखक म्हणून दृष्टिकोन वेगळा असू शकतो. इतर दृष्टिकोनांचा आदर ठेवावा एवढेच सांगणे.
सहमत आहे. आपल्या दृष्टिकोनाचा
सहमत आहे. आपल्या दृष्टिकोनाचा आत्तापर्यंतही आदर होताच व आत्ताही आहेच.
धन्यवाद!
मात्र, चर्चेत असावेत ! यापुढेही ही चर्चा चालूच राहील असे वाटत आहे.
कवी लोक गीतकारांना तुच्छ
कवी लोक गीतकारांना तुच्छ मानतात. गीत हे कवितेचे प्युरेस्ट रूप नाही, कारण त्यात कलेपेक्षा कारागिरी जास्त असते.>>>
१. कोणते कवी तुच्छ मानत आले आहेत याबाबत माहिती असल्यास द्यावीत. गदिमांना तसे समजले जायचे असे वाचलेले आहे. त्याबाबत मला काहीच म्हणणे शक्य नाही.
२. कारागिरी कितीही असली तरी आशयाचा प्रामाणिकपणा आणता येतो असे मला वाटते.
आशयाचा प्रामाणिकपणा आणता येतो
आशयाचा प्रामाणिकपणा आणता येतो
प्रामाणिकपणा आणता येत नाही, असावा लागतो. तो जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतात.
तुच्छतेबद्दल :कोणते कवी ही नेमकी नावे मी वाचलेली/ऐकलेली नाहीत. पण हिंदी चित्रपटासाठी गीतलेखन करणारे व मराठीतील गीतलेखक याच अनुभवातून गेले आहेत.
शांताबाईंची अनेक गीते त्यांच्या कवितांइतकीच श्रेष्ठ आहेत. गीत लिहिताना बाह्य प्रेरणेवरून हुकुमी आणि तरीही दर्जेदार लिहिता येणे ही तारेवरची कसरत त्यांनी 'काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे' या नाट्यगीतात अगदी सुंदरपणे साध्य केली आहे.
क्रुपया हा धागा कढुन टाकण्यात
क्रुपया हा धागा कढुन टाकण्यात यावा...नाह्क कविंच्या भावना दू़खावल्या जातील.....कूठल्याही कविला ना वयाची अट असते ना वीचारांचि बंधने.......... ही बाब लक्षात असावी
कवी हा एखादा धर्म किंवा जात
कवी हा एखादा धर्म किंवा जात नाही जेथे भावना दुखावण्याचा प्रश्न यावा! ज्यांना भावना दुखावल्यासारखे वाटेल ते स्वतःची बाजू येथे येऊन मांडू शकतील. आपण का चिंता करत आहात? या धाग्यात बर्यापैकी चर्चा झालेली आहे.
चातका, जे कवी "नाहक" आहेत
चातका, जे कवी "नाहक" आहेत अथवा जे "नाहक कवी" आहेत त्यांचेच जे काही दुखावायचे ते दुखावेल. काळजी नसावी....
अजूनतरी इथे चर्चाच चालू आहे कुठलेही वाकडे वळण न घेता, मतभेद असले तरी संयम आणि समोरच्यांच्या मताचा आदर राखूनच, ईच्छा असल्यास चर्चेत सहभागी व्हा नाहीतर रोमात राहून वाचावेसे वाटल्यास वाचा, सक्ती नाहीच.
बरीच चर्चा झालेय. जाणकारांनी
बरीच चर्चा झालेय. जाणकारांनी आपली मतं मांडली आहेत. वास्तविक माझ्यासारख्या नवख्याची काही बोलण्याची पात्रता नाही. तरी देखील..... थोडे अकलेचे तारे तोडतो.
(केवळ एक काव्यरसिक म्हणून.)
कविता हा विषयच इतका गहन आहे की तो कदाचित व्याख्यातीत असावा असं वाटतं. बर्याचदा वरील चर्चा कविता छंद-मुक्तछंद या दिशेने जास्त सरकल्यासारखी वाटतेय. (थोडंफार स्वाभाविकच आहे ते) खरं तर आपण सर्वजणच कवितेचे भोक्ते किंवा भक्तच आहोत म्हणा ना. भक्त आपापला देव वेगवेगळ्या मूर्तीत पाहतात, अनुभवतात. घडीव मूर्तीत त्याचमाणे दगडाला फासलेल्या शेंदूरातही देवत्व अनुभवलं जातं. छंद/मुक्तछंद या कुठल्याही Format मधून सुयोग्य रीतीने अभिव्यक्त झालेल्या भावाची, आशयाची अनुभूती (सर्वसाधारण) रसिकाला लाभली तर काय हरकत आहे ?
मर्यादित शब्दांत गहरा आशय ज्यातून व्यक्त होतो आणि त्या आशयाची अनुभूती रसिकाला होते अशा
रचनेला कविता म्हणायला हवं असं मला वाटतं.
Pages