Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16
एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...
"कविता" म्हणजे काय ?
त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .
इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...
गुलमोहर:
शेअर करा
अगदी बरोबर! मी मुक्तछंदाला
अगदी बरोबर! मी मुक्तछंदाला कविता मानत नाही हे काही प्रमाण मानता येणार नाही. म्हणूनच मी काही शंका विचारल्या. पुन्हा विचारतो.
१. मुक्तछंदाला काव्यशास्त्राने मान्यता दिल्याचा दाखला द्यावात.
२. लयबद्ध मुक्तछंदातील शब्दरचना - किमान दोन उदाहरणे द्यावीत.
आपण मुक्तछंदला कविता मानता या मताचा पूर्ण आदर आहे. मी भरतरावांना जे म्हणालो त्याचा सारांश असा होता की गाजलेल्या लोकांनी मुक्तछंद योजला याचा अर्थ मुक्तछंद श्रेष्ठ किंवा स्वीकारार्ह असतो असे नाही.
कवी अनिलांना मुक्तछंदाचे
कवी अनिलांना मुक्तछंदाचे प्रवर्तक मानले जाते. ही विधाने त्यांनाही लागू आहेत असेच मानायचे ना? सुरेश भटांनीही मुक्तछंदातल्या कविता लिहिल्या. पाडगावकर हे गीतकार ..त्यामुळे छंद ताल लय यावरच्या त्यांच्या प्रभुत्वाबद्दल शंका येऊ नये. त्यांनाही मुक्तछंदात लिहावेसे वाटले.
भरतजी, कवी अनिलांनी मुकत्छंदात लिहिले,किंवा भटसाहेबांनी लिहिलं,किंवा पाडगावकर मुक्तछंदात लिहीतात म्हणून मुक्तछंदातल्या रचनांना कविता म्हणाव्या... असं आपलं मत झालेलं दिसतंय.... मी या मताशी असहमत आहे.
खरं तर लयीत नसते,छंदात नसते, चाल लावता येत नाही... म्हणून अश्या रचनांना मुक्तछंद म्हणत असावेत. गेय रचना ''कविता '' निश्चितच संबोधली जावी.
मला ''थोडासा रुमानी हो जाये'' मधील नाना पाटेकर ने म्हटलेली रचना कुणाकडे असेल तर इथे द्यावीशी वाटते... त्या मुक्तछंदास ''गेयता'' होती.
जर छंदबद्ध कवितेत (मुळात लिहिताना असलेली लय) वाचणार्याला जाणवली तर चाल विचारावीच लागणार नाही. मायबोलीवर उल्हास भिडे हे सुंदर छंदबद्ध कविता लिहितात. पण ते एखादे वृत्त निवडून त्यात कविता लिहित नाहीत.
अहो,उल्हासजींच्या रचनात गेयता आहेच.. आणि कविता आहेतच त्या... निर्विवाद. आपण चर्चा करतोय ''मुक्तछंदावर'' ...... असो... कुणी तरी एक गेय मुक्तछंद पोस्टा राव..
मुक्तछंदाला काव्यशास्त्राने
मुक्तछंदाला काव्यशास्त्राने मान्यता दिल्याचा दाखला द्यावात.>>> मागे मी दिलेला संदर्भ पुन्हा तपासून पहा. आणि काव्यशास्त्र किंवा काव्य व्याकरणात आपण अधुनिक कवि/अभ्यासकानी केलेले बदल, नवे शोध तुम्ही मान्य करतच नसाल तर माझ्या सिध्द करण्याचाही उपयोग होणार नाही.
गाजलेल्या लोकांनी मुक्तछंद योजला याचा अर्थ मुक्तछंद श्रेष्ठ किंवा स्वीकारार्ह असतो असे नाही.>>> गाजलेले न गाजलेले लाखो कवी, वेगवेगळ्या भाषेत, देशात ज्या काव्यप्रकारात लिहीतात त्याला स्विकारार्ह नाही म्हणण्याचे कारण सांगावे? मग तुमच्या मते तो कशाने स्विकारार्ह होतो?
खरं तर लयीत नसते,छंदात नसते,
खरं तर लयीत नसते,छंदात नसते, चाल लावता येत नाही... म्हणून अश्या रचनांना मुक्तछंद म्हणत असावेत. गेय रचना ''कविता '' निश्चितच संबोधली जावी.>>> लयीत नसेल तर त्याला मुक्तछंदही म्हणता येणार नाही. ती छंदमुक्त आहे. पण उपलब्ध लिखीत साहित्यात जे मांडले ते जर आपण मान्य करणार नसू. कोणती कविता व कोणती नाही हे प्रत्येक विद्वान आपापल्या मताने आणि स्वनिर्मित नियमांनी ठरवत असेल तर चर्चा होऊ शकत नाही. फक्त वाद होऊ शकतात. मी मुक्तछंद मानतो. पुर्णविराम.
ज्या कारणाने गायनानुकूल व गेय
ज्या कारणाने गायनानुकूल व गेय शब्दरचना जनमानसात स्वीकारार्ह होतात.
ती 'घेता घेता एक दिवस' काहीजणांना विचारून पहा:
१. जे मराठी भाषेचे विद्यार्थी असतील किंवा साहित्य क्षेत्रात लुडबुड स्वरुपाचे हातपाय मारत असतील ते लगेच हात बित जोडून 'विंदा - महान कवी' असे उद्गारतील.
२. रस्त्यावरच्या अंडा राईस वाल्याला ती कविता ऐकवा आणि पाठोपाठ तुमचा एकच शेर! भात झाला तिखट फिश्टीचा कदर नव्हती, यारिचा चवदार थर होताच की त्यावर!
"असं आपलं मत झालेलं
"असं आपलं मत झालेलं दिसतंय.... मी या मताशी असहमत आहे."
हे फक्त माझे मत नाही. मराठी कवितेच्या पानावर मुक्तछंदाला कविता म्हणून मान्यता केव्हाच मिळालेली आहे. आणि ती पुन्हा पुन्हा सिद्ध करायची गरज मला तरी भासत नाही.
रच्याकने मायबोलीच्या गझल विभागात वाचायला मिळणार्या बर्याच रचना या वृत्तबद्ध न-कविता इतकेच काय न-साहित्य आहेत, असे माझे मत आहे. सन्माननीय अपवाद आहेतच.
कविता लिहितो असे ठरवून कविता लिहिणारे हे कवी नाहीत असेही माझे मत आहे. व्यक्त होण्यासाठी लिहितो, त्याला त्या लिखाणाचा फॉर्म स्वतःच बोलवतो.
विंदा, सुरेश भट, अनिल इ.च्या कविता ग्रेट नाहीत. तर मराठीतली ग्रेट कविता कुठे बरे वाचायला मिळेल? ग्रेट ग्रेट ग्रेट.
मी एक दिवस आप्पा बळवंत चौकात
मी एक दिवस आप्पा बळवंत चौकात जाऊन अरुणा ढेरे (खरे तर या विषयावर एक स्वतंत्र धागा असायला हवा) या महान कवयित्रीचे 'निळ्या पारदर्शक अंधारात' हे पुस्तक विकत आणले आणि सत्ताविसाव्या पानावर थांबून त्या महिलेला चार पानी पत्र लिहीले. अत्यंत बकवास कविता होत्या! त्यांचे उत्तरही आले म्हणा!
त्यानंतर ना घ देशपांडे, विंदा, कुसुमाग्रज, मर्ढेकर, बालकवी वगैरे घेऊन आलो.
फक्त विशाखा नावीन्यपूर्ण व आवडण्याइतपत होता. बाकी मर्ढेकरांच्या केवळ दोन कविता आवडल्या.
त्यांच्या त्या पिंपात मेलेल्या उंदरांवर सहस्त्रावधी पानांची समीक्षा झाली हे पाहून मळमळले.
मुक्तछंद या विषयास पूर्णविराम
मुक्तछंद या विषयास पूर्णविराम देवू या.... आपण कविता या प्रांताकडे वळू या.
पूर्णविराम देण्याआधी मला
पूर्णविराम देण्याआधी मला जानवलेला निष्कर्ष!
हणमंतराव, श्री. भुंगा, भरतराव व अनेक कवींनी, रसिकांनी मुक्तछंद ही कविता मानलेली आहे.
मी असे मानतो की मुक्तछंदात काव्यमय आशय जरूर असू शकतो पण ते पद्य नसल्याने कविता नाही. या माझ्यामताशी विजयराव पूर्णपणे तर कैलासराव काही अंशी सहमत असावेत. प्रसादरावांनाही माझी काहीमते पटली असावीत.
आता मुक्तछंदरहीत कवितेवर चर्चा करायची असल्यास करूयात!
काही प्रश्न विचारण्याचे धाडस
काही प्रश्न विचारण्याचे धाडस करतो. निरर्थक, विषयाला सोडून, असे वाटले तर दुर्लक्ष करा.
कवितेला अर्थ असणे आवश्यक आहे का? निदान दुसर्या 'एखाद्याला' तरी कळेल असा?
'सूर्य पूर्वेला उगवतो, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे' ' मनुष्याला दोन हात व दोन पाय असतात.' अशी अनेक साधी वाक्ये, गेयता, ताल, लय इ. वापरून एकत्र आणले की कविता होते का? वरील काही लिखाणावरून होते, असे दिसते.
कवितेत कुठले शब्द वापरले आहेत याला महत्व आहे काय? शब्द निवडताना सभ्य-असभ्य या गोष्टींचा विचार होऊ शकतो का? सगळे अश्लील, असभ्य शब्द वापरून त्यात गेयता, लय, ताल वगैरे आणले तर तीहि कविता होते का?
थोडक्यात नुसते 'कविता म्हणजे काय' या प्रश्नाचा उलगडा झाला तरी लगेच चांगले, वाईट काय याचीहि चर्चा आपो आप होणे आले.
कविता चांगली, वाईट असू शकते का? कसे ठरवणार? कवितेचे अधिकृत, सर्वमान्य असे रसग्रहण शास्त्र आहे का? आणि "वाईट" कविताच जर अतिशय लोकप्रिय झाल्या, सगळे लोक म्हणाले, 'व्वा! कविता असावी तर अशी!' तर इतर कविता त्या तुलनेतच चांगल्या, वाईट ठरवणार का?
""""'सूर्य पूर्वेला उगवतो,
""""'सूर्य पूर्वेला उगवतो, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे' ' मनुष्याला दोन हात व दोन पाय असतात.' अशी अनेक साधी वाक्ये, गेयता, ताल, लय इ. वापरून एकत्र आणले की कविता होते का? वरील काही लिखाणावरून होते, असे दिसते""""
झक्की , कधी नव्हे ते आपणास अनुमोदन द्यायची संधी मिळाली.
रच्याकने मायबोलीच्या गझल
रच्याकने मायबोलीच्या गझल विभागात वाचायला मिळणार्या बर्याच रचना या वृत्तबद्ध न-कविता इतकेच काय न-साहित्य आहेत, असे माझे मत आहे>>>>
मी जरासे अवांतर लिहीत आहे. पण कृपया वरील विधानास उदाहरणासहीत स्पष्ट करावेत. त्या त्या गझलेखाली केले तरी आवडेल. ही केवळ विनंती आहे. आग्रह असूच शकत नाही. मात्र, अघळपघळ मते मांडता असे वाटेल.
विंदा, सुरेश भट, अनिल इ.च्या कविता ग्रेट नाहीत. तर मराठीतली ग्रेट कविता कुठे बरे वाचायला मिळेल? ग्रेट ग्रेट ग्रेट>>>
नाही मिळाली. खरच नाही मिळाली.
(हे मी मुक्तछंदातील त्यांच्या कवितांबाबत म्हणतोय. सुरेश भटांचे योगदान पुष्कळ वेगळे आहे. त्यांच्या काही गझलाही मला आवडत नाहीत. पण अनेक आवडतात. मुख्य म्हणजे बाराखडी नसती किंवा त्यांच्या चिरंजीवांनी संकेतस्थळ काढले नसते तर मी आजही गझल करू शकलो नसतो. तेव्हा भटांचे योगदान फार वेगळे आहे, तसे अनिल किंवा विंदांचे 'मला' वाटत नाही.)
झक्की, आपल्याला सविस्तर उत्तर
झक्की,
आपल्याला सविस्तर उत्तर द्यायचा प्रयत्न करत आहे. कृपया थांबावेत.
"असं आपलं मत झालेलं
"असं आपलं मत झालेलं दिसतंय.... मी या मताशी असहमत आहे."
हे फक्त माझे मत नाही. मराठी कवितेच्या पानावर मुक्तछंदाला कविता म्हणून मान्यता केव्हाच मिळालेली आहे. आणि ती पुन्हा पुन्हा सिद्ध करायची गरज मला तरी भासत नाही.
रच्याकने मायबोलीच्या गझल विभागात वाचायला मिळणार्या बर्याच रचना या वृत्तबद्ध न-कविता इतकेच काय न-साहित्य आहेत, असे माझे मत आहे. सन्माननीय अपवाद आहेतच.
कविता लिहितो असे ठरवून कविता लिहिणारे हे कवी नाहीत असेही माझे मत आहे. व्यक्त होण्यासाठी लिहितो, त्याला त्या लिखाणाचा फॉर्म स्वतःच बोलवतो.
विंदा, सुरेश भट, अनिल इ.च्या कविता ग्रेट नाहीत. तर मराठीतली ग्रेट कविता कुठे बरे वाचायला मिळेल? ग्रेट ग्रेट ग्रेट<<<<<<<<<<<<<
भरतजी,
मुक्तछंदास मान्यता आहेच..... पण मुक्तछंदात प्रथित यश लोकांनी लिहीलंय म्हणून मुक्तछंद चांगलं असं नसावं , म्हणून ही चर्चा...........
नाहीतर कोणताही गद्य मजकूर ''मुक्तछंदातील'' कविता खचितच होवू शकतो.
काव्याची साधी सोपी व्याख्या आहे....... गाता येतं ते गाणं..... व जे गाता येत नाहि ते गद्य लिखाण.
मुक्तछंदात चांगल्या रचना नाहीत असं मुळीच नाही..... आशयघन्,गूढ.. किंवा प्रत्येक ओळ वेगळ्या लयीत गुणगुणता येणार्या रचनाही आहेतच की.
आणि कविता/गझल ठरवून लिहीता येत नाही, ती सुचावी लागते.... तंत्र्/वृत्त म्हणजे ती रचना अधिक निर्दोष व काव्यात्मक व्हावी म्हणून केलेले संस्कार होत.
असो...
झक्कीजी व भरतजी, माझा पहिला
झक्कीजी व भरतजी, माझा पहिला प्रतिसाद मी इथे पेस्ट करतोय....
अनुभवातून्,अनुभुतीतून अथवा जाणीवेतून आलेल्या भावना छंदबद्ध शब्दांत व्यक्त करणे,म्हणजे कविता करणे. व अश्या रचनेस ''कविता'' म्हणावे असे मला वाटते.
व असा रचनाकार म्हणजे कवी होय.
आता बर्याच ग्राम्य्,अगम्य जाणीवा छंदबद्ध करुन पेश केल्या जातात व त्यांस कविता म्हणावे असा आग्रह धरला जातो. उदा.
सोचता क्या है कमीने कुत्ते
देखता क्या है कमीने कुत्ते
ये तो अपनीही तेरी परछाई
भौंकता क्या है कमीने कुत्ते
या रचनेस कविता म्हणावे का? छंदबद्ध आहे हे मान्य.
सूर्य पूर्वेला उगवतो..... वगैरे वाक्ये,ताल्,गेयता,लय वापरुन बनवली..... तर ती रचना गाता येईल हे निश्चित... पण तीला कविता म्हणावे का? ह खरंच प्रश्न उरतो.
काही प्रश्न विचारण्याचे धाडस
काही प्रश्न विचारण्याचे धाडस करतो. निरर्थक, विषयाला सोडून, असे वाटले तर दुर्लक्ष करा.>>> अजिबात नाही, आपण उत्तम मुद्दे मांदलेत असे मला तरी वाटते.
कवितेला अर्थ असणे आवश्यक आहे का? निदान दुसर्या 'एखाद्याला' तरी कळेल असा?>> अर्थातच! प्रकाशित केलेली कविता दुसर्याला समजायलाच पाहिजे. तो दुसरा समभाषिक व सज्ञान मात्र असावा.
'सूर्य पूर्वेला उगवतो, भारताची राजधानी नवी दिल्ली आहे' ' मनुष्याला दोन हात व दोन पाय असतात.' अशी अनेक साधी वाक्ये, गेयता, ताल, लय इ. वापरून एकत्र आणले की कविता होते का? वरील काही लिखाणावरून होते, असे दिसते.>>> नाही! आपण चर्चा फॉलो केलीत की नाही माहीत नाही. मात्र मुलात कविता कशाला म्हणावे यावरच चर्चा आहे. पुढे ते सगळे येईलच बहुधा!
कवितेत कुठले शब्द वापरले आहेत याला महत्व आहे काय? शब्द निवडताना सभ्य-असभ्य या गोष्टींचा विचार होऊ शकतो का? सगळे अश्लील, असभ्य शब्द वापरून त्यात गेयता, लय, ताल वगैरे आणले तर तीहि कविता होते का?>>> होय, माझ्यामते तरी त्याला महत्व आहे. भाषा शक्य तोवर सभ्य असावी. अपरिहार्य असल्यास तसे शब्द अपवादात्मकरीत्या चालतात की नाही हे त्या त्या माणसावर! (रसिकावर)
थोडक्यात नुसते 'कविता म्हणजे काय' या प्रश्नाचा उलगडा झाला तरी लगेच चांगले, वाईट काय याचीहि चर्चा आपो आप होणे आले.>>> सहमत आहे.
कविता चांगली, वाईट असू शकते का? कसे ठरवणार? कवितेचे अधिकृत, सर्वमान्य असे रसग्रहण शास्त्र आहे का? आणि "वाईट" कविताच जर अतिशय लोकप्रिय झाल्या, सगळे लोक म्हणाले, 'व्वा! कविता असावी तर अशी!' तर इतर कविता त्या तुलनेतच चांगल्या, वाईट ठरवणार का?>>>
होय! असे सर्वमान्य शास्त्र असते. कवितेला पाच पदरांमधून दर्जात्मक पात्रता सिद्ध करावी लागते. ते खालीलप्रमाणे:
१. आशयाची 'योग्यता' - म्हणजे, मानवी आशय असायला हवा. अमानवी नको. तालिबानी सैनिकांनी केलेले अत्याचार या गोष्टीची स्तुती नसावी. इतर काहीही आशय असू शकेल पण हीन, अमानवी, बीभत्सता हाच हेतू असलेला, असा नसावा.
२. शब्दांची निवड - किती कमी शब्दात व किती 'सुयोग्य' शब्दात आशय मांडलेला आहे हे! आकाश, नभ, व्योम, अंबर हे सर्व शब्द साधारण समानार्थी आहेत. पण आकाश फाटणे आणि अंबरात चंद्र येणे हा फरक सुक्ष्म असला तरी आहे. अंबर फाटत नाही. मग वृत्तासाठीही फाटता कामा नये.
३. सौंदर्यशास्त्र - मांडणी किती मोहक व तालबद्ध आहे व त्यातून मानवी इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी सुंदर वाटतात तशीच पद्यरचना वाटत आहे का हे! शृंगार, मीलन, बलात्कार आणि *वणे! हा यातील फरक आहे.
४. तत्वज्ञान - मानवी संस्कृतीच्या मूलभूत तत्वज्ञानाप्रमाणे कविता आहे की नाही.
५. अध्यात्म - अध्यात्म हा सर्वश्रेष्ठ पदर समजला जातो समीक्षेत! त्यामुळेच माऊली आणि तुकाराम श्रेष्ठ ठरले आहेत.
धन्यवाद!
सौंदर्याशास्त्राची पातळीच
सौंदर्याशास्त्राची पातळीच कवितेला छंदोबद्धतेची अट घालते.
<<<"अनिल हे प्रवर्तक होते
<<<"अनिल हे प्रवर्तक होते म्हणून काहीही होत नाही. ज्या विंदांना एवढाले मोठे पुरस्कार मिळाले त्यांनी एक कविता मी वयाच्या बाराव्या वर्षी अभ्यासली होती. 'घेता घेता एक दिवस'! हा माणूस गेल्यानंतर तिच कविता सर्वत्र छापली गेली. म्हणजे बत्तीस वर्षात त्यांनी एकही दर्जेदार कविता लिहीली नाही का? आणि ती कविता तरी इतकी ग्रेट आहे का? नावांना मी घाबरत नाही. मुद्यांवर बोलावेत. पाडगावकरांना मुक्तछंद आवडला हे काही मुक्तछंद ग्रेट असण्याचे द्योतक नव्हे.
फक्त विशाखा नावीन्यपूर्ण व आवडण्याइतपत होता. बाकी मर्ढेकरांच्या केवळ दोन कविता आवडल्या.
त्यांच्या त्या पिंपात मेलेल्या उंदरांवर सहस्त्रावधी पानांची समीक्षा झाली हे पाहून मळमळले.">>>
इतरांची मते ती अघळपघळ. स्वतःची तेवढी अभ्यासपूर्ण! विंदांची इतर कविता वाचली नाही हा दोष त्यांचा की वाचकाचा?
(आपल्या मतानुसार) युगप्रवर्तक कवितेची लक्षणे कळतील का?
या तथाकथित ग्रेट कवींना आपण लावलेल्या मापदंडांनी ते अगदे खुजे ठरतात. मग आपल्या स्वतःच्या कवितेला तेच मापदंड लावून स्वतःच तिची समीक्षा करणार का?
जर मराठीत ग्रेट कविता लिहिली गेलीच नाही, तर फालतू कवितेवर चर्चा करून वेळ आणि जागा कशाला वाया घालवायची?
१ - मायबोलीवरील व इतरत्रही
१ - मायबोलीवरील व इतरत्रही असलेले बहुतांशी कवी
२ - सुरेश भट व त्यांचे समकालीन किंवा आधीचे कवी! गालिब वगैरे
३ - बालकवी, काही प्रमाणात भट व काही उर्दू गझलकार!
४. बहिणाबाई, रामदास
५. माऊली, तुकाराम, कबीर वगैरे!
पातळीप्रमाणे अंदाजे उदाहरणे देत आहे. गझल हे हाडा मांसाच्या माणसाचे काव्य आहे असे कुठेतरी वाचले होते व ते पटले होते. त्यामुळे गझलकार सहसा वरच्या पातळीला जात नसावेत. मात्र अध्यात्म अनेक गझलांमध्ये आहे हे खरे आहे. पण तितकेच! तेही बरेचसे उर्दूमध्ये असावे. मला फार्सी वगैरे समजत नाही. (म्हणजे देवनागरीत वाचूनही समजत नाही.) त्यामुळे त्याबाबत माहिती नाही.
भरतराव, आप्ण चिडलेले दिसता.
भरतराव,
आप्ण चिडलेले दिसता. असो! या धाग्यावर अजिबात न चिडता चर्चा करायचि आहे असे कैलास, प्रगो, भुंगा, हबा, मी व विजय यांचे ठरलेले आहे. आपणही शांतपणे घ्यावेत अशी विनंती! मी तो प्रतिसाद आपल्या प्रतिसादाला उद्देशून दिला नव्हता. मराठी कवींबाबत जी वर्षानुवर्षे भूमिका घेतली गेलेली आहे त्याबाबत माझे वैयक्तीक मत मांडले होते.
माझ्या कवितेचा दर्जा मी वर दिलाच आहे एका प्रतिसादात! पातळी पहिली!
धन्यवाद!
चला... ही खालची रचना नक्की
चला... ही खालची रचना नक्की काय आहे ते सांगा...
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
हे थोडासा रुमानी हो जाये मधले
हे थोडासा रुमानी हो जाये मधले
Badalo ka naam na ho ambar ki chaon mein
Jalta ho jangal khud apni hi chaon mein
Yehi to hai mausam
Yehi to hai mausam
Aao tum aur hum barish ke nagme gungunaye
Thodasa
roomani ho aye
Mushkil hai jeena umeed ke bina
Thode se sapna sajayae
Thodasa roomani ho jaye
Thodasa roomani ho jaye
हे किचकवध पिक्चर मधले..
हे किचकवध पिक्चर मधले.. गीतकार - ग. दि. माडगुळकर.
धूंद मधुमती रात रे
धूंद मधुमती रात रे, नाच रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे, नाच रे
जल लहरी या धीट धावती, हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अली रमले कमलात रे, नाच रे
ये रे ये का मग दूर उभा, ही घटीकाही निसटून जायची
फुलतील लाखो तारा, परी ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनि, कटी भवती धरी हात रे, नाच रे
स्पर्धा आहे का? हा हा हा हा!
स्पर्धा आहे का? हा हा हा हा! ओळखायची??
हे स्फुर्ती काव्य आहे जे बरेचसे वृत्तात आहे व दर्जा ज्याने त्याने आपापला ठरवावा. माझ्यामते यात भौगोलिक प्रदेशाची स्तुती व त्यात भौगोलिक व ऐतिहासिक उल्लेखांचा वापर इतकेच आहे.
धन्यवाद!
ओह, मी आधीचा प्रतिसाद
ओह, मी आधीचा प्रतिसाद महाराष्ट्र माझावर दिला होता बर का??
धन्यवाद हिम्स्कूल.....
धन्यवाद हिम्स्कूल.....
महाराष्ट्रगीत पोस्टण्याचं प्रयोजन कळलं नाही. असो.
थोडासा.... मधील ही मुक्त्छांदिक रचना दोन ओळी स्वतंत्ररित्या वाचल्यास लयबद्ध आढळते... यास्तव ही रचना ''कविता'' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ...
बेफिकीर, धन्यवाद!!
बेफिकीर, धन्यवाद!!
महाराष्ट्र गीत... हे गीत आहे
महाराष्ट्र गीत... हे गीत आहे ते काव्य म्हणून मान्य आहे.. आणि माझ्या कवितेच्या संदर्भातील बालबुद्धीनुसार ते कुठल्याही वृत्तात वा छंदात डायरेक्ट बसत नाहीये.. मग ते मुक्तछंद आहे की कसे?
किचकवध मधले गाणे.. हे तर नक्कीच कुठल्याच छंदात बसत नाही.. तरीही ते गेय आहे.. त्यात एक लय आहे आणि तेही मुक्तछंदच ना???
आज माझे मन तुझ्याकडे काही
आज माझे मन तुझ्याकडे काही मागत आहे
हळवेपणे ते तुला काही सांगत आहे
तू ये माझ्या जीवनात कुठल्याही रुपात, पण बनू नकोस सुन्दर पाखरांसारखी.
बनू नकोस तशी निश्ठुर तु, जरी असलीस सुन्दर तु त्यांच्यासारखी.
कारण ते जातात वॄक्षाकडे, त्याची सावली व मधुर फळांसाठी,
आणि त्याच्याकडे मि़ळणार्या माउलीसारख्या ममतेसाठी.
पण जेव्हा ते झाड वठतं आणि त्याच्याकडे काहीच उरत नाही
तेव्हा ती पाखरं उडून जातात आणि फिरकुनसुद्धा पाहात नाहीत.
वर पेस्टलेली,माबो वरील एक कविता आहे. ह्या मुकत्छंदास कविता म्हणावे का?
हिम्स्कूल्,आपण पोस्टलेली गीते.... गेय आहेत्,व ती गाता येतात...... ती छंदातच आहेत. अर्थपूर्ण आहेत...... मी आधी लिहील्या प्रमाणे '' देखता क्या....... '' छाप नाही आहेत. व निर्विवादपणे कविता आहेत. पण कोणतेही गद्य, ऑळींची फेरफार करुन लिहीले तर मुकतछंदातील कविता म्हणून छापता येते. यास्तव..... छंदबद्ध अस्णे/नसणे हे कविता असणे/ नसणे याचे मूलक असावे असे वाटते...
प्रगो, ह्या
प्रगो,
ह्या मुक्तछंद्/छंदमुक्त वगैरे मधे जास्त घुसत नाही.
(नुस्तं वाचूनच दमलो)
मागे (बहुतेक पान क्र.१) तू आचार्यांच्या श्लोकांमधल्या यमकाबाबत लिहिले आहेस.
की त्या श्लोकात यमक नाही.
पण संस्कृतात मुळातच यमक ही पद्धत नाहीच.
प्रास असतो संस्कृतात. आणि अंत्य-यमक-सदृश (सदृश हे महत्वाचे) काही शब्द येतात,
जसे, चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् |
चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् | (ह्या श्लोकातील 'माम्')
किंवा, नमामि, स्मरामि इ.इ. जे श्लोकातील चरणांती येणारे शब्द आहेत ते.
पण संस्कृतातील असे शब्द आणि मराठीतील यमक ह्यात फरक आहे असे वाटते.
बाकी चालू द्या.
Pages