कविता म्हणजे काय?

Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16

एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...

"कविता" म्हणजे काय ?

त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .

इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...

गुलमोहर: 

इतर छंदाप्रमाणे निश्चीत मात्रा, निश्चीत शब्दसंख्या इ. ची मर्यादा नसली तरीही कोणत्याही इतर छंदाप्रमाणेच लयीचे (जी पद्यरचनेचा आत्मा असते) बंधन असलेला आणि काव्यशास्त्राची मान्यता लाभलेला प्रभावी काव्यप्रकार / छंद म्हणजे मुक्तछंद.
या नंतर कोणती रचना कविता म्हणायची व कोणती नाही हे वाचकावर सोपवावे.

इतर छंदाप्रमाणे निश्चीत मात्रा, निश्चीत शब्दसंख्या इ. ची मर्यादा नसली तरीही कोणत्याही इतर छंदाप्रमाणेच लयीचे (जी पद्यरचनेचा आत्मा असते) बंधन असलेला आणि काव्यशास्त्राची मान्यता लाभलेला प्रभावी काव्यप्रकार / छंद म्हणजे मुक्तछंद.
या नंतर कोणती रचना कविता म्हणायची व कोणती नाही हे वाचकावर सोपवावे.>>>>>

१. काव्यशास्त्राची मान्यता लाभणे - जेम्स लेनच्या पुस्तकाच्य विक्रीला मान्यता लाभली हे मला आठवले. एखाद्या गोष्टीला मान्यता लाभणे हा काहीवेळा चुकीचा निर्णय किंवा वेडेपणा किंवा अगतिकता असू शकते.

२. काव्यशास्त्राची मान्यता लाभणे - म्हणजे नेमकी कुणाची मान्यता लाभलेली आहे?

३. काव्यशास्त्राची मान्यता लाभणे - कोणाची तरी मान्यता लाभलेली आहे हे दुसर्‍यांनीही ते मान्य करावे याचे कारणयाकसे ठरू शकेल??

४. लयीचे बंधन असलेला पद्यप्रकार - मुक्तछंदाला लय असते ती कशी यावर समाधानकारक शंकानिरसन झाल्यासारखे वाटत नाही. मुक्तछंदातील पाच विविध रचनांच्या पंक्ती मांडून ते एलॅबोरेट केले जवे असे मी सुचवतो.

धन्यवाद!

"छंदाप्रमाणेच लयीचे (जी पद्यरचनेचा आत्मा असते) बंधन असलेला आणि काव्यशास्त्राची मान्यता लाभलेला प्रभावी काव्यप्रकार / छंद म्हणजे मुक्तछंद"
लय ही कवितेत अंगभूतच आलेली असते. ती कवितेचा आत्मा आहे. तिचे कवितेला बंधन होणार नाही. बंधन हा बाह्य गुण झाला, त्यात लादलेपणाची भावना येते .तर आत्मा हा कवितेपासून वेगळा करता येणारच नाही.
अनेक वृत्तबद्ध कविता या विशिष्ट चालीत वाचता येतील, किंवा अमक्या वृत्तात लिहिल्या आहेत अशा नोंदीसह प्रकाशित होतात. (माबोवरच नव्हे , अगदी आठवणीतल्या कविता संग्रहातल्या ८०-९० वर्षे जुन्या कविताही). लिहिणार्‍याला आणि वाचकाला जर कवितेची लय आपसूक सापडली असेल, ती वरून लादली गेली नसेल तर याची गरज भासू नये.

मित्रहो,

काही माझी मते,

१. मुक्तछंद ही एक काळाच्या ओघात निर्माण झालेली "सोय" आहे. माझ्या मते ती खालील मुद्दयांच्या आधारे रुढ होत गेली असावी,
अ. छंदाच्या बंधनात भावना अत्यंत प्रभावीपणे मांडता येण्याईतके भाषेवर नसलेले प्रभुत्व.
आ. छंदांचा अभ्यास न करताही "कवी" म्हणवून घ्यावयाची हौस.

२. मुक्तछंदात असलेल्या ज्या लयीबद्दल इथे नमूद केले गेले आहे ती लय सादरीकरणातील लय असू शकते. आणि ती प्रत्येक सादर करणार्‍या व्यक्तीनुरूप बदलू शकते. यास्तव मुक्तछंदाला स्वत:ची अशी लय नसते हे माझे मत.

मुक्तछंदाला लय असते ती कशी यावर समाधानकारक शंकानिरसन झाल्यासारखे वाटत नाही.>>> ऐकल्याशिवाय ते होणारही नाही.

बेफीकीरांशी सहमत .

कोणी तरी लिहुन ठेवले म्हणुन आपण ते खरे मानलेच पाहिजे अशी काही सक्ती नाही , स्वप्रचित आल्या शिवाय काहीही खरे मानु नये असे माझा एक मित्र म्हणतो .( ह्या वाक्याची स्वप्रचिती आल्याने लिहिले आहे हे वाक्य. विरोधाभास नाही)

असो .

बाकी आपण मुक्तछंदावरच चर्चा करत बसणार आहोत का ??

कविता म्हणजे काय या चर्चेला एवढा एकच पैलु आहे काय ??

आत्मा हा बंधन असणारच असे माझे मत! कारण आत्म्याशिवाय सजीव असणे अशक्य! यावरून आत्मानंदची आठवण काढून वेळ घेतला जाणार नाही अशी अपेक्षा आहे.

कवितेला लय पाहिजेच!

छंदबद्ध कविता कोणत्या चालीत वाचायची हे सांगावे लागते (काही ठिकाणी), म्हणजेच तिच्यात लय नाही असे होत नाही का?>>>>>

चाल आणि लय यांची गफलत आहे या विधानात!

वियदगंगेमधील दोन गीतांच्या पंक्ती देतो उदाहरणासाठी:

सुहानी चांदनी राते हमे सोने नही देती - चाल वेगळी

बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है - चाल वेगळी

मात्र दोन्हिंची लय एकच आहे.

धन्यवाद!

मुक्तछंदाला स्वत:ची अशी लय नसते>>> परंतू मुक्तछंदातील कवितेला लय असतेच.

छंदांचा अभ्यास न करताही "कवी" म्हणवून घ्यावयाची हौस.>>> हा मुद्दा नाही पटला. तसे असते तर बर्‍याच मुक्तछंद लिहीणार्‍यांना टिकेला सामोरे जावे लागले नसते. मुक्त आहे म्हणजे वाट्टेल तसे लिहीणे नाही. त्यालाही लयीचे बंधन आहे. त्यासाठीही वाचन, अभ्यासाची गरज आहेच.

पण लय हे कवितेवरचे बंधन नाही, तर आपसूक आलेला गुण.>>> अनुमोदन

लय = विशिष्ट पंक्ती उच्चारायला लागणारा कालावधी व त्यातील समेच्या जागांचे मिश्रण!

चाल - हार्मोनियमवरील विविध पट्यांपैकी काव्यपंक्तीसाठी कोणत्या पट्या कोनत्या क्रमाने वापरल्या गेल्या तो क्रम!

ज्याचं गीत होवू शकतं ,ठेक्यात्,लयीत म्हटलं जावू शकतं ते काव्य/कविता हे ठीक आहे. मुक्तछंदातील रचना जर गेय असेल तर ती ही कविताच. कुणीतरी मुक्तछंदातील एक गेय कविता इथे दिल्यास बरं होईल. ( मी ही शोधतो आहे. )

हे झाल्यावर पुढे मुक्तछंदरहित कवितेवरील चर्चा पुढे चालू ठेवू. Happy

मुक्त आहे म्हणजे वाट्टेल तसे लिहीणे नाही. त्यालाही लयीचे बंधन आहे. त्यासाठीही वाचन, अभ्यासाची गरज आहेच.>>>>

त्यालाही लयीच बंधन आहे हे उदाहरणासहीत स्पष्ट करावेत अशी विनंती! मुक्तछंदाला लय असू शकत नाही. हे माझे मत चुकीचे आहे हे कृपया सिद्ध करावेत.

कैलास यांच्याशी पार्टली सहमत !

१. त्या नंतरच मुक्तछंदरहीत कवितेची चर्चा करू - सहमत

२. गेय मुक्तछंद संकल्पना - असहमत!

गेय मुक्तछंद - सुरेश वाडकरांनी माझ्या एका ओळखीतील महिलेची मुक्तछंदातील कविता गाऊन दाखवण्याचा आटापिता केला आहे व अडीच लाख रुपये खर्च करून ती सी.डी. बनलेली आहे. मात्र मुक्तछंद गाताना गायकाच्या पार्श्वभागाला लवंगी फटाक्यांची माळ लावल्याप्रमाणे त्याची पंचाईत होते हे त्यातून सिद्ध झालेले आहे.

चाल आणि लय यांची गफलत आहे या विधानात! - १००% सहमत.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास(आधिक स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी)

एकाच रागात बांधलेल्या अनेक बंदीशींच्या चाली वेगवेगळ्या असतात, परंतु लय विलंबित, मध्य, द्रुत, अतिद्रुत अशी असते - लयीचा संबंध हा विशीष्ट कालानुरूप रीपीट होत असलेल्या मात्रांशी असतो.

त्यालाही लयीच बंधन आहे हे उदाहरणासहीत स्पष्ट करावेत अशी विनंती! मुक्तछंदाला लय असू शकत नाही. हे माझे मत चुकीचे आहे हे कृपया सिद्ध करावेत.>>> आपण मुक्तछंदाच्या लयिची तुलना गझलेशी करता आहात. त्यामुळे आपला गोंधळ होतो आहे. चला मी तुम्हाला फोन करून एक मुक्तछंदातील कविता ऐकवितो आणि एक ललित वाचून दाखवितो त्यातून तुम्हाला फरक पटला तर ठीक नाहीतर मी याबाबत मला सापडलेल्या व पटलेल्या व्याख्येवर समाधानी आहे. तुम्हाला गरज वाटल्यास माहिती शोधा, मते तपासा अथवा आहे त्या मतासोबत चालत रहा. हा मान्यतेचा मुद्दा आहे. वादाचा होण्याचे कारण नाही.

वाद नाहीच आहे.

१. आपल्याला अजूनही मी 'फोनवरून ऐकवल्याशिवाय ते न समजणार्‍यातला ' वाटतो याचे आश्चर्य वाटले. असंख्य कवीसंमेलनामध्ये मुक्तछंद ऐकलेला आहे. कशा नसलेल्या लयीत तो बसवतात ते पाहिलेले आहे. आपण व श्री. भुंगा लय म्हणून काय म्हणत आहात ते मला केव्हाच माहीत होते.

२. गझलेची तुलना मुक्तछंदाशी करत नाही आहे. छंदाची तुलना मुक्तछंदाशी करत आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास >>> विजयजी मी गाण्याबद्दल बोलत नाही. कविता वाचताना साधला जाणारा ह्रिदम विषयी बोलतो आहे.

कैफ उसना मागते माझ्याकडे मधुशाला
पिणारेही म्हणतात मभा आला मभा आला

माझे एक आवडते कवी श्री. म भा चव्हाणांच्या या पंक्ती! ही गझलेची द्विपदी नाही हे आपणही जाणताच! अष्टाक्षरी आहे. हिला लय आहे.

आता दाखवा मुक्तछंदाची लय, फोन न करता!

कविता वाचताना साधला जाणारा र्‍हिदम - तो ठेका असतो. त्रिताल, झपताल किंवा मुक्तछंद ताल जर असलाच तर!

लय वेगळी!

बेफिकिरजींना अपेक्षित लय म्हणजे "ताल" असावा असे वाटते आहे आणि मी (आणि कदाचित हणमंतरावही) ज्याला लय म्हणत आहोत ती काव्य मांडतानाची पध्दत आहे असे मला वातते आहे. काही गफलत तर नाही ना???? हणमंतराव शक्य असल्यास प्रकाश टाका.

पण लय आणि ताल हे भिन्न आहेत.

" १. मुक्तछंद ही एक काळाच्या ओघात निर्माण झालेली "सोय" आहे. माझ्या मते ती खालील मुद्दयांच्या आधारे रुढ होत गेली असावी,
अ. छंदाच्या बंधनात भावना अत्यंत प्रभावीपणे मांडता येण्याईतके भाषेवर नसलेले प्रभुत्व.
आ. छंदांचा अभ्यास न करताही "कवी" म्हणवून घ्यावयाची हौस."

कवी अनिल मुक्तछंदाचे प्रवर्तक . त्यांनी छंदबद्ध रचनाही समर्थपणे केल्या. मग त्यांना ही ’सोय’ घ्यावीशी वाटली असे म्हणायचेय का? सुरेश भटांसारख्या शब्दप्रभूलाही काही वेळा मुक्तछंदात व्यक्त व्हावेसे वाटले. पाडगावकर गीतकार म्हणून प्रसिद्ध. म्हणजे त्यांना ताल, छंद, लय, वृत्त अवगत नव्हते म्हणून मुक्तछंदात लिहायची गरज भासली का?
आपल्याला जे सांगायचेय ते ज्या फॉर्ममधे अधिक प्रभावीपणे मांडता येईल, तो फॉर्म कवीने (किंवा लेखक/ कलाकाराने) निवडला म्हणजे ती कवी म्हणवून घ्यायची हौस झाली का? लेखनाचा फॉर्म लेखक नाही तर विषयच निवडतो, असे बर्‍याच लेखकांचे मानणे आहे. वेगळा फॉर्म त्यावर लादला गेला, तर विषयावर अन्याय होतो. एकांकिकेचे नाटक करताना पाणी घालावे लागते.
याच न्यायाने अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटींग करणारे चित्रकार, त्यांना लोकांना समजतील , दिसतील अशा रेघा ओढण्यास असमर्थ असतात, तरीही चित्रकार म्हणवायची हौस म्हणून चित्रे काढतात असे म्हणावे लागेल.
नुसता छंदांचा अभ्यास केला की कविता लिहिता येते का?

मला लय म्हणजे ताल वाटत नाही.

लय = वर दिले आहे.

ताल = त्रितालात बसणारे गीत दोन वेळा केरवा वाजवला तरी बसतेच!

बेफिकीरजी,

छंदाची तुलना मुक्तछंदाशी करत आहे.>>>

अष्टोळी आणि अभंग या दोन्हीच्या लयीत तफावत असेल की नाही?

बाकी छंदाना तुम्ही छंद का मानता किंवा त्या छंदात लिहीलेली कविता कविता का मानता?

तुम्ही ज्या लयीत अष्टोळी वाचाल त्यापेक्षा वेगळ्या लयीत मी वाचेन याचा अर्थ तुम्ही नसलेली लय त्यात आणली असा होईल का?

तुम्ही ज्या व्याकरणाच्या नियमांना मान्य करून मुक्तछंदाला विरोध करत आहात त्याच व्याकरणाने मुक्तछंदाला छंद मानले असताना तुम्ही विरोध करण्याचे प्रयोजन काय?

मुक्तछंदाच्या सोप्या बंधनात रचना करणे गझलेच्या आकृतिबंधात रचना करण्यापेक्षा अवघड आहे असे तुम्हाला वाटत नाही का?

फक्त वृत्ताच्या कर्णमधूर लयीवर बर्‍याच निकृष्ट गझला तरून जातात परंतू मूक्तछंदात थोडाफार रुक्षपणाही रसिकाच्या लगेच लक्षात येतो. यावरून तो काव्यप्रकार रसिकाच्या अधिक जवळचा आहे असेच स्पष्ट होते ना?

गझल आणि मुक्तछंद दोहोंच्या प्रसाराचा आढावा घेतल्यास कोणता प्रकार अधिक लोकांपर्यंत पोहोचला असावा असे वाटते आहे?

भरतराव,

१. आपण सुरुवातीपासून फोलो केले नसावेत असे वाटत आहे. कवी म्हणजे काय व कविता म्हणजे काय यावरच चर्चा आहे. ही उपचर्चा चाललेली आहे. मुक्तछंदावर सर्वानुमते एकमत झाल्यावर पुढे जायचे आहे.

२. अनिल आणि भटांनी मुक्तछंद लिहीला - दोन थोर नावे लिहिल्याने काही होत नाही. मुळात मी भटांच्या गझलेवरही यापुर्वी स्पष्ट मते मांडलेली आहेत. हे हणमंतरावांना व कैलासरावांना माहीत आहे. अनिल हे प्रवर्तक होते म्हणून काहीही होत नाही. ज्या विंदांना एवढाले मोठे पुरस्कार मिळाले त्यांनी एक कविता मी वयाच्या बाराव्या वर्षी अभ्यासली होती. 'घेता घेता एक दिवस'! हा माणूस गेल्यानंतर तिच कविता सर्वत्र छापली गेली. म्हणजे बत्तीस वर्षात त्यांनी एकही दर्जेदार कविता लिहीली नाही का? आणि ती कविता तरी इतकी ग्रेट आहे का? नावांना मी घाबरत नाही. मुद्यांवर बोलावेत. पाडगावकरांना मुक्तछंद आवडला हे काही मुक्तछंद ग्रेट असण्याचे द्योतक नव्हे.

हणमंतराव,

१. आपण अजूनही मला 'मी गझल विरुद्ध मुक्तछंद' यावर बोलतो आहे असे समजत आहात. हे पहिले मनातून काढून टाकावेत.

२. अष्टाक्षरीची लय कुणीही वाचली तरी तशीच असते. तुम्ही काय किंवा मी काय!

३. व्याकरणाने मुक्तछंदाला मानले आहे - कुठे मानले आहे ते दाखवावेत.

४. व्याकर्णाने मुक्तछंदाला मानले आहे - समजा मानले आहे, मग मुक्तछंदाचे व्याकरण सांगावेत.

हणमंतराव -

अष्टाक्षरी व अभंग या दोन्हीच्या लयीत तफावत असेल की नाही - असे आपण विचारत आहात. मला कृपया अभंगाची लय सांगावीत.

पाडगावकरांना मुक्तछंद आवडला हे काही मुक्तछंद ग्रेट असण्याचे द्योतक नव्हे.>>>

भुषण कटककरजी,

राग नसावा पण वरील वाक्यावरून असे दिसते की आपण चर्चा करत नाही आहात आपल्या मुद्द्याला घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. वर मी सांगितल्याप्रमाने मी मला मिळालेल्या माहितीच्या आधारे मुक्तछंदाला छंद व एक उत्तम काव्यप्र्कार मानायला तयार आहे.

तुम्हाला मुक्तछंद आवडला नाही हे काही मुक्तछंद काव्यप्रकार नसण्याचं ध्योतक नाही.

आपण मूळ विषयाकडे जाऊया.

Pages