वैभव यांचे रंगीबेरंगी पान
जागतिकिकरण - मराठी भाषेपुढील आव्हान
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - मान्यवरांच्या प्रतिक्रिया
पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन नुकतेच सॅन फ्रान्सिस्को - बे एरीयामध्ये पार पडले. या संमेलनाविषयी मला अनेक मान्यवराशी - संमेलनाध्यक्ष गंगाधर पानतवणे, संगीतकार सलील कुळकर्णी, तरुणांचे नेते अविनाश धर्माधिकारी, ज्येष्ठ कवी शंकर वैद्य, मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॅा. दा. ग. गोरे - बोलण्याची संधी मिळाली. मी बहुतेकांना संमेलनाच्या वादाविषयी, संमेलनातून काही सकारात्मक निष्पन्न झाले की नाही आणि मराठी साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याविषयी विचारले. त्यांची मते ध्वनिमुद्रीत करुन पॅाडकास्टच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवली आहेत.
नितीश कुमार - एक आशादायी सुरुवात
कधी कधी मन विषण्ण होतं. सगळ्या बाजूने वाईट बातम्याच ऐकायला येत असतात. मुंबईमध्ये दहशतवादी हाहाकार उडवतात. आंतरराष्ट्रीय चित्रपट भारतातील दारीद्र्याचं (सत्य) दर्शन घडवतात. कुणी मित्र नुकताच भारतात जाऊन आलेला असतो. तो तिथल्या भ्रष्टाचाराचे नवीन अनुभव ऐकवतो. निराशेने मन अंधारुन जातं. पण अशा वेळी एखादी बातमी अशी येते की आपल्या आशा पुन्हा पल्लवीत होतात. अंधाऱ्या भुयारातून जात असताना प्रकाशाची लकेर दिसते. पुन्हा एकदा मन स्वप्नं बघायला लागतं - सोन्याचा धूर निघणाऱ्या - ऐतिहासिक पुस्तकांच्या कपाटात लुप्त झालेल्या भारताचं.
एक देश - एक भारत
वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व
भारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.
जग एकसमान आहे - इंग्रजी पुस्तक परीक्षण
अविनाश धर्माधिकारी यांचे मुंबई हल्ल्यावरील भाषण
अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.
http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc
आम्ही कुत्र्याच्या मौतीने मरायचं...
सरकार कधी जागे होणार?
कालच्या दहशतवादी कृत्यांनी तरी झोपलेल्या सरकारला जाग येणार आहे काय? किती दिवस हे सहन करायचं? भारताकडे गुप्तहेर खाते आहे काय? आणि असेल तर त्यांना आतापर्यंत एकही दहशतवादी कारवाई रोखता का आली नाहीये?
Pages
