क्यालिग्राफीचा - पहिला प्रयत्न
आई गं!!! जांभळा रंग एकूणच मला अत्यंत अत्यंत प्रिय. त्यात तो जर शाईचा असेल. त्याची नीप छान असेल आणि तो गळत ओघळत नसेल तर आणखीच मजा!!!
माझी ताई जितकी सुंदर रांगोळी काढायचा ना तितकीच सुंदर ती कशिदा काढण्यात, शेणानी घर सारवण्यात, आणि खास म्हणजे लिहिण्यात हुशार! मी चवथ्या वर्गात असताना ती दहावीला होती. तिच्या समोर तिच्या मैत्रिणीची रसायन शास्त्राची वही होती आणि बहिण तिच्या वहीतून आपल्या वहीत काहीतरी समीकरण लिहित होती. ते समीकरण बघून मला इतके नवल वाटले की मला रसायन शास्त्र हा विषय कधी येतो कधी नाही असे झाले होते.


