आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - भाग २ - फसलेला महाराजा डोसा आणि जमलेला मिसळपाव !
आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - १ - अंड्या प्याटीस ! ए लव्ह ई स्टोरी - http://www.maayboli.com/node/62355
आठवणी जागवणारे खाद्यपदार्थ - १ - अंड्या प्याटीस ! ए लव्ह ई स्टोरी - http://www.maayboli.com/node/62355
मुंबईच्या मिसळपावने मारली बाजी !
आपल्याकडे लग्ने जरी कांदेपोहे खाऊन ठरत असली तरी मिसळपाव हा प्रकार त्याहीपेक्षा जास्त फेमस आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्यात हा पदार्थ खाल्ला जातो आणि प्रत्येकाची आपापली एक खासियत आहे. कोणाची मिसळ झणझणीत, कोणाची तिखटजाळ तर कोणाची शुद्ध अन सात्विक ज्यात बटाट्याची भाजीही टाकली जाते. मिसळीत उसळ कोणती असावी आणि ती कोणत्या प्रकारच्या पावाबरोबर खावी यातही मतमतांतरे होतात, आणि अर्थातच कोणाची मिसळ सरस यावर वादही होतात.
मिसळपाव
बरेचदा आपण वेगवेगळी माणसे पाहतो ज्यांचे विचार, आवडी-निवडी आणि बरंच काही जरी भिन्न असलं तरी आपण सगळेजण एका गोष्टीशी सारखेच जुळलेले आहोत ते म्हणजे खवय्येगिरी. रोज घरातील भाजीपोळी जरी प्रिय असली तरी बाहेर मिळणारे काही पदार्थ अगदी मन आनंदित करून जातात. त्यात पाणीपुरी, डोसा , वडापाव असे अनेक पदार्थ जरी असले तरी माझ्यामते ख्यातनाम असा एक पदार्थ अगदी सहजतेने कुठेही पाहायला माफ करा खायला मिळतो आणि तो म्हणजे मिसळपाव. उसळ, फरसाण मिसळून त्यात कांदा, कोथिंबीर आणि वरून लिंबू पिळून बनवलेली मिसळ जणू तोंडाला पाणी आणते.