मुंबईच्या मिसळपावने मारली बाजी !
आपल्याकडे लग्ने जरी कांदेपोहे खाऊन ठरत असली तरी मिसळपाव हा प्रकार त्याहीपेक्षा जास्त फेमस आहे. कारण महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्यात हा पदार्थ खाल्ला जातो आणि प्रत्येकाची आपापली एक खासियत आहे. कोणाची मिसळ झणझणीत, कोणाची तिखटजाळ तर कोणाची शुद्ध अन सात्विक ज्यात बटाट्याची भाजीही टाकली जाते. मिसळीत उसळ कोणती असावी आणि ती कोणत्या प्रकारच्या पावाबरोबर खावी यातही मतमतांतरे होतात, आणि अर्थातच कोणाची मिसळ सरस यावर वादही होतात.
पण अखेर मुंबईच्या मिसळपावने अख्ख्या जगात बाजी मारली आहे. ते देखील नुसते सर्वोत्कृष्ट मिसळ म्हणूनच नाही तर सर्वोत्क्रुष्ट शाकाहारी पदार्थ म्हणून मुंबईच्या आस्वाद, शिवाजी पार्कने पहिला क्रमांक पटकावला आहे.
केवळ 48 रुपयांच्या अगदी गरीबांनाही परवडणार्या या मराठमोळ्या डिशने मिळवलेला हा गौरव एक मुंबईकर म्हणूनच नाही तर एक महाराष्ट्रीय, एक मराठी माणूस, एक भारतीय म्हणून मला अभिमानास्पद वाटतो.
Please have a look at this link
http://www.indiafoodnetwork.in/mumbai-restaurants-missal-pav-wins-award-...
There are a few dishes one must try when in Mumbai. Missal Pav is one of them. Good news is that the Maharashtrian breakfast dish has won big at the global Foodie Hub Awardsheld in London yesterday. Aaswad, situated at Shivaji Park in Dadar, bagged the award for ‘The World’s Tastiest Vegetarian Dish’ in Mumbai for its Missal Pav.
अरे फक्त वाचताय काय,
चलो शिवाजी पार्क....
वॅाटसअप मेसिजऐवजी तुमचे तीन
वॅाटसअप मेसिजऐवजी तुमचे तीन मिसळींचे अनुभव लिहा.
साधारणपणे बसडेपोजवळ गर्दी होणाय्रा ठिकाणी चांगली असते.
रुंन्मेश साहेब, हे अवांतर आहे
रुंन्मेश साहेब, हे अवांतर आहे पण बघाच. कालच्या लोकसत्ताच्या अग्रलेखात, तुमच्या लाडक्या सई विषयी काय लिहीले आहे ते. हे कौतुक आहे का चेष्टा ते तुम्हीच ठरवा.
<<<<<जेआरडी टाटा म्हणत, अतिउत्तमाची आस धरलीत तरच हातून काही चांगले होईल. तुमचे उद्दिष्टच चांगले काही करावे असे असेल तर तुमच्या हातून बरेदेखील काही घडणार नाही. म्हणजे माधुरी दीक्षित व्हायचे हेच जर उद्दिष्ट असेल तर सई ताम्हणकरदेखील होता येत नाही, हा त्याचा अर्थ. >>>>>
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/36538 घ्या करंट.
कांदापोहे, लिंकेतला धागा
कांदापोहे, लिंकेतला धागा वाचून सॉल्लिड करंट लागला.
आस्वादमधली असो मामलेदार कचेरी समोरची असो वा रस्त्यावरच्या गाडीवरची असो थोडीशी तिखट असो वा एकदम करंट मारणारी असो मिसळपाव आवडती डिश तिला कोणी पुरस्कार देवो अथवा न देवो.
चला सई आली.... आता थोड्या
चला सई आली.... आता थोड्या वेळाने शहारूख पण येईल
मिसळपाव आवडती डिश तिला कोणी
मिसळपाव आवडती डिश तिला कोणी पुरस्कार देवो अथवा न देवो.
>>>
येस्स, मी तर मोठमोठाल्या हॉटेलमध्ये जाऊन कधी मूड आला तर मिसळपाव ऑर्डर करतो, अगदी माझ्या ग'फ्रेंडची चमत्कारीक नजर झेलून हे धाडस करतो.
पण अनुभवाने सांगतो, अपवाद वगळता ती बकवासच असते, बरेचदा सर्व्हही असे करतात की हाताला लागेल ते भांडे घेतलेय !
"अपवाद वगळता ती बकवासच
"अपवाद वगळता ती बकवासच असते"-टपरीत फळकुटं बाकडी असणाय्रा 'हॅाटिलात'च चांगली मिसळ मिळते .
ही बातमी किमान दोन मराठी
ही बातमी किमान दोन मराठी वर्तमानपत्रांतही प्रकाशित झाली आहे. लोकसत्तेने आजचा अग्रलेख या बातमीच्या अनुशंगाने लिहिला आहे. (म्हणजे ऋन्मेष बहुतेक लोकसत्तेच्या संपादकीय चमुतल्याच कोणाचातरी आयडी असणार )
बिनमहत्त्वाच्या बातमीवर काढलेला धागा म्हणून संभावना झालेली अन्यत्र वाचली म्हणून.
ऋन्मेषभाऊ, आस्वादची मिसळ हा सर्वात 'चविष्ट' शाकाहारी पदार्थ म्हणून निवडला गेला आहे. तेव्हा पोषणमूल्यांकडे काणाडोळा केला तरी चालेल.
@ भरत मयेकर, त्याच अग्रलेखात
@ भरत मयेकर,
त्याच अग्रलेखात "उदर तृप्त तृप्त झाले तरी मनाने मात्र मिसळीला मराठी खाद्यजगतात खालचाच मान द्यायचा हा अस्सल दुटप्पीपणा झाला." हे वाक्य देखील आहे. ते वाचून मी देखील लोकसत्ता संपादकमंडळातीलच सदस्य आहे असे विधान तुम्ही केले नाही याबद्दल तुमचे आभार.
चेतन
चेतन
ते वाचून मी देखील लोकसत्ता
ते वाचून मी देखील लोकसत्ता संपादकमंडळातीलच सदस्य आहे असे विधान तुम्ही केले नाही याबद्दल तुमचे आभार.
>>
त्यांनी ऋन्मेषचा उल्लेख केला पण तुमचा केला नाही हाच त्यांचा दुटप्पीपणा आहे.
मी माझ्या व्हॉटसपग्रूपवर
मी माझ्या व्हॉटसपग्रूपवर देखील ही बातमी शेअर केली होती.. सेम पोस्ट.. पण ही बातमी खोटी आहे किंवा फिक्सिंग आहे.. मिसळ या पदार्थाची ती पात्रताच नाही अश्या आशयाच्याच पोस्ट जास्त आल्या हे दुर्दैव आहे..
पण गंमत बघा.. एकदा हे बोलून झाल्यावर त्याच लोकांची मिसळ कुठे कुठे सही मिळते म्हणून जोरदार चर्चाही सुरू झाल्या.. कमाल वाटते कधी कधी आपल्या माणसांची
अखेर मिसळीवर अग्रलेख लिहायची
अखेर मिसळीवर अग्रलेख लिहायची वेळ आलीच तर कुबेरांवर;
जिथे मोती वेचले, तिथेच गारा वेचण्याची वेळ आलीच तर. हाऊ पथेटिक
आख्ख्या अग्रलेखात मोदींवर एकही टोमणा नै? अर्रर्रर्र.
चेतन, ये लगा सिक्सर
चेतन, ये लगा सिक्सर
मोदी असुनही ढोकळ्याऐवजी
मोदी असुनही ढोकळ्याऐवजी मिसळीला बक्षीस मिळाले !
अप्पाकाका, मिसळीला एवढे तुच्छ
अप्पाकाका, मिसळीला एवढे तुच्छ का लेखत आहात?
मी कुठे तुच्छ लेखत आहे फक्त
मी कुठे तुच्छ लेखत आहे
फक्त पायताणाला मुकुटाचा दर्जा देऊ नये
हा धागा वाहता आहे काय?
हा धागा वाहता आहे काय?
झाला असेल
झाला असेल
Finally आ पा आलातच ॠ
Finally आ पा आलातच ॠ अभिनंदन.