रजनीकांत

सिवाजी..द बॉस्स

Submitted by mi_anu on 29 September, 2018 - 09:43

सुरुवातीलाच एक मनुष्य घोषणा देणाऱ्या प्रचंड जनसमुदायातून एका तुरुंगात जातो.शेजारचा तुरुंग वाला त्याला 'काय केलंस म्हणून तुरुंगात आलास' विचारत असतो.आपण नै का, शेजारी कोणी राहायला आलं की 'मूळचे कुठचे, इथे बदली झाली का, अमक्या गावचे का, शिवाजी पेठेशेजारी वाडा आहे त्या अमक्या काकांना ओळखत असाल' वगैरे हिस्टरी दारातच घेतो तसे.इथे आपला नायक सिवाजी 'लोगोका भला किया इसलीये जेल हुई' सांगतो.

विषय: 

विषय क्र. २ - 'ऑ-ईगो'

Submitted by हायझेनबर्ग on 2 July, 2014 - 00:21

मी एक पाय जमिनीवर असलेला नरपुंगव आहे आणि माझी व्यक्तीपुजा करणार्‍या कोट्यावधी जनांचा मी धिक्कार करतो. मी नेहमी प्रसिद्धीपरांग्मुख राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो कारण प्रसिद्धी म्हणजे प्रगतीपथातला अडथळा असे माझे स्पष्टं मत आहे. स्वस्तुती हे तर महापाप, म्हणून तिचा नेहमीच अव्हेर करीत एक शीलवान, नम्र आणि चोवीस कला अवगत असणारा सर्वगुणसंपन्न व्यक्ती बनण्याचा माझा निर्धार आहे, व त्यासाठी मी कसोशीने यत्न करीत असतो.

शब्दखुणा: 

डास आहे...

Submitted by ऋयाम on 26 May, 2012 - 12:44

अंतरीच्या गूढ गर्भी, रोज एकच त्रास आहे
सुज अंगी दाटलेली, मूळ त्याचे डास आहे.

व्यर्थ चकल्या, व्यर्थ पेस्टा, व्यर्थ सारे रे फवारे,
लोशनाचे करुन प्राशन, झिंगलेला डास आहे.

बंद खिडक्या बंद दारे, पाचवरती फॅन आहे,
मनमनीच्या कोपर्‍याती, फक्त त्याचा वास आहे.

रानटी अन पाळलेला क्रॉस देखील डास आहे
रंक अथवा राव कोणी, सात होता डास आहे.

सर्व थकले मार्ग आता, फार झाला त्रास आहे,
तोचि रजनी कांत अपुला, फक्त त्याचीच आस आहे ...

* रोबॉट फेम रजनीकांताची माफी मागून..

Subscribe to RSS - रजनीकांत