सुट्टीतील उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स
लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.
सुट्टीतील उद्योग "प्राणी"
आता पर्यंत आपलं गाव वसलं, त्याला फेयरी गॉडमदरही मिळाली. आता पाळी प्राण्यांची
चला तर मग बनवुया रिळा पासून मजेदार प्राणी.
साहित्य :
आता कार्डपेपरवर रिळापेक्षा थोडे मोठे असे दोन गोल व पायाच्या दोन जोड्या काढुन घ्या.
आता ह्यापैकी एका गोलात प्राण्याचे तोंड काढा व उरलेल्या जागेत शेपटी काढून ठेवा.
सुट्टीतील उद्योग "परी"
गेल्या उद्योगात आपण गाव वसवला पण त्या गावाला "फेअरी गॉडमदरची" फार गरज आहे म्हणुनच आजचा आपला उद्योग आहे "परी" बनवण्याचा
साहित्य :
चला आता कामाला सुरुवात करुया. प्रथम आईसक्रिमच्या चमच्यावर नाक, डोळे, तोंड काढून घ्या.
आता एका कागदावर दोन-तीन हेअर स्टाइल्स काढून कापून ठेवा. (काळा घोटीव पेपर देखील वापरु शकता)
सुट्टीतील उद्योग "घर"
शाळेला सुट्टी पडून दोन दिवस नाही झाले तोपर्यंत "आई आता काय करू?" हा प्रश्न दिवसातुन हजारवेळा विचारुन, लेकीने माझा जीव नकोसा करुन सोडला. हिला कशात गुंतवता येईल याचा विचार करताना मला ज्योत्स्ना प्रकाशनचे "आर्ट अॅन्ड क्राफ्ट" पुस्तक हाती लागलं. त्यात दिलेल्या वस्तू तिच्या वयाच्या (आठ वर्ष) मुलांना सहज जमण्याजोग्या वाटल्या म्हणुन प्रयत्न करुन पाहीला. हे घर करताना तिला इतकी मजा आली की तिने घरं बनवण्याचा सपाटाच लावला आणि मला थोडा मोकळा वेळ मिळाला.