धगधगता अंगार होता
अतुलनीय वीर होता
वाघासारखा शूर होता
*****संभाजीराजा
जेवढा हळवा कवी होता
तेवढाच कणखर बाणा होता
रणांगणी धधडणारा वणवा होता
***** संभाजीराजा
धर्माचा अभिमानी होता
मराठा असण्याचा गर्व होता
शूर सिंहाचा छावा होता
***** संभाजीराजा
मातृपितृ भक्त होता
भवानीमातेचा दास होता
स्वराज्याचा प्राण होता
***** संभाजीराजा
राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर
आज धर्मवीर शंभूराजांची पुण्यतिथी आहे. म्हणून काही महिन्यापूर्वी टाकलेली कविता पुन्हा टाकली आहे.
रूप सावळे सुंदर मनोहर |
भक्तांसाठी उभे असे विटेवर |
नासाग्री दृष्टी, हात कटेवर |
गळा शोभतसे तुळशीचा हार|
कपाळी केशरी गंधाचा टिळा|
छातीवरी रुळे वैजयंतीमाला |
कासे शोभतसे पिवळे पितांबर |
किती वर्णू रूप सुंदर...सुंदर....|
निरंजन व रामा या दोघांनीही पुढे होऊन त्यांना नमस्कार केला.त्या तपस्वींनी 'आयुष्यमान भव' म्हणून आशीर्वाद दिला व म्हणाले -आज अकरा वर्षे झाली. दर चैत्र महिन्यात मी इथे वास्तव्यास येत असतो. अतिशय सुंदर, शांत असणारे हे ठिकाण माझे आवडते आहे. परंतु या परिसरातील कोणालाही याजागेबाबत माहिती नाही. तुम्ही कसे पोचला या ठिकाणी .
महाराज, निरंजन नम्रपणे म्हणाला -आम्ही आमची गाय शोधत होतो तेवढ्यात एक ससा दिसला त्याचा पाठलाग करताना आम्हाला या गुहेचा तपास लागला आणि तुमचे दर्शन झाले.आपण कोण आहात कृपा करून सांगाल काय?
मला वाटले एकदा, आपणही करावी कविता |
कोण जाणे हे कवी, कश्या करतात कविता |
बहु केली चिरफाड, शब्दांची |
तरी कविता होईना, चार ओळींची |
एक एक अक्षर,जुळवताना |
करत होतो कसरती नाना |
शब्द जुळवताना, अर्थ काही साधेना |
अर्थ साधला तर, शब्द काही जुळेना |
ओळींमागे ओळ, लिहित होतो |
वाचल्यानंतर लगेच खोडीत होतो |
(मग माझ्या लक्ष्यात आले )
कविता ह्या ओढून ताढून, करायच्या नसतात |
त्यातर अंतस्फूर्तीने, आपोआपच उमटतात |