मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे
आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.
लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे.