खरे....खोटे......
Submitted by पुरंदरे शशांक on 25 November, 2011 - 01:49
खरे....खोटे......
दाणापाणी संपे येथील, नवीन शोधा चला उठा
कोण इशारे करतो आतुन, धुंडायाच्या नव्या दिशा
दिवसामागून येती राती, वर्षामागून वर्ष सरे
किती समय तो रमलो येथे, निघणे आता हेचि खरे
मित्र मिळाले केल्या गोष्टी, सुखदु:खाच्या त्यांसंगे
भावुक मन ते आत हुरहुरे, भेट पुन्हा योगायोगे
सळसळणारा प्रवाह हा तर, जीवनसरिता नाव खरे
थांबायाचे नाव न येथे, वाहत वाहत तरायचे
गढूळ डबकी नकोच काही, कुजून नाही पडायचे
"चला पुढे" या जीवनमंत्रा, मनापासुनी जपायचे
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा