'एक मी अन् एक तो' - गप्पा कवी वैभव जोशी यांच्याशी
या आठवड्यात बॉस्टनला होणार्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात कवी किशोर कदम उर्फ सौमित्र आणि वैभव जोशी यांची काव्यमैफल सजणार आहे. या मैफिलीत आपल्या सुरांनी बहार आणणार आहेत प्रख्यात गायक दत्तप्रसाद रानडे.
वैभव जोशी यांच्या कविता हा खरंतर न संपणारा विषयच. बोरकर, सुरेश भट इत्यादी पूर्वसुरींचे ऋण जोशी स्वतः मान्य करतात, पण त्याचवेळी या सर्वांपेक्षा भिन्न अशी स्वतःची कविता त्यांनी प्रस्थापित केली आहे. 'तुम्हांला कविता कशा सुचतात?' या कवीला विचारल्या जाणार्या हमखास प्रश्नाचं उत्तर त्यांनी काव्यरूपातच दिलं आहे -
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी