नवरात्री

नवरात्री अन आम्ही

Submitted by VB on 9 October, 2018 - 01:02

गणपती आले की जणू सणांची लाटच येते. सगळेच सण खूप आंनद देणारे, आपल्या रटाळ आयुष्यात थोडी प्रसन्नता आणणारे असतात असे मला वाटते. अगदी गरीब - श्रीमंत, दुःखी - सुखी सगळ्या सगाळ्यांसाठी खास असतात. उद्यापासून नवरात्री चालू होतील. जसे मी म्हटले की सगळेच सण खास असतात, पण गेल्या काही वर्षांपासून नवरात्री माझ्यासाठी जास्त जवळची झालीये. खरेतर नुसत्या माझ्यासाठी नाही तर आम्हा सर्वांसाठी.

विषय: 
शब्दखुणा: 

नवरात्रीचे नऊ रंग कसे आले?

Submitted by सोनू. on 22 September, 2017 - 05:05

नवरात्र आली की मुंबईत नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.

पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही असं माझ्या ओळखीत तरी दिसलं.

विषय: 

पेंटब्रश - नवरात्री स्पेशल

Submitted by दिनेश. on 30 September, 2011 - 10:34

आमच्याकडे म्हणजे नैरोबीला सध्या नवरात्री आणि गरबा यांनी भारलेले दिवस आहेत.
मी ओमान, नायजेरिया आणि केनया या तिन्ही देशातले उत्सव बघितले आहेत. भारतातले काही वर्षे प्रत्यक्ष आणि काही वर्षे टीव्हीवर बघितले.

एक मुख्य फरक जाणवतो तो की या देशांतील लोकांनी परंपरा प्राणपणाने जपलीय. पेहराव, संगीत, गाणी या सगळ्यावर परंपरेचा मोठा पगडा आहे (ओमानमधे काही वर्षे फाल्गुनी पाठक यायची पण ती पितृपक्षात !)

इथे दिसणारे काहि पेहराव पेंटब्रशमधे. आता मी फाँट्स फार कमी वापरलेत.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नवरात्री