पेंटब्रश - नवरात्री स्पेशल

Submitted by दिनेश. on 30 September, 2011 - 10:34

आमच्याकडे म्हणजे नैरोबीला सध्या नवरात्री आणि गरबा यांनी भारलेले दिवस आहेत.
मी ओमान, नायजेरिया आणि केनया या तिन्ही देशातले उत्सव बघितले आहेत. भारतातले काही वर्षे प्रत्यक्ष आणि काही वर्षे टीव्हीवर बघितले.

एक मुख्य फरक जाणवतो तो की या देशांतील लोकांनी परंपरा प्राणपणाने जपलीय. पेहराव, संगीत, गाणी या सगळ्यावर परंपरेचा मोठा पगडा आहे (ओमानमधे काही वर्षे फाल्गुनी पाठक यायची पण ती पितृपक्षात !)

इथे दिसणारे काहि पेहराव पेंटब्रशमधे. आता मी फाँट्स फार कमी वापरलेत.
(आता मी अति करणार नाही, म्हणून ही मालिका इथेच थांबवतो. पण हे करताना मला मात्र खुप आनंद होतो. त्यामूळे नवीन काहितरी चाळा मिळेपर्यंत मी हे करतच राहणार आहे.)

1

2

3

4

5

6

7

8

गुलमोहर: 

वा दिनेशदा! छानच आहे. आणि मालिका थांबवता का? आम्हाला असले काही चित्र वगैरे काढता येत नसली तरी बघायला नक्कीच आवडते.

शेवटची अगदी खास .तुमच्या नवनवीन कलाकृती बघायला नक्कीच सर्वाना आवडेल .हा उपक्रम दिवसेंदिवस बहरावा ही शुभेच्छा.

दिनेशदा, मला ४ व ८ पाहिजे. सर्वच सुंदर आहेत. तुम्ही हे क्षेत्रही पादाक्रांत केलत. Proud
आणि ही मालिका थांबवायची वगैरे नाही हां. Angry Lol
प्रज्ञाला १००० मोदक. Happy

भाऊ, बेफि.. आयाम बगैरे काही नाही हो. तंत्रावर हात बसला इतकेच.
सगळ्यांना एवढ्या आवडल्या तर या सगळ्यांमागची प्रेरणास्थाने सांगायलाच हवीत.
१) भाऊंची चित्रे. ते रंग वापरत नव्हते तरी मला त्यातून रंगाचा भास व्हायचा.
२) वर्षूने तिथे शालींचे प्रदर्शन भरवले होते. त्याचे फोटो तिने मला पाठवले होते. ती फाईल मी चुकून पिकासाच्या ऐवजी पेंटब्रशमधे उघडली. त्यावेळी सहज एक ब्रशचा फराटा मारला गेला. तिथून हि कल्पना सुचली.
३) पुर्वी दिवाळी जवळ आली कि मला साड्या खरेदी करायचा उत्साह यायचा. आई, वहिनी आणि बहिण यांच्यासाठी अगदी निवडून एस्क्ल्यूझिव्ह साड्या घ्यायचो. आता ते दिवस आठवले.