गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा - दर्शन २०१५ (माझगाव, वाशी)

Submitted by तुमचा अभिषेक on 20 September, 2015 - 18:03

गेले ते दिवस !
मित्रांबरोबर आधी माझगाव-भायखळा करत मग लालबाग-परळ विभागातील एकूण एक गणपतींचे संध्याकाळपासून पहाटेपर्यंत दर्शन घेत फिरणे. सोबत वडापाव, भाजीपाव, चहा आणि कांदाभजी हा ठरलेलाच मेनू, आणि त्यासाठी ठरलेलेच फिक्सड कॉन्ट्रीब्यूशन. साली महागाई पण कधी त्या दिवसांत झाल्याचे आठवत नाही. दोन रुपयांचा वडापाव कित्येक वर्षे दोन रुपयांनाच मिळायचा.

सारेच बदलले!
सण साजरी करायची रीतभातही आणि भक्तांची दर्शन घ्यायची पद्धतही.
आता रांगा फक्त नवसाच्या गणपतीलाच लागतात.

असो, आपल्याला काय!

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

Submitted by Sanjeev.B on 12 September, 2011 - 01:37

|| श्री ||

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

काल गणरायांना निरोप दिले. ढोल ताशांच्या गजरात, डी जे म्युझिक च्या जल्लोषात. झिंगणे म्हणजे काय असतं ते पाहिलं अन देह भान हरपणं म्हणजे काय असतं ते अनुभवलं. बाळ गोपाळांपासुन ते वयोवृध्द आजी अजोबां पर्यंत, सर्वंच गणेश भक्ती मधे लीन झालेले, ना पावसाची तमा न आपल्या वयाचे, प्रत्येक गल्लीत जेव्हा गणरायांचे आगमन होत होते तेव्हा भाविक गणरायांच्या चरणी लीन होत. मना मधे एव्हढा उत्साह होता कि दुपारी घरी जेवायला गेलो होतो, जेवुन झालं कि परत मिरवणुकीत समील झालो.

गुलमोहर: 

बाप्पा आणि मी...

Submitted by छोटी on 6 September, 2011 - 04:37

"मोरया मोरया आम्ही बाल तान्हे ,
तुझीच सेवा करू काय जाने,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वर बा तू घाल पोटी "

गुलमोहर: 
Subscribe to RSS - गणपती बाप्पा मोरया