बाप्पा आणि मी...

Submitted by छोटी on 6 September, 2011 - 04:37

"मोरया मोरया आम्ही बाल तान्हे ,
तुझीच सेवा करू काय जाने,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वर बा तू घाल पोटी "

अख्या महाराष्ट्राच्या लाडक्या देवतेचं आगमन झालं आहे.खूप प्रसन्न वातावरण आहे सगळीकडे, मला खूप आवडत हे वातावरण,उत्साह ओसंडून जात असतो सगळीकडे.सगळे खूप खुश असतात.आताच अण्णांच उपोषण संपल भ्रष्टाचारा विरुद्ध पहिलं पाऊल यशस्वी झालं.आम्ही सगळे खूप खुश आहोत.एकीकडे भ्रष्टाचार तर दुसरीकडे अतिरेकी हल्याची चिंता तरी सुद्धा सगळीकडे मात्र गणेशाच्या आगमनाची तैयारी मधला जोश कमी नाही झाला आहे .सगळीकडे एक मंगलमय वातावरण झालं आहे.
गणपतीच्या निमिताने खूप गोष्टी मनात पिंगा घालत आहेत,कुठून सुरु करू कळत नाही.तरी सुद्धा सुरुवात करते,गणेशोत्सव म्हटलं ना कि पहिलं मनात येत ते शालिमारला असलेल B D BHALEKAR मैदान जिथे मोठे मोठे देखावे असतात महिन्द्रा अन्ड महिन्द्रा, मायको,VIP आणि अजून अनेक कंपन्याचे देखावे असतात.ते बघायचे,पप्पा आम्हाला घेऊन जायचे,ते देखावे बघायला,त्यानंतर इतर गणपती बघायला फिरायचं.त्यादिवशी पप्पा खुश असायचे,आम्हाला officially भेल खायला मिळायची(उघड्यावरच वारंवार खालल्याने पोट खराब होत,त्यामुळे पप्पा भेल वगैरे खाऊ द्याचे नाही लहानपणी...).आमच्या घरी गणपती नसायचा नासिकला,गणपती कोकणात असायचा गावाला.खूप इच्छा होती माझी गणपती आपल्या घरी याव.गणपतीमध्ये सगळ्याकडे आरतीला जायचं हा तर आमच्या मित्र मैत्रिणीचा एकदम आवडता उद्योग आणि नंतर गणपती बाप्पा माझ्यामर्जी प्रमाणे आला तो बाल गणेश मित्र मंडळाच्या रुपात... मज्जा यायची वर्गणी गोळा करणे,जागा शोधायची,गणपती स्थापना, आरती, प्रसाद सगळाच खूप अविस्मरणीय होत सगळ....गणपती म्हणजे मज्जा वाटायची.
गणपती म्हणजे माझा जीव कि प्राण आहे.आमच्या जगप्रसिद्ध संकटमोचन गणेश मंदिरच दर्शन घेतलं म्हणजे दिवस चांगला जाणारच (काय म्हणत कधी ऐकल नाही नाव... जाऊ दे.. आता तर कळल ना.... भारी आहे आमच मंदिर.या कधी नासिक ला दाखवेन )अश्या माझ्या गणपती बाप्पावर मी खूप रागावली होती.त्याच अस झाल होत,12विची परीक्षा झाली.निकाल लागला होता(म्हणजे एकदम वाईट परिस्थिती नव्हती.कधी कधी करते मी अभ्यास.) form भरले.पण सगळे admission बंद.admission centrally द्याचे कि वेगवेगळ्या clg च्या वेगवेगळे पेपर घ्याचे आणि admission द्याचे ह्या वर निर्णय होत नव्हता .खूप कंटाळा येत होता घरी.त्यात जर घरी कोणी आलं कि विचारच"का हो,तुमची मुलगी बारावीला होती काय झाल तीच?" आई मग निकाल सांगायची,”हो का मग कुठे admission घेतले का तिने?””नाही हो अजून नाही admission झाला.“ आणि परत टेप चालू व्हायची खूप चीड चीड होत होती दिवसेदिवस.एक दिवस खूप राग आला होता,ह्या रागाच्या भरात संकटमोचन गणपतीला सांगितलं नाही येणार तुझ्या दर्शनाला(कधी नव्हे तो मी एवढा अभ्यास केला होता बारावीला).काय चुकल माझ?,मी अभ्यास नसता केला आणि माझ्या बरोबर अस झाल असत तर मला इतक वाईट वाटलं नसत,मी स्वत:ला समजावलं असता प्रयत्न केला नाही,पण हे अस नाही सहन होत,येणारच नाही तुझ्या मंदिरात.खूप राग होता मनात.पप्पा आणि आईने मला खूप समजवल...पप्पा मला बोलले“बेटा ,ह्या सर्व जगाचा कर्ता करविता तो आहे... त्याला सगळ माहिती असत,त्याच्या वर विश्वास ठेव अस रागावू नये,धीर धर.”पप्पाच ऐकून तर घेतलं मी,पण माझा राग काही गेला नाही .. हळूहळू प्रवेश प्रक्रिया ची परिस्थिती निवळली,admission चालू झाले पण medical च्या पहिल्या दोन लिस्ट मध्ये माझ नाव नाही आल .B farm च्या लिस्ट मध्ये एका number वरून माझ admisiion गेलं... मला पप्पा नि Bsc admission घायला लावला... “पप्पा,काही झालं तरी मी BSC करणार नाही" असा माझ ठाम निश्चय होता... तरी देखील पप्पा नी form आणून दिला मी तो भरला नाही.. आमच्या एका फमिली frd च्या ओळखीने पप्पानी प्रयत्न केले माझ्या B sc admission साठी मी पण नाही म्हणजे नाही गेली... आणि एका बाजूला माझ्या डोक्यात मात्र बाप्पा वरचा राग अजून अजून वाढत होता,प्रत्येक गोष्ट तो माझ्या मनाविरुद्ध करत होता... काहीच मनासारखण होत नाही ....
त्यात भर म्हणजे पप्पाच्या एका मित्राच्या मुलाने दूर SVMEC नावाच्या अभियांत्रिकी विद्यालयात प्रवेश घेतला.त्यांनी माझ्या पप्पांना समजावलं कि "Engg is very good career option”.पप्पानी पण विचार केला 'परत एक वर्ष गप घेऊन अभ्यास करून परत CET देईन म्हणते आहे.ह्याच वर्षी हे हाल होता आहेत पुढच्या वर्षीच काय सांगाव'. त्यापेक्षा enggला admission करून द्याव मग पप्पा नी आईला सांगितलं कि उद्या SVMEC ला जाऊन हीच admission करून तक म्हणून.. मला त्याचं हे ऐकावा लागल.मला गणपती बाप्पाचा अजून राग आला,अस कस करता आहेत ते?”.पण admission झालं(त्या दिवशी clg मध्ये एका मुलाला मी ओझरत बघितल आणि नंतर विसरून पण गेली).college चालू झालं .त्यानंतरच्या वर्षी गणपतीसाठी पप्पा आणि आई गावी गेले होते.मी,मधली बहिण आणि भाऊ आम्ही तिघेच घरी होतो.गणपतीच्या दिवशी भावाची तबियत थोडी खराब होती त्यामुळे दीदी त्याच्या बरोबर थांबणार होती.त्यामुळे प्रसाद घेऊन मला मंदिरात जावं लागलं,माझी इच्छा नव्हती तरी मी गेली.मला बघून गणपती बाप्पा गालातल्या गालात हसत होते,माझा राग अजून वाढला, मी त्यांना जाब विचारला,ते फक्त हसत राहिले..... असाच प्रसाद लावून मी परत आली काही कळत नव्हत,बाप्पा का हसत होते ते.first year आमच्या col मधल्या,आमच्या batch चे फक्त 7 लोक all clear होते, मी त्यात होती.. कारण मी मंगेश पाडगावकर च्या एका कवितेवर माझा खूप विश्वास ”सांगा कस जगायचं ,कण्हत कण्हत कि गाण म्हणत”आणि मी नेहमी दुसरा मार्ग घेते, जे करायचं ते पूर्ण करायचच ,असच दुसर्ण वर्ष गेलं,राग थोडा कमी झाला होता,बाप्पावरचा पण अजून अहि मंदिरात जायला मनन ऐकत नव्हते.तिसर्या वर्षाला असताना मला माझा जीवनसाथी भेटला (हा तोच मुलगा होता जो मी admission घ्याला गेली तेव्हा मी पहिला होता) आणि मला त्या दिवशी मला विचार केल्यावर कळाल तो “माझ्या बाप्पाचा प्लान माझ्यासाठी ” J “बाप्पा तू G8 आहेस जर admission ला उशीर झाला नसता किंवा मला medical,b farma ला admission भेटलं असत तर... बाप्पाला, मला आणि अभी ला भेटवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असते.मला माझा जीव,माझ आयुष्याच भेटलं नसत .. बाप्पा तू g8 आहेस... खरच g8 आहेस,काय बोलू रे बाप्पा?” मोरया रे ,तुला सुखकर्ता,दुखहर्ता का म्हणतात ना ते कळल प्रत्येक गोष्ट हि चांगल्यासाठच होते,आपण आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे बाकीच सांभाळायला बाप्पा आहेतच कि.... बाप्पाचा सगळ्यासाठी एक प्लान असतो.खरच जे माणसाला खरच हव असत ना तेच मिळत...कर्ता करविता तूच रे आम्ही निमिष मात्र... बाप्पा ने नुसता माझा जीव मला नाही दिला तर मला दिले खूप सारे मित्र मैत्रिणी,मला जीवापाड जपणाऱ्या,माझा बालीशपणा सहन करणारे,मला दिला खूप सारा आनद,माझे अविस्मरणीय दिवस(in SVMEC,लोणीचे program,gathering days.... all guys and girls and teacher i miss u)
त्या दिवशी मी गेली बाप्पाकडे.. तो जणू काही मला विचारात होता “कुठे गेली प्रतिज्ञा.. अग,तू काय नाही येणार मंदिरात?मलाच तुला भेटायचं नव्हता,परीक्षा घ्याची होती तुझी,बघायचं होत, किती आहे तुझा तुझ्या मनावर संयम?.आणि तू पास झाली परीक्षा.हा संयम पुढे नक्की तुझ्या कामाला येईल.अजून खूप परीक्षांना तोंड द्याच आहे आणि जेव्हा वाटलं भेटायचं,तेव्हा आली होतीस ना....भेटली ना उत्तर सगळी ?अजून काही हव आहे का... “हो बाप्पा,हवा आहेस ना तू,हवा आहेस माझ्या बरोबर नेहमी नेहमीसाठी,तुझी सेवा करायची आहे .बाप्पा,मी नासिकमध्ये किती दिवस असणार नाही माहिती रे?जर बाहेर गेली तर तिथे कुठे भेटू?.” “जिथे जाणार आहेस ना,तिथे आपली भेट नक्की आहे.नको घाबरू मी असेन तुझ्या घरी.तू नाही म्हणाली तरी आणि हो म्हणाली तरी.तुला मी आता तरी बुद्धी देतो चालेल ना(बाप्पा बरोबर आपल्याला खरच काय हव ते देतो आणि वेळेवर सगळ मिळत )...”
Third year ani fourth year was awesome ,खूप मस्ती,छानपैकी अभ्यास केला third yearला,मी computerमध्ये 2nd rank वर होती आणि last year ला मी first rank वर होती.बाप्पा खरच तू होतास माझ्याबरोबर,त्यापुढे कधीही काहीही संकट आल तर,मी त्याला बाप्पाचा नवीन प्लान म्हणून सामोरी जाते.खर म्हणजे बाप्पा,एक +ve energy आहे .+ve energy जिथे आहे ना तिथे बाप्पा आहे.बाप्पा म्हणजेच शनी भगवान,बाप्पा म्हणजे गणपती,बाप्पा म्हणजे काली माता....तुम्ही पूजा कोणाचीही करा पण श्रद्धा (plz श्रद्धा आणि पूजा कोण असे फालतू प्रश्न विचारू नका) असू द्या...THAT ENERGY WILL DRIVE U TILL END...
मग बोला माझ्या बरोबर गणपती बाप्पा.....मोरया$$$..
(ताजा कलम: अरे हो सांगायचा राहील, बाप्पानी सांगितल्याप्रमाणे, बाप्पा मला इथे भेटले ना... त्या बाप्पाच्या ठिकाणी जायला मी नेहमी तैयार असते. माझ श्रद्धास्थान थेऊर... चिंतामणी.... खरच चिंतामणी आहे तिथे, मूर्ती बघून अर्ध tension जात,बाकी tension दूर करायची शक्ती तो देतो...+ve energy... Be +ve ....आणि ह्या वर्षी तर बाप्पा ने मला त्याची सेवा करायला पण दिली आहे.माझ्या सासरी गणपती १० दिवसाचे असतात ,गौरी पण असतात.)
बाप्पा जेवढी जमेल तेवढी सेवा मी करेन..अशीच सेवा करायची संधी द्या आणि माझ्या बरोबर रहा.

गुलमोहर: 

खूप प्रामाणिक लिहिलयंत.......... आवडलं..........

>>>>>>>>>माझ श्रद्धास्थान थेऊर... चिंतामणी.... खरच चिंतामणी आहे तिथे, मूर्ती बघून अर्ध tension जात,बाकी tension दूर करायची शक्ती तो>>>>>>>>> माझं ही.....
चिंतामणी बाप्पाकडे पहात बसलं तेथे मंदिरात कीच सगळी tensions छूमंतर होतात........ Happy

गणपती बाप्पा मोरया........
बाप्पाचा आशिर्वाद असाच आपल्या सर्वांना मिळत राहो.......... आपल्या हातून त्याची सेवा घडत राहो......... Happy