नाव - अनन्या
वय - ७ वर्षे
माझी मदत - तीच्या बरोबर कार्टून्स पहाणे
आवडते कार्टून कॅरॅक्टर अर्थातच "जेरी" कारण तो पण अनन्यासारखाच आहे "चीजखाव"
साहित्यः
WORK IN PROGRESS!!
जवळपास अर्ध्या पाऊण तासा नंतर हा आमचा जेरी तयार.
नाव - लारा
वय - ८ वर्षे ११ महिने
माझी मदत - हॅमलीज मध्ये घेऊन जाणे. हे अधूनमधून करावेच लागते. त्यामुळे मूळ साहित्य आधीच कधीतरी येऊन पडले होते. हे साहित्य म्हणजे 'Bendaroos' नावाच्या लवचिक पातळ काड्या आहेत - काहीशा मेणचट अशा. त्यामुळे त्या एकमेकींना चिकटतात. त्यांच्याच पत्रकात दाखवल्याप्रमाणे मत्स्यकन्या तयार केली आहे. आणि 'The Little Mermaid' या आवडत्या चित्रपटातली Ariel ती हीच असा साक्षात्कार झाल्याने तीच आता एरीयेल आहे.
ही एरीयेल :
नाव - मिहिका
वय - ७ वर्षे
आमची मदत - टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहू देणे.
लहानपणापासूनच मिहिकाला 'नॉडी' हे कार्टून कॅरेक्टर फार आवडते. तिच्याकडे 'नॉडी'चा एक मोठ्ठा बाहूलापण आहे. त्यामुळे, त्याचे चित्र काढायला ती उत्साहाने तयार झाली. लगेच ड्रॉइंगबुक, पेन्सील, कलर्स कपाटातून बाहेर आले.
कच्चा माल
मग चित्र काढायला सुरुवात केली.
नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर
नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.
माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.
चित्र काढायला सुरवात.
चिकटवा-चिकटवी करताना.
घराचे नामकरण ही झालं.
नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.
सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.
चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.
नाव - प्रांजल.
वय - ४.५ वर्ष.
चित्रकला हे आमचे आवडते क्षेत्र आणि घर,दिदि,इंद्रधनुष्य हे खास विषय.
१. जय्यत तयारि.
२. जोरदार सुरुवात.
'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.
पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.
पूर्वतयारी-
कार्यक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.
सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार
दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.
विषय :
माझे आवडते घर (यात स्वतःच्या आवडीच्या घराची कलाकृती अपेक्षित आहे. उदा. स्वतःचे घर/ इग्लू/ स्ट्रॉपासून केलेली घराची कलाकृती/ इमारत/ झोपडी इत्यादी, माध्यम आपल्या आवडीचे.)
नियम पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.
सांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार
दिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.
विषय :
माझे आवडते कार्टून कॅरॅक्टर/ आवडती व्यक्तिरेखा (ऐतिहासिक/ सामाजिक इ. व्यक्तिरेखा किंवा घरातील/ कुटुंबातील/ शाळेतील व्यक्ती.)
****************************************************