कैच्याकै

माझी कंपुबाजी

Submitted by प्रगो on 13 March, 2013 - 09:02

रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .

तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ... आमची कंपुबाजी ...

१) आमचा कंपु :

शब्दखुणा: 

नुसता [(तरीही) पझल]

Submitted by मंदार-जोशी on 9 August, 2011 - 07:53

झोप लागे ज्यावर तो पलंग द्याना
का देत मजला तो खाट नुसता?

जाहली ढेकणे तयावरी उदंड
चावणे तयांचे हा त्रास नुसता

मारण्या तयांना बेगॉन मारले
भयानक तयाचा येई वास नुसता

सूक्ष्मजीव ते येती कष्टानेच हाती
तोपर्यंत गादीत आपुला नाच नुसता

होत सुटका शेवटी रामप्रहरी जरी
भूक त्यांची मिटे आपुला भास नुसता

का दिली तरही ही तुम्ही मला
ही रचना गझल? हा पझल नुसता.

Subscribe to RSS - कैच्याकै