रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .
तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ... आमची कंपुबाजी ...
१) आमचा कंपु :
हे आमच्या फेसबुक वरील कंपुचे चित्र . प्रत्येक "नोड" हा एक व्यक्ती आहे अन ज्या ज्या व्यक्ती एकमेकांना ओळखतात त्या त्या "एज" ने जोडलेल्या आहेत . काही क्षण म्यॅट्रीक्ष पिक्चर मधे आलाचा भास होतोय का कुणाला ...
ह्या चित्रात गुलाबी नोड्स आहेत त्या फीमेल्स अन हिरवे नोड्स आहेत ते मेल्स . ( खरे काय कोण जाणे )
कम्युनिटी डिटेक्शन ला मराठीत काय म्हणता येईल बुवा ? ते असों . तर ह्या चित्रां मधे आमच्या कंपुतील उपकंपुंचे संशोधन केले आहे .उदा. हिरवा कंपु शाळेतला , निळा कंपु ब्लॉगवरचा जांभळा( लव्हेंडर का काय ते ) कंपु आयेसाय मधला वगैरे वगैरे . ( आता ह्यातली गिरीजा कोण ओळखा पाहु )
आता येतुन पुढील चित्रांचे स्पष्टीकरण नॉन टेक्निकल व्यक्तीला देण्यास मी असमर्थ आहे. तेव्हा ती केवळ चित्रकला म्हणुन गोड मानुन घ्यावी .
अशा रीतीने फेसबुकवरील तुंबड्या माबोला लावणे सफळ संपुर्ण ||
अवांतर : विशेष आभार
१) https://gephi.org/
२) https://apps.facebook.com/netvizz/
३) https://www.coursera.org/course/sna
आहा ...आता दिसायला लागली
आहा ...आता दिसायला लागली चित्रे !!
ईन्टरेस्टींग!!! खरच लिहा
ईन्टरेस्टींग!!!
खरच लिहा नक्की काय आहे ते.
धन्यवाद नीलू!! हे सोशल
धन्यवाद नीलू!!
हे सोशल नेटवर्क अॅनालिसिस आहे ...अर्थात माझ्या फेसबुक वरील डेटाचे अॅनालिसीस
२) माझ्या एकुणच नेटवर्क चे चित्र
प्रत्येक डॉट(नोड) हा माझा फेन्ड आहे आणि जे एक मेकांचे म्युच्युअल फेन्ड आहेत ते "एज" ने जोडलेले आहेत
१) ह्या चित्रात स्री पुरुष असे बायफर्केशन केले आहे .
३) हे खर्या अर्थाने महत्वाचे चित्र : ह्या चित्रावरुन कळते की माझ्या ओळखीं मधे ५ मेन ग्रुप आहेत . प्रत्येक २ ग्रुप मधे सामायिक असा एक मित्र आहे .( चित्राच्या मध्यात असलेला नोड माझ्या सर्व ग्रुपना ओळखतो ह्याचा अर्थ तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ! )
शेवटच्या चित्रा मध्ये माझ्या मित्रांना मिळालेल्या लाईक्स वरुन रंगवलेले आहे ...
=======================================================
आता विचार करा , हा झाला फक्त माझ्या एकट्याचा डेटा , झकरबर्ग कडे असा ५०० मिलीयन लोकांचा असा डेटा आहे तो वापरुन काय काय बीझीनेस करता येईल जस्ट इमॅजिन .... Facebook has got a FUTURE indeed !!!
मस्तच आहे खुप खुप आवडले आणि
मस्तच आहे खुप खुप आवडले आणि खरच ईन्टरेस्टींग आहे.
पाहताना मस्त वाटते.
विज्ञानातील (केमिस्ट्री वै)
विज्ञानातील (केमिस्ट्री वै) चित्रं आठवली.
गिर्जे, मस्तच आहेत
गिर्जे, मस्तच आहेत चित्रं.
विस्तार वाचला नाही अजून. नंतर वाचेन. चित्रं मात्रं फार्फार आवडली.
cool- मस्तच!
cool-
मस्तच!
गिरीजा भारीच !! पण ही
गिरीजा भारीच !! पण ही मिळवली कशी.. काही अॅप आहे का यासाठी?
याला नाव देता येईल ना.... मित्रमैत्रिणींची गुंतावळ
काय कला आहे तुमच्याकडे. वा
काय कला आहे तुमच्याकडे. वा वा. संतोष झाला. अजून येऊद्यात.
तिलकधारी टाळ्या वाजवत आहे.
मस्तच आहेत
मस्तच आहेत चित्रं................
मस्त दिसताहेत. कल्पना अतिशयच
मस्त दिसताहेत. कल्पना अतिशयच आवडली. हे नक्की कसं करता येतं ते कळून घ्यायला आवडेल पण शिक्रेट बिक्रेट असेल तर राहूद्यात.
मागे, आपल्या डीएनएची चित्रं काढून बैठकीच्या खोलीत लावण्याची टूम निघाली होती आता फेबुअॅनॅलिसीस चा जमाना आलाय वाटतं. चांगलंय! पण फेसबुकवर भरपूर गर्दी असेल तर घरी येऊन चित्रं बघणारी लोकं कमी असतील का? याचाही एक अॅनॅलॅसिस व्हायला हवा.
मामी गिरिजा, लयच भारी.....
मामी
गिरिजा, लयच भारी.....
सिक्रेट कसलं आलय ? हे पहा
सिक्रेट कसलं आलय ?
हे पहा ...सगंळं फ्री च आहे ...( "फुकट ते पौष्टिक " हा आमच्या अनेक मोटों पैकी एक आहे )
हे ते सॉफ्टवेयरः
https://gephi.org/
अन हा त्याचा कोर्स
https://www.coursera.org/course/sna
(अवांतर : फेसबुकप्रमाणे मायबोलीदेखील एक सोशल नेटवर्किंग साईट असल्याने असा डेटा इथेही असणार अॅडमीन कडे ... त्याचा ही वापर अॅडव्हर्टायझिंग प्रायॉरटाझेशन साठी नक्कीच होत असला पाहिजे / करता येईल ! )
हायला ही खरंच चित्रे आहेत?
हायला ही खरंच चित्रे आहेत? फारच सुंदर! हे काय आहे नक्की ते सांगाल का?
लै म्हंजे लैच भारी बायो
लै म्हंजे लैच भारी बायो
जबरी....
जबरी....
मस्त …. आणि खूप उपयोगी सुद्धा
मस्त ….
आणि खूप उपयोगी सुद्धा …
भारीच की राव !!