निसणी आणि करोली
Submitted by योगेश आहिरराव on 16 July, 2020 - 04:39
"माळशेज घाट" सिर्फ नाम ही काफी है!!!
=======================================================================
=======================================================================
उन्हाळा सरत चालला नि आम्हा भटक्या मंडळींना ट्रेक्सचे वेध नाही लागले तर नवलच.. त्यात भटक्या मायबोलीकरांची बोलणी सुरु होतीच.. कुठे जायचे म्हणून.. यंदाच्या सिजनमधला पहिलाच ट्रेक साधा छोटा असावा म्हणून "सांधण दरी" ठरले.. साम्रद (तालुका:अकोले, जिल्हा: अहमदनगर)या छोट्या गावाजवळ असलेली ही सांधण दरी.. सुमारे दोनशे फूट खोल नि अंदाजे दिडकिलोमीटर पर्यंत विस्तार असलेली ही दरी म्हणजे नैसर्गिक चमत्कारच म्हणावा.. या दरीतून चालणे म्हणजे भूगर्भातून मार्ग काढतोय असे भासते.. थोडक्यात जमिनीला पडलेली भेगच म्हणायची..