तारा

जन्म ताऱ्याचा

Submitted by vaijayantiapte on 16 April, 2018 - 23:31

उधळून लावतो मेघ
थैमान वादळाचे
नर्तनही विजांचे ।।१।।

तापलेल्या अंतराळी
अस्वस्थ इंद्रधनू
मार्गक्रमण मेघाचे ।।२।।

तेजाच्या आरतीने
अस्तित्वस्पर्श मेघाचा
जन्म ताऱ्याचा ।।३।।

..............वैजयंती विंझे - आपटे

शब्दखुणा: 

'नी' ची कहाणी

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.

विषय: 

तारा

Submitted by अजित अन्नछत्रे on 25 September, 2012 - 05:00

तळपता तारा

कोण मी? एक तळपता तारा!
आज मी एक तळपता तारा!

तेजपुंज आहे मम काया,
तमसाची ना तिजवर छाया

लोहगोल मी स्वयंप्रकाशी,
प्रबल, प्रखर, अजय, अविनाशी

सूर्य, चंद्र, ग्रहगोल अन तारे,
झगमगले तारांगण सारे,

कोटी कोटी अणु-विस्फोट,
अनंत वाहती ऊर्जा-स्त्रोत

सार्थ हा खटाटोप सारा,
कोण मी? एक तळपता तारा!
आज मी एक तळपता तारा!

______________________________

निखळता तारा

आज मी एक निखळता तारा !
हाय मी! एक निखळता तारा !

तेजोहीन आज मम काया
तमसाची ही मजवर छाया

बलहीन भुजा अन आज कर माझे
निर्बल, निष्प्रभ अस्त्र मम भासे

शब्दखुणा: 

युसुफ मेहेरअली सेंटर, तारा, पनवेल (भाग १- दर्शनी भाग व तेलाची फॅक्टरी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 6 June, 2011 - 03:58

पनवेलच्या तारा गावात एका स्नेह्यांच्या पार्टीच्या निमित्ताने मागच्या महिन्यात जाण्याचा योग आला. तिथेच युसुफ मेहेरअली सेंटर व त्यांच्याच शाखेचे बोगनवेलीचे प्रदर्शन असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी लवकरच निघालो. तिथे पाहण्यासारखे इतके होते की आम्हाला वेळ कमी पडला. सर्वप्रथम आम्ही युसुफ मेहेर अली सेंटरला भेट दिली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - तारा