तारा

Submitted by अजित अन्नछत्रे on 25 September, 2012 - 05:00

तळपता तारा

कोण मी? एक तळपता तारा!
आज मी एक तळपता तारा!

तेजपुंज आहे मम काया,
तमसाची ना तिजवर छाया

लोहगोल मी स्वयंप्रकाशी,
प्रबल, प्रखर, अजय, अविनाशी

सूर्य, चंद्र, ग्रहगोल अन तारे,
झगमगले तारांगण सारे,

कोटी कोटी अणु-विस्फोट,
अनंत वाहती ऊर्जा-स्त्रोत

सार्थ हा खटाटोप सारा,
कोण मी? एक तळपता तारा!
आज मी एक तळपता तारा!

______________________________

निखळता तारा

आज मी एक निखळता तारा !
हाय मी! एक निखळता तारा !

तेजोहीन आज मम काया
तमसाची ही मजवर छाया

बलहीन भुजा अन आज कर माझे
निर्बल, निष्प्रभ अस्त्र मम भासे

शमले सारे अंतरीचे अणु-स्फोट
त्या सवे जाहले खंडित ऊर्जा-स्त्रोत

ना संगत मजला, नाही कुणाची साथ
भरकटलेला, मी तर उल्का-पात !

व्यर्थ का खटाटोप सारा?
आज मी एक निखळता तारा !
हाय मी! एक निखळता तारा !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कवितेच्या नवीन क्षेत्रात प्रवेश केल्यबद्दल अभिनन्दन ! ऊत्तम कविता. दुसरा भाग वाचताना "मावळत्या दिनकरा" चा भास होतो.

भरकटलेला, मी तर उल्का-पात !

मस्तच !

प्रिय निशीकांत आणि बेफिकीरजी,

आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद!

धन्यवाद pradyumnasantu आणि भारतीजी, आपल्या बहुमूल्य अभिप्रायाबद्दल !