माझं गाव
याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला
वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला
वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर
दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर
थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी
वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी
डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू
ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू
बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर
पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान
या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी
पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी
जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती.
-----------------------------------------------------
मोडकळीला आलेल्या गावाचे
मोडकळलेले आकाश.
आकाशाचा कण्हता सूर,
आकाशाला इथे तिथे जखमा.
जखमांतून ओघळले
आकाशाचे जांभळे रक्त.
एकेका थेंबाने मोजून घेतली
स्व्तःच्या गळण्याची किंमत.
आकाशाचा कण्हता सूर.
आकाशाखालचा गाव बदनूर.
आकाशाचे जांभळे रक्त
समुद्रावर सांडले, गावावर सांडले.
"मारा, झोडा!" च्या आरोळ्या देत
तेही समुद्राला मिळाले.
आकाशाखालचा गाव बदनूर
आकाशाच्या कण्हत्या सुरात सूर मिसळू लागला
मोडकळत्या गावातल्या
मोडकळत्या घरांचे गंजलेले पत्रे
समुद्राच्या रक्ताने रंगले.
गाव म्हन्जे गाव असत
शहरात कधि गाव नसत
सगलयांच गाव असल तरी
तुमच आमच सेम नसत
गाव म्हन्जे गाव असत
गावामधे सुख़सोई नसतात
तुमच्या गावी असल्या तरी
आमचया त्या नसतात
गाव म्हन्जे गाव असत
तिथे प्रेमाला नाव नसात
तुमच्यकड़े लव असल तरी
आमचयाकड़े ते प्रेमच असत
गाव म्हन्जे गाव असत
खूप मागासलेल असतत
तेच तर खर गाव असत
सुधारलेल ते शहर असतत
गाव म्हन्जे गाव असत
शहरापासुन दूर असत
सह्यद्रिच्या कुशित असत
“वावे” त्याच नाव असत