Submitted by नीधप on 21 April, 2011 - 00:25
जुनीच. "आतल्यासहित माणूस" या प्रयोगात होती.
-----------------------------------------------------
मोडकळीला आलेल्या गावाचे
मोडकळलेले आकाश.
आकाशाचा कण्हता सूर,
आकाशाला इथे तिथे जखमा.
जखमांतून ओघळले
आकाशाचे जांभळे रक्त.
एकेका थेंबाने मोजून घेतली
स्व्तःच्या गळण्याची किंमत.
आकाशाचा कण्हता सूर.
आकाशाखालचा गाव बदनूर.
आकाशाचे जांभळे रक्त
समुद्रावर सांडले, गावावर सांडले.
"मारा, झोडा!" च्या आरोळ्या देत
तेही समुद्राला मिळाले.
आकाशाखालचा गाव बदनूर
आकाशाच्या कण्हत्या सुरात सूर मिसळू लागला
मोडकळत्या गावातल्या
मोडकळत्या घरांचे गंजलेले पत्रे
समुद्राच्या रक्ताने रंगले.
आणि घाबरून देवांनी, जिवांनी
सामुदायिक आत्महत्या केली.
- नी
गुलमोहर:
शेअर करा
ग्रे...................ट!!!!!
ग्रे...................ट!!!!!!!!!!!!!!!
आणि घाबरून देवांनी,
आणि घाबरून देवांनी, जिवांनी
सामुदायिक आत्महत्या केली
>>
छान
सुंदर. किती जणांना समजेल हा
सुंदर.
किती जणांना समजेल हा प्रश्नच आहे.
छान! माझ्यापुरता अर्थ लावला
छान!

)
माझ्यापुरता अर्थ लावला बुवा मी!
बागुलबुवा, कळकळ प्रशंसनीय!
(टाकताय का रसग्रहण?
ही पण सुंदर
ही पण सुंदर
टाकताय का रसग्रहण? << अरे
टाकताय का रसग्रहण? << अरे देवा..
अम्याने रसग्रहण केलं तर
अम्याने रसग्रहण केलं तर आपल्याला वाचताना शब्दागणिक पाणीग्रहण करावं लागेल.
बागुलबुवा, कळकळ प्रशंसनीय!>>>
बागुलबुवा, कळकळ प्रशंसनीय!>>>
कविता कळणे/ समजणे
कविता कळणे/ समजणे याबद्दल....
मला गरज वाटत नाही कविता संदर्भांसकट 'समजावी' अशी. एकास एक अर्थ कळणे हे गरजेचे नाही. लिहिणारा त्याच्या त्या त्या वेळच्या ट्रिगर्सनुसार लिहित असतो. वाचणारा त्याच मानसिकतेमधे जायला हवा, त्याला तेच दिसायला हवं असं नाही. वाचणारा आपलं सबटेक्स्ट भरून, त्याच्या त्याच्या अनुभवांच्यातून कवितेत अर्थ भरत जातो स्वतःसाठी, अनुभव घेत जातो.
माझ्यामते अनुभव महत्वाचा. त्यामुळे कुणाला कविता समजली किंवा नाही समजली असं म्हणणं मला तरी पटत नाही.
हे माझे वैयक्तिक मत.
<< टाकताय का रसग्रहण? << अरे
<< टाकताय का रसग्रहण? << अरे देवा.. >>
आता कळला
आणि घाबरून देवांनी, जिवांनी
सामुदायिक आत्महत्या केली.
याचा अर्थ ?
आनंदयात्री 'कळकळ' ने कळ उठलीच की वो.
मला गरज वाटत नाही कविता
मला गरज वाटत नाही कविता संदर्भांसकट 'समजावी' अशी. एकास एक अर्थ कळणे हे गरजेचे नाही. लिहिणारा त्याच्या त्या त्या वेळच्या ट्रिगर्सनुसार लिहित असतो. वाचणारा त्याच मानसिकतेमधे जायला हवा, त्याला तेच दिसायला हवं असं नाही. वाचणारा आपलं सबटेक्स्ट भरून, त्याच्या त्याच्या अनुभवांच्यातून कवितेत अर्थ भरत जातो स्वतःसाठी, अनुभव घेत जातो.
माझ्यामते अनुभव महत्वाचा. त्यामुळे कुणाला कविता समजली किंवा नाही समजली असं म्हणणं मला तरी पटत नाही.
हे माझे वैयक्तिक मत.>>>
सहमत आहे.
खुप छान.
खुप छान.
(No subject)
किती जणांना समजेल हा प्रश्नच
किती जणांना समजेल हा प्रश्नच आहे >>> ह्याला कविता का म्हणायच हा पण प्रश्नच आहे. ट ला ट जोडुन वाक्य टाकली म्हणजे कविता होते का ?
आनंदयात्री 'कळकळ' ने कळ उठलीच
आनंदयात्री 'कळकळ' ने कळ उठलीच की वो. >>

हो ना राव!! नीधपसुद्धा उतरल्या त्यात!!!
कविता ही प्रत्येकाला ज्याचे त्याचे अर्थ देते हे न कळायला आम्ही काय "प्रस्थापित कवी" आहोत का?
गंमत करतोय हो!!
जाऊदे. हेमाशेपो.
जखमांतून ओघळले आकाशाचे जांभळे
जखमांतून ओघळले
आकाशाचे जांभळे रक्त.
>>
भन्नाट कल्पना..! एकंदर कविता आवडली.