सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ??
या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि तुमच्या सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज ….
'सुखाशी भांडतो आम्ही'
लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं ….
आज १९ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबर २०११ पर्यंत नेहरू सेंटर, वरळी, मुंबई येथे पंधरावा नाट्यमहोत्सव सुरू होत असून भारतातील विविध भाषांतील रंगकर्मी तेथे आपल्या कलागुणांचा आविष्कार करतील. मराठी मनाला 'नाट्यवेड' ही संकल्पना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, पण अशा महोत्सवाच्या निमित्ताने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील विविध प्रांतातील नाट्यविषयी कलाजीवन कशारितीने फुलत गेले आहे याचा लेखाजोखा काढता येतो.
नवा गडी नवं राज्य -- एक खुसखुशीत नाट्क
काल "नवा गडी नवं राज्य" हे नाटक बघितलं. त्याच हे परी़क्षण......
कलाकारः- उमेश कामत, प्रिया बापट, हेमन्त ढोमे आणी गिरिजा दातार.
पडदा वर जातो आणी नउवारी वर rain coat नेसलेली अम्रुता (प्रिया बापट) रंगमंचावर येते. तिच्याकडे पाहता पाहता आपलं लक्ष जातं ते SET कडे. अतिशय सुरेख असणारा सेट आणी त्याहुन सुरेख दिसणारी अमु.
अमु: लहानपणीचं बालपण हरवल्यामुळे लग्नानंतर पण अगदी बालीश वागणारी, लहान लहान गोष्टींनी आनंदुन जाणारी एक तुफान मुलगी.