सुखाशी भांडतो आम्ही
ऑफिस च्या कामातून जाम वैतागलो होतो , गेल्या २-३ आठवड्यातून साधे पुस्तक वाचायला पण वेळ मिळाला नव्हता त्यामुळे जास्तच वाईट वाटत होते , पण नेमके काल "सुखाशी भांडतो आम्ही " हे गिरीश ओक आणि चिन्मय मांडेलकर यांचे वैचारिक खाद्य पुरवणारे एक उत्तम नाटक पाहायला मिळाले. नाटक, गाण्याची मैफिल आणि काही उत्कृष्ठ मराठी सिनेमे ( मराठी कारण हल्ली हिंदीत उत्कृष्ठ म्हणण्यासारखे काहीच घडत नाहीये) या माझ्या आयुष्यातील अशा गोष्टी आहेत कि जिथे मी कोनात्याहीवेली आणि कुठेही एकटा जायला देखील तयार असतो, आणि नेमके कालही एकटाच गेलो.