बँगलोर

बंगळूरू आणि आसपास स्थलदर्शनाची माहिती हवी आहे

Submitted by मंजूडी on 19 June, 2014 - 08:51

बंगळूरू आणि आसपास काय पहावे?

दोन ठिकाणांमधे खूप अंतर नको. कुटुंबातील सर्व वयाच्या माणसांना रीझवणारी, आनंद देणारी सहल व्हायला हवी. सहलीचा कालावधी ७ ते ८ दिवस.. त्याहून जास्त नको.

१.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-कोडाई
२.बंगळूरू-कूर्ग-काबिनी
या दोनपैकी तुम्ही काय सुचवाल?
पॅकेज देणारे माहितीतले कोणी टूर ऑपरेटर असतील तर सुचवा.

शब्दखुणा: 

पिरॅमिड व्हॅली - वन ऑफ दी सेव्हन वंडर्स ऑफ बेंगालूरू

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सध्या रोज बँगलोर मिरर मध्ये ह्या पिरॅमिड्चे फोटो येत आहेत. त्यावरुन मला हे इथे लिहावंसं वाटलं. काही महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीकडून पिरॅमिड व्हॅली विषयी ऐकले आणि लगेचच्या विकेंड्ला तिथे जाउन आले. कनकपुरा रोडवरून साधारण ३५ किमी अंतरावर आहे ही पिरॅमिड व्हॅली. रविशंकर आश्रम सोडल्यावर अजून १५ किमी पुढे जावे लागते. ठिकठिकाणी साईन बोर्ड्स लावलेले आहेत. शेवटी डाविकडे वळावे लागते.

Subscribe to RSS - बँगलोर