चांदणे आहे खरे की भास नुसता? (तरही)
डॉक्टर सर, माझा सहभाग!! आनंदयात्री, तुझे मनापासून आभार!!
_______________________________
चांद सजला, आसमंती खास नुसता
चांदणे आहे खरे की भास नुसता?
दरवळ तुझा, वेड लावी, चित्त चोरी
भान हरते, मात्र चाले, श्वास नुसता....
गोड हसणे, रुसुन बसणे, लाजणेही
सत्य-मिथ्ये, काय जाणू, त्रास नुसता....!!
जाग यावी मज शबनमी आठवांनी
का ठरावे, वेड हे, आभास नुसता?
पाश माझे भोवती आता नकोसे?
बेगडी जगणे असे, उपहास नुसता...!