उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड
आकाशाच्या कह्यात
सूप टोपले पाखड
चांदण्याच्या नजरेत हळू हळू येशील
नजरेतलं चादणं वळून वळू्न घेशील
अंगणातली तूळशी्पाशी
गूज थोड उकल ,मातीच्या चुलीजवळ
जसा जन्म सफ़ल
जरा जरा धकल,तुकडा पाणी खपल
उघड उघड बये
आता तरी उघड
माजघराचे दार ..थोडे थोडे उघड
कासवाच्या गतीनं रस्ता तूझा दिसल
टाचा ऊंच करुन ,मन कर अचल
एक एक धागा आता तू उकल
शब्दांच्या विहिरीत ,जीव नाही जायचा
एक एक जाणिवाचा तळ मात्र गाठायचा
चक्र तर रोजचेच चुल आणि मुल
तू नको विसरु गं तूझे उगम कूळ
्बर, आता जूळवून घे चैत्यन्याशी सूत
टिव्ही मधे दाखवती गोरे गोरे रंग
क्रीम कोणते मी लावू गोरे होण्या अंग
मला पण हवा माझा चेहरा चांगला
फेयर अॅण्ड लवली आणून देना बाबा मला
तुझा आहे तोच रंग गोड आहे बेटा
रंग बदलण्याचा नको ग आटापिटा
रंग जो मिळाला जन्मताना आपल्याला
तोच रंग छान रंग तोपण चांगला
बागेमध्ये मोगऱ्याची फुले असती ना
गुलाबाची पण असतात काय हो ना
गुलाबाने मोगरा व्हायचे नसते गं
गुलाबाचे वेगळे सौंदर्य असते गं
आवडतेस तू आहे तशीच आम्हाला
रंग गोरा करण्याचा विचार कशाला
जन्मतांच घरच्यांचे तोंड कडू
तास तास एकटीला देती रडू
मुलगी असणे असे तिचा दोष
साहते बिचारी सगळ्यांचा द्वेष
रडताना रडण्याचा वीट आला
पापण्यांना आसवांचा भार झाला
गोड धोड पण वाटलेच नाही
म्हणती जन्माला आली कशाला ही
मुलगा असता तं हवा होता
हुंडा जमवावा लागणार आता
अवकळा आली सगळ्या घराला
पापण्यांना आसवांचा भार झाला
जन्माला आली आहे ती जगेल
हळू हळू तिला प्रश्न पडतील
माझा काय दोष सांगा ती म्हणेल
कुणापाशी नीट उत्तर नसेल
निरागस असताना कष्ट तिला
पापण्यांना आसवांचा भार झाला