केवळ
Submitted by vaiddya on 22 January, 2011 - 22:11
ही सारीच पाने आता विलगायची आहेत !
शाखे-शाखेतून कोवळे कोंब बिलगायचे आहेत ...
...
एक काठी !
...
एकच रेघ !
...
इथे असे ..
एक काठी होऊन जीवन
चालूच आहे ..
ते असे निष्पर्ण उरताना
आणि आतून रसरशीत जगत असताना
एक लक्षात येते ..
झाड होणार्याला केवळ एका काठीचे जगणे यायला हवे !
बहरांच्या आधीची केवळ एक निष्पर्ण काठी !
चित्र होणार्याने व्हायला हवे केवळ एक रेघ
अमर्याद शक्यतांची .. एक रेघ केवळ !
आणि
कविता होणार्याने,
असायला हवे शब्द
गुलमोहर:
शेअर करा