भाकरीचे लाडू
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
एक गरीब कुटुंब. जेमतेम हाता-तोंडाची गाठ पडणारं. सणवारास सुद्धा पोटभर जेवायला मिळालं तरी खूप, गोडधोड करणं तर दूरच. नवरा-बायको, दोन-तीन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी. ह्या कुटुंबात कुठल्या तरी एका सुदिनी सगळ्यांची जेवणं झाल्यावर तीन-चतकोर भाकरी उरते. दुसर्या दिवशी मुलांना न्याहरी होणार म्हणून आईला बरे वाटते. पण सकाळी उठून बघते तर काय भांड्यात भाकरी नसतातच. आदल्या रात्री सगळे झोपल्यावर थोरलीला माजघरात जाताना तिने बघितलेले असते. रात्री तिनेच भाकरी खाल्ल्या असाव्यात अशा समजातून आई रागे-रागे मुलीला काही बाही बोलते. दुपारच्या जेवणात थोरली आईच्या पानात लाडू वाढते.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा