कमळ

कविता

Submitted by Santosh zond on 25 July, 2025 - 01:28

चिखलाच्या वलयात फुलते,चिखल कधी होत नाही
काट्यांच्या विळख्यात खिळते,निखळ कधी होत नाही
कमळ फुलाच्या पाकळ्यांवर
चंद्र होऊन साचते कविता,
पानवेलीच्या धुंद कळ्यांवर
पाऊस होऊन नाचते कविता,
आयुष्य देही कुरुक्षेत्रावर
कर्ण् होऊन गाजते कविता,
निरागस जिवाला लागल्यावरती
आई होऊन याचते कविता,
चिखलाच्या वलयात फुलुन,काट्यांच्या विळख्यात खिळुन कधीही संपत नाही कविता,
माती होऊन मातीत रुजते,पुन्हा पहाटे फुलते कविता.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कुमुद (वॉटरलिली), कमळ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 14 June, 2012 - 03:34

चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्‍या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले Lol

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कमळ