प्रत्येकाला वाटत असतं ...
आपलं कुणी असावं
आयुष्याच्या वाटचालीत ...
कुणी आपल्याला पुसावं
नजर थकते शोधताना ...
आपलं कुणी दिसत नाही
प्रत्येक जण घायाळ इथे ...
कुणी कुणा पुसत नाही
आपलं कुणी असण्यासाठी ...
सोबत त्यांच्या जावं लागतं
सारी दुनिया महान मानून ...
लहान त्यांच्यात व्हावं लागतं
-------------- शैलेन्द्र
नेहमीप्रमाणे अकरा महिन्यांनी आमची गृहदशा बदलली. ती बदलली की पत्रिकेतले शेजारग्रहही ओघाने बदलायचेच. तसं ते फ़ारसं कधी जाणवायचं नाही, कारण दोन दोन दारांच्या, टाइट्ट शेड्युलच्या (काम आणि टीव्ही दोन्हीची बरं) आणि मी माझ्यापुरता या अॅटिट्युडच्या कडेकोट बंदोबस्तातून `इकडून तिकडे गेले वारे’ इतके म्हणण्याएवढीही फ़ट कशी ती नसायची. त्यामुळे नव्या घरात प्रविष्ट झाल्याच्या संध्याकाळीच आमच्या द्वारघंटिकेवर कुणीतरी अंगुलीप्रहार केल्याने नवल वाटतच दार...नाही दारावर दारे उघडली, तर मध्यमवयाकडून ज्येष्ठतेकडे म्हणजे काकी ते आजी या मधल्या स्टेशनावरच्या एक बाई दारात चक्क सस्मित उभ्या. आणि त्यांनी काय म्हणावे?
ती........
तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!
तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!
तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!
तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!
तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!
तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
"गणपती बाप्पा मोरया" चा गजर ऐकला की मन एकदम २५ वर्षे मागे जाते. दोन वेण्या आणि फुलाफुलांचा फ्रॉक घातलेलं गणपती समोर हात जोडलेलं माझे रूप माझ्या डोळ्यासमोर येते. आणि मनात रुंजी घालू लागतात तेव्हाच्या गणपती गौरीच्या आठवणी. गणपती गौरी हा माझा सगळ्यात आवडता सण.