Submitted by शैलेन्द्र शिरोळकर on 2 March, 2011 - 06:45
प्रत्येकाला वाटत असतं ...
आपलं कुणी असावं
आयुष्याच्या वाटचालीत ...
कुणी आपल्याला पुसावं
नजर थकते शोधताना ...
आपलं कुणी दिसत नाही
प्रत्येक जण घायाळ इथे ...
कुणी कुणा पुसत नाही
आपलं कुणी असण्यासाठी ...
सोबत त्यांच्या जावं लागतं
सारी दुनिया महान मानून ...
लहान त्यांच्यात व्हावं लागतं
-------------- शैलेन्द्र
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा