जर ठरला असेल तर आजच आताच सांगा..
ईतरांना आयड्या मिळतील ..
त्या ईतरांमध्ये एक मी आहे, कारण ३० ची सकाळ उजाडली तरी
मी अजून ठरवू शकलो नाही की फ्रेंडस, फॅमिली की गर्लफ्रेंड..? कोणासोबत किती वेळ घालवायचा आणि त्या वेळेत काय काय करायचे?
तुम्ही तुमचा सांगा, मी माझा ठरवतो. जर मलाही ठरवायला मदत केली तर येणारे अखंड वर्ष मायबोलीचा आभारी राहीन
तळटीप - मी दारू पित नाही !
३१ डिसेंबर जवळ यायला लागला की प्रत्येक जण आपले प्लान ठरवायला लागतो. कुठे जायचे, काय करायचे वगैरे. डोंगरी आणि भटके सुद्धा शहरी गजबजाटापासून दूर शांत अश्या निसर्गाच्या सानिध्यात एखादा गड-किल्ला बघून आपले ट्रेक प्लान तयार करतात. पण सध्या इतके ट्रेक ग्रुप झालेत की विचारायला नको. मुळात त्यातील प्रत्येकजण ट्रेकर किंवा हायकर श्रेणीत येतो का हा देखील प्रश्नच असतो... हौशी मौजी कलाकारांची आपल्याकडे काही कमी नाही.. अश्याच काही हौशी लोकांबाबतचा एक डोंगरातला अनुभव मी आज तुमच्या सोबत वाटणार आहे.