आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..
आठवणीतली (आवडलेली) पुस्तकं..
आतापर्यंतच्या प्रवासात निस्वार्थीपणे बऱ्याच पुस्तकांनी सोबत दिली. त्या पुस्तकांचे आणि त्या लेखकांचे आभार मानण्याचा एक अपुरा, तुटपुंजा प्रयत्न.
का कुणास ठाऊक, पण पहिलं आठवलं… वीरधवल. नाथ माधव यांचं हे पुस्तक लहान पणी मनावर गारुड करून गेलं. आज हँरी पॉटर लहान मुलांवर जी जादू करतो, तीच जादू वीरधवलने त्या काळी माझ्यावर केली होती. त्याचं दुसरं पुस्तक पुस्तक - राय क्लब उर्फ सोनेरी टोळी सुद्धा भन्नाट होतं. त्यावर अशोक सराफचा चित्रपट निघाला होता. बहुधा द मा मिरासदारांचे संवाद होते. मला पुस्तक जास्त आवडलं चित्रपटापेक्षा.