कॉलेजच्या जमान्यातील गोष्ट आहे!
आम्हा मुंबईकरांसाठी मुंबई जिथे माहीमला संपते तिथे पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी जोगेश्वरीच्या पुढचे आम्ही हिशोबात धरत नाही. तसे गेल्या काही वर्षांपासून मालाड कांदिवलीही जमेस धरू लागलो आहोत, पण बोरीवली त्याची हद्द झाली. अश्यात वसईबद्दल आम्हाला तितकीच माहीती असते जितकी गडचिरोलीबद्दल.. म्हणजेच शून्य !
सुरूची बाग म्हणजे समुद्रकिनाराच आहे.. जिथे किनार्यावर सुरूची झाडे बहुसंख्येने उभी आहेत.. अजय पाटील या मायबोलीकरांच्या पेटींगमध्येदेखील इकडचे चित्र पाहीले होते.. तेव्हा या ठिकाणाला भेट द्यायची राहिलीच होती.. वसई (पश्चिम) ला इथे एसटी वा रिक्षाने जाता येते.. एसटीने (भाडे प्रत्येकी ७ रु.) गेल्यास वसई शहर स्टॉपला (पापडीच्या पुढचा स्टॉप)उतरायचे.. मग इसको पूछ -उसको पूछ करत पंधरा- वीस मिनीटांत चालत सहज पोहोचता येते.. इथे बहुदा स्वतःची गाडी घेउन जाता नाही येत.. कारण जवळपास एक किलोमीटर अंतराआधी गेट लावला आहे.. रिक्षाने (भाडे अंदाजे प्रत्येकी १६ रु.) आलात तर इथपर्यंतच सोडतो..
नमस्कार,
मला चांगले फोटो काढता येत नाही या मतावर माझे काही मित्र-मैत्रिणी ठाम आहेत पण मला त्याच वाईट वाटत नाही कारण ईथे मिळणार प्रेम, छान छान प्रतिसाद हे पुन्हा फोटो काढायला आणि ईथे शेअर करायला पुरेस आहे.
वसई च्या समुद्र किनारयाचे काही फोटो ईथे देत आहे.
१.

२.

३.

४.